बेकार तरुणाचे आत्मकथन
आत्मवृत्तात्मक / आत्मनिवेदनपर निबंध
मुद्दे : दारिद्र्यात जन्म - अर्धपोटी शिक्षण - आईबापांच्या हाल-अपेष्टा - शिक्षण पूर्ण - अपेक्षा उंचावल्या - नोकरी मिळेल - दारिद्र्य संपेल - सोन्याचा संसार होईल ही अपेक्षा - नाव नोंदणी - मुलाखती दिल्या - वशिल्याविना दुर्लक्षित - पैशांची मागणी - बेकार - भष्टाचारी राजकारणी - चीड - सुखस्वप्ने भंगली - नैराश्य...
"जीवनातील आता पंचविस वर्षे पार होत आली आहेत, परंतू आजतागायत माझ्या जीवनातला एकही दिवस आनंदात अथवा सुखात गेला नाही. कारण माझ्या पाचवीलाच गरीबी पुजलेली होती. माझे वडील एक साधी कारकूनाची नोकरी करीत होते. त्यामुळे घाटकोपरच्याच एका मोडकळीस आलेल्या चाळीत आम्ही वास्तव्य करत होतो. मी, माझी दोन भावंडे आणि आई - वडील. आमची सगळी परिस्थिती ही फार हलाखीचीच होती."
"अशातच वडीलांचे खाजगी कंपनीचे ऑफिस बंद पडले, त्यामुळे वडीलांची नोकरी गेली. त्यामुळे मिळणारा तुटपुंजा पगार सुध्दा बंद झाला. आमच्या कुटूंबाचा एका वेळच्या जेवणाचा प्रश्न कसा सोडवायचा हा प्रश्न पडू लागला. या सर्व कारणामुळे आईने मोठ्या हिंमतीने स्वतःची कंबर कसली. या अगोदर ती फक्त दोन - तीन घरांचीच कामे करत होती. आता मात्र तिनं सात - आठ घरांची कामे धरली. माझी लहान लहान भावंडे सुध्दा तिच्या हाताखाली तिच्या मदतीला जात असत. माझ्या वडिलांनी सुध्दा मिळेल त्या दुकानांमध्ये साफसफाईचे काम करण्यास सुरूवात केली. घरातील सर्वच काबाड - कष्ट करत होते, याची माझ्या मनाला खूप लाज वाटे. आता आपण सुध्दा काहीतरी काम करावे असे मनोमन वाटू लागले. परंतू वडील नेहमी सांगत, "तू अभ्यास करून परीक्षा चांगल्या मार्काने पास हो, मग तूला चांगल्या पगाराची नोकरी लागेल."
"त्यामुळे रात्रं -दिवस अभ्यास करून चांगल्या गुणांनी बारावीची परीक्षा पास झालो. वाटलं होत आता लगेच नोकरी लागणार. त्यानंतर आई - वडिलांनासुख देऊ, लहान भावंडांना चांगले शिक्षण देण्यास सुरुवात करू. पण छे! पाहिलेल्या सर्व स्वप्नांचा, अपेक्षांचा भंग झाला. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन नोकरीसाठी अर्ज केले, पण प्रत्येक ठिकाणी एक तर वशिला किंवा पैशांची मागणी झाली. खर तर एवढ्या चांगल्या गुणांनी पास होऊन सुद्धा साध्या शिपायाची नोकरी भेटणे कठीण झाले होते. अनेकजण फुकटचा सल्ला म्हणून छोटा - मोठा धंदा कर अस सांगतात, पण तो सुरु करायला भांडवल कोण देणार?
"अंतर आत्म्यापासून काही तरी करण्याची दृढ इच्छा असून सुध्दा मला एकही काम मिळत नव्हते. नको असलेली कामे मात्र पुढे येत होती. माझे काही बेकार साथीदार काळाबाजार किंवा वाईट साईट कामे करून थोडाफार पैसे मिळवत होते. आमच्या चाळीतीलच भाई लोक किंवा दादा यांच्या संपर्कात ती होती. परंतू अनैतिक मार्गाने पैसे कमविणे, माझ्या मनाला जमणार अथवा रुचणार नव्हते."
"गरीब परिस्थिती मधून शिक्षण पूर्ण करून सुध्दा बेकारीची हि वेळ माझी पाठ सोडण्याचे नाव घेत नव्हती. त्यामुळे भ्रष्टाचारी समाजाचा वैताग, वीट आला होता. त्यामुळे कधी कधी स्वतःचे जीवन संपवावे, आत्महत्या करावी असे विचारही मनात येतात. पण त्याच वेळेस दुसऱ्याच्या घरात राबराब राबणाऱ्या आईची आठवण येते. फाटक्या कपड्यांमध्ये दुसऱ्यांचे टेबल, उष्टे साफ करणारा बाप डोळ्यासमोर उभा राहतो. त्यामुळे हा पळपुटेपणा नको, असं वाटत. खरचं कधी संपेल ही माझी बेकारी?"
Autobiography of a useless youth
Essay on autobiography
Points : Born in Poverty - Half Feeding - Parents - Education Completed - Expectations Raised - Getting a Job - Poverty Will End - Expectation of a World of Gold - Registration - Interviews Given - Neglected Happiness is broken - depression ...
"Twenty-five years have passed in my life, but to this day, not a single day of my life has gone by happily or happily. Because my fifth child was suffering from poverty. My father was working as a simple clerk. , My two siblings and my parents. Our whole situation was very miserable. "
"Similarly, my father's private company office was closed, so my father's job was lost. His meager salary was also cut off. The question of how to solve our family's one-time meal problem began to arise. "She was working on only three houses. Now she is working on seven or eight houses. My younger siblings also used to go to her to help her. My father also started cleaning the shops wherever he could. Everyone in the house was working hard." I felt very ashamed. Now I wanted to do something too. But my father always said, "You study and pass the exam with good marks, then you will have a well-paying job."
"So I studied day and night and passed the matriculation examination with good marks. I thought I would get a job soon. After that I will give happiness to my parents and start giving good education to my younger siblings. But yes! All my dreams and expectations were shattered. Applied, but in every place there was a demand for a vassal or money. In fact, even with such good marks, it was difficult to get a job as a simple soldier.
"Even though I wanted to do something out of distance, I couldn't get any work. Unwanted jobs were coming up. Some of my useless colleagues were earning some money by doing black market or bad site work. She was in touch with our brothers or grandfathers. But making money in an unethical way was not going to make me happy. "
"Even after completing my education from poor conditions, this time of unemployment did not take the name of leaving my lessons. Therefore, the annoyance and disgust of the corrupt society came. So sometimes the thought of ending one's own life and committing suicide comes to mind. Comes. In torn clothes, another's table, the father who cleans the toilet, stands in front of his eyes. So I don't want this runaway, I think. When will my unemployment really end? "