प्रसारमाध्यमांची सामाजिक बांधिलकी किंवा प्रसारमाध्यमे विद्यार्थ्यांना बिघडवतात का? ( चर्चात्मक निबंध ) Social commitment or media of media do the spoilers of the media?

 प्रसारमाध्यमांची सामाजिक बांधिलकी किंवा प्रसारमाध्यमे विद्यार्थ्यांना बिघडवतात का?

Social commitment or media of media do the spoilers of the media? 

          आजच्या प्रगत विज्ञान युगामध्ये संपूर्ण विश्व अतिशय लहान झाले आहे. संपूर्ण जग एकमेकांच्या अगदी जवळ आले आहे. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात कुठे खुट्ट झाले की साऱ्या जगात त्याचा गाजावाजा लगेच होतो. एवढया मोठ्या प्रमाणात आजची प्रसारमाध्यमे प्रभावी, प्रगत झाली आहे. वर्तमान पत्रे, पाक्षिके, मासिके, नियतकालिके, नभोवाणी, दूरदर्शन, संगणक, मोबाइल इत्यादी अनेक माध्यमे आज सर्वत्र दिसतात. आजच्या तरूण वर्गामध्ये ही सर्व प्रसारमाध्यमे विशेष लोकप्रिय आहेत. अशाप्रसंगी एकच प्रश्न निर्माण होतो की, या प्रसार माध्यमांचा विद्यार्थ्यांच्या जीवनवर काही परिणाम होतो आहे का? हि प्रसारमाध्यमे तरूणांच्या जीवनावर नक्की चांगला की वाईट परिणाम घडवत आहेत?  त्या दृष्टीकोनातून प्रसारमाध्यमे आपली सामाजिक बांधिलकी कशी जपतात?

          रेडिओ आणि दूरचित्रवाहिन्या यांच्या आजकाल भरपूर वाहिन्या आहेत. या सर्व वाहिन्यांवर अनेक चर्चा, मुलाखती, व्याख्याने, संभाषणे, स्पर्धात्मक चर्चा असे विविध कार्यक्रम होत असतात. परंतु विद्यार्थी या प्रकारचे किती कार्यक्रम पाहतात किंवा ऐकतात? नभोवाणी किंवा रेडिओवर माहितीपर कार्यक्रम, चांगल्या विषयावरील चर्चासत्रे, प्रसिध्द व्यक्तींच्या मुलाखती वा बातम्या लागल्या तर हिच मुले रेडिओ बंद करतात. ते ऐकतात फक्त 'रेडिओ मिरचीवरील' नको ती गाणी आणि कार्यक्रम सादर करणाराची वाह्यात बडबड. मग अशीच गाणी त्यांच्या तोंडी नेहमी रेंगाळतात. अशीच गाणी ते नेहमी गुणगुणत असतात. टेलिव्हिजनवर माहितीपर अनेक कार्यक्रम असतात. पण तरूण पिढी दूरचित्रवाणीवरील फक्त चित्रपटांचेच कार्यक्रम पाहतात. काहीतर फक्त खेळांच्या कार्यक्रम रमलेले असतात. काही विद्यार्थ्यांना फायटिंगच्या कार्यक्रमाचे वेड असते. अनेकजण टेलिव्हिजन वरील पॉप संगीत ऐकण्यात मग्न असतात. खरतर चित्रपटातील हिंसक भाग पाहून आजची तरुण पिढी हिंसक बनत आहे. त्यांच्या जीवनाचा प्रवास हिंसक मार्गाने होत असलेला दिसून येतो. परदेशातील काही शाळांमधील कुमार वयातील मुलांनी आपल्याबरोबरच्या इतर मुलांवर गोळीबार केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. आपल्या देशातही विविध मारामारीचे शो पाहणारे शिशू प्रेक्षक एकमेकांच्या शरीरावर तसे प्रयोग करत आहेत. टेलिव्हिजनवर अतिशय लोकप्रिय झालेली मालिका 'शक्तिमान' पाहून अनेक बालकांनी त्याचे अनुकरण करून स्वतःच्या जिवावर बेतल्याचीही उदाहरणे आहेत.

          दूरचित्रवाणीवर अनेक जाहिराती असतात. या जाहिराती खरच लहान मुलांना पाहण्यासारख्या असतात का? या जाहिरातीचे विद्यार्थ्यांना विलक्षण आकर्षण असते. अशा जाहिरातीमधील विविध गोष्टी आपल्याला मिळाव्यात म्हणून ते पालकांकडे हट्ट करतात. जाहिरात करणाऱ्यांनी लहान मुलांचे मानसशास्त्र जाणून समाज बांधिलकी जपली पाहिजे. विविध जाहिराती मधून लहान लहान मुलांचा उपयोग केला जातो. सध्या लहान मुले, तरूण वर्ग यांच्यामध्ये वाढलेले बाहेर खाण्याचे वेड. 'फास्ट-फूड' चे आकर्षण हा या प्रसारमाध्यमाचा परिणाम आहे. याचा विपरीत परिणाम मुलांच्या शरीरावर होत आहे. 

         टेलिव्हिजनवर बऱ्याच वेळा अशी दृश्ये दाखवली जातात, जी आपण कुटुंबातील सर्वजन एकत्र बसून बघू शकत नाही. लहान वयात या गोष्टींचे नाजूक मनावर अयोग्य परिणाम होतात. आजकाल अनेक हिंदी सिनेमामध्ये अशा प्रकारचा उघडावाघडा 'रोमान्स' म्हणजेच शृंगार असतो. तो सर्रास पणे उघडउघड दाखवला जातो. या सर्वांची भरपूर जाहिरात होते आणि मग ते बघण्याची तरुणांना, कुमारांना, युवकांना ओढ वाटते. काहीजण तो आचरणात आणण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतःवर अनेक संकटे ओढवून घेतात. स्वतःचे भवितव्य पणाला लावतात. त्यामुळे अनेक ठिकाणी एकतर्फी प्रेमातून प्रेयसीला जाळण्याचे प्रकार होतात. या सर्वांचा विचार या प्रसार माध्यमांनी करायला हवा.

          अनेक अश्लील मासिकांमधून सभ्यतेच्या मर्यादा ओलांडल्या जातात. अशी मासिके सुद्धा अनेक वेळा विद्यार्थ्यामधून गुपचुप फिरवली जातात. अशा नको त्या गोष्टींपासून मुलांना वाचवण्यासाठी पालकांचे लक्ष असणे गरजेचे असते. लहान वयात मुलांना चांगल्या आणि वाईट गोष्टीतील फरक समजावून द्यावा लागतो. वास्तव आणि आभास असणाऱ्या गोष्टी मधील अंतर त्यांच्या लक्षात आणून द्यावे लागते. या सर्व गोष्टीमुळे होणारी फसवणूक आणि येणारे नैराश्य त्यांना वेळीच दाखवून द्यावे लागते. या सर्वांमधून हळूहळू चांगल्या पुस्तकांकडे त्याचे लक्ष केंद्रित करावे लागते.

          प्रसारमाध्यमांवर अशा अयोग्य गोष्टी प्रसिद्ध करण्याबाबत कायद्याने बंदी आणणे गरजेचे आहे. केलेल्या कायद्याचे काटेकोरपणे पालन सुध्दा झाले पाहिजे. असे घडल्यास प्रसारमाध्यमे ही ज्ञानाची कोठारे होतील. ती ज्ञानाची कोठारे होण्यासाठी प्रसारमाध्यमांनी आपली सामाजिक जबाबदारी किंवा सामाजिक बांधिलकी जपणे फार महत्वाचे आहे.

English translation

Social commitment or media of media do the spoilers of the media? 

The entire world has become very small in today's advanced science era. The whole world has come very close to each other. His gambles are immediately in the world that has been strictly in any worm of the world. Today, the media has increased effectively, the advanced, the advanced. Many media appear today every current, letters, fertileists, magazines, magazines, nuclear, television, computer, mobile etc. All the media in this very young class is special popular. In this way, whether the question is a result of the media's life on this media? Is the media going to make a bad adultery in the life of the young man? How do the media begins with our social commitment? 

The radio and televisionhhyaniah are a lot of vibrations. There are various programs such as many discussions, interviews, lectures, conversations, competitive talks on all these channels. But how many programs or students listen to this kind of students Programs on the abuse or radio, programming discussions, goods about the information about the information, and the news of the people, stops the radio. They do not listen to 'Radio Chilli' do not want to be present in the songs and programs that are present. Then the same songs always pour their mouths. Things that are always attractive. There are many programs on the information on the television. But the young generation only seems to the movies on television. Sometimes the games of the games are rumored. Some students have a crazy width of the programming program. Many people are very important to hear the pop music on television. Today, the young generation of today is being violent by seeing violent parts of the film. The journey of their lives appear in the violent way. The children of a few schools have been fought during the age of young people firing other children with you. The marks of the Son-looking show in our country are experiencing similar to each other's body. Seeing 'Powerful' Absolute 'Absolute' on the television, many bail has examples of themselves and their own designs. 

There are many ads on television. Are these advertisements really like to watch young children? This ad is a fantastic attraction to the students. They do honestly as we get different things in such advertisements. Advertisers should be aware of the society commitment to know about psychology. Small children are used from various advertisements. Currently, the children of the younger, the younger in the classroom, the wine. The attraction of 'fast-food' is the result of this media. The opposite results are being taken on the children's body. 

Many views are shown on the television, which we can not sit together in the family of the family. At the very young age, these delicate minds have incorrect impact. Nowadays, there are such a type of open-line 'Romance' in the same hindi cinema. It is shown to be surrounded by probably. All of them had a promotion and then they seem to see young people, kumps, and youths. Some people try to bring it to the conduct and make many disasters on them. Get rid of yourself in the future. So many places in the same place are the type of burning to be loved by love. Thinking of all these people should do this media. County limits exceeds multiple porn magazines. Such magazines are also rotated from students at once. There is a need to have parents' attention to save children from this. At the age of children, it is necessary to explain the difference between good and bad things. 

The differences between things and reality that are retained and have to be brought to their attention. They are showing the deceptive and the depression deposits of all these things. All of them have to focus on the good books. The law needs to be banned by the law to release such inappropriate things. The law that has been made to be strictly followed. If this happens, the media will be known to knowledge. It is very important to the social responsibility or social commitment with the media to become a konka.