एका दलिताचे मनोगत आत्मवृत्तात्मक निबंध / आत्मनिवेदनपर निबंध

 एका दलिताचे मनोगत

आत्मवृत्तात्मक निबंध / आत्मनिवेदनपर निबंध


मुद्दे : प्रस्तावना - दंगल - प्रतिक्रिया - हरिजन - पूर्वज मागासलेले, अशिक्षित - अज्ञान, अन्याय, अंधश्रध्दा यांचे प्राबल्य - वाढती विषमता - शिकलेल्यांनी समाज बांधवांसाठी कष्ट घ्यावेत - संघशक्ती आवश्यक - स्वराज्यातून सुराज्याकडे वाटचाल हवी...


     "एक दिवस सहज वर्तमानपत्र डोळ्याखालून घालत असताना, त्यामधील वृत्त वाचून मन खूपच निराश झाले. एका शहारातील चौकात बसवलेल्या थोर समाजसुधारकाच्या पुतळ्याची कोणीतरी विटंबना केली होती. त्यामुळे शहरातील भिन्न दोन समाजातील जमातींच्या लोकांमध्ये दंगल झाली. यामध्ये खूप लोक जखमी झाले. बस, रिक्षा, टॅक्सी अशा अनेक प्रकारच्या सार्वजनिक वाहनांची तोडफोड, नासधूस करण्यात आली होती. या सर्व घटनांमधून काय साधले? 'हे दलित लोक फार माजलेत, मातलेत!' असा शेरा या संपूर्ण घटनेवर पांढरपेशी लोकांनी मारला. एवढे बोलून त्यांच्यापुरता तो विषय संपला होता. पण अशा प्रकारच्या घटनेमधून माझ्यासारख्या दलिताचे मन मात्र पेटून उठले होते."


     "पांढरपेशांनी आमच्या समाजावर 'दलित' नावाचा मारलेला अपमानास्पद शिक्का कधीच पुसला जाणार नाही का? राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी आमच्या समाजाला गौरवण्यासाठी 'हरिजन' या शब्दाचा वापर केला. पण मला असे वाटते, हा वेगळेपणा तरी का असावा? आम्ही सुध्दा मनुष्यप्राणीच आहोत ना! मग समाजातील इतरा लोकांपेक्षा आम्हांलाच वेगळे संबोधन का? अशी वेगळी वागणूक का"


     "आमच्या पूर्वज लोकांना शिक्षणाच्या विविध संधी उपलब्ध झाल्या नाहीत म्हणून ते मागास राहिले. स्वतःला सवर्ण, उच्चवर्णीय समजणाऱ्या लोकांनी आमची सावलीही टाळली. याकरीताच आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर आमच्या समाजातील सर्वांचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता आम्हाला अनेक सवलती देण्यात आल्या. शिक्षणातील तसेच विविध सरकारी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये आम्हा मागासवर्गीयांसाठी 'आरक्षणा' ची तरतूद करण्यात आली. असे करून सुध्दा देशाच्या स्वातंत्र्याला पन्नासपेक्षा अधिक वर्ष होऊन ही आमच्या दलित समाजामध्ये अज्ञान, अन्याय आणि अंधश्रद्धा यांचे फार मोठे प्राबल्य आहे."


     "थोर समाजसुधारकांनी समाजातील हि अस्पृश्यतेची, विषमतेची फार मोठी दरी बुजवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. तरी सुध्दा उच्चवर्णीय समाजा अथवा अनेक लोकांच्या मनात हा जातिभेद अजून दडलेला दिसतो. आजसुध्दा आपण खेडोपाडयामध्ये गेलो तर तेथे महारवाडे, मांगवाडे, चांभारवाडे, ढोरवाडे, होलारवाडे इत्यादी अजूनही गावाबाहेर आहेत, पण माझ्या मते असे का? आपल्या समाजाला लागलेला हा कलंक किंवा लोकांच्या मनातील हा भुरसटलेला विचार कायमचा पुसून टाकायला हवा. असे होण्यासाठी मात्र समाजातील सर्व स्तरातील लोकांचे मनोमीलन होण्याची गरज आहे. मानवधर्माचे सुत्र, 'ते माझे, मी त्यांचा एकच ओघ आम्हांतुनी वाहे' हे सर्वांच्या आचरणात यायला हवे."


     "दलित समाजातील जे लोक शिकले - सवरले आहेत. मोठ मोठ्या पदांवर कार्यरत आहेत त्यांनी स्वतःचा विकास साधल्यावर स्वतःच्या दलित समाज बांधवांना विसरून चालणार नाही. जेव्हा अशाप्रकारचा बदल होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण सर्वजन स्वतंत्र होऊ. समाजातील सवर्ण, उच्चवर्णीय आणि दलित अशा सर्वांनी एकमेकांच्या हातात हात घालून स्वराज्याकडून सुराज्याकडे वाटचाल करण्याची गरज आहे. मला मनातून पक्की खात्री आहे की, अगामी काळात अशी भक्कम, अभेद्य संघशक्ती निर्माण झालेला भारत जगाच्या नक्कीच अग्रभागी असेल! जयहिंद!


The mindset of a Dalit

 Autobiographical Essay / Essay on Autobiography

 Points : Preface - Riot - Reaction - Harijan - Ancestors Backward, Uneducated - Ignorance, Injustice, Superstition prevails - Growing inequality - Learned people should work hard for the society


 "One day, while reading a newspaper, I was disappointed to read the story. Someone had desecrated a statue of a great social reformer in a city square. There was a riot between people from two different communities in the city. Many people were injured. Buses, rickshaws and taxis.  Many types of public vehicles were vandalized and vandalized. What was the result of all these incidents?  "Such remarks were made by white people on the whole incident. The subject was over for them. But the minds of Dalits like me were ignited by such incidents."


 Will the insulting seal of 'Dalit' on our society by the white supremacists never be erased? Father of the Nation Mahatma Gandhi used the word 'Harijan' to glorify our society.  Why treat us differently than other people? Why treat us differently? "


 "Our forefathers were left behind as they did not have access to various educational opportunities. People who considered themselves upper and lower castes avoided our shadow. That is why we were given many concessions for the overall development of our society after our country became independent.  "Reservation was made for the backward classes. Even so, more than fifty years after the independence of the country, ignorance, injustice and superstition are rampant in our Dalit society."


 "The great social reformers tried their best to bridge this huge gap of untouchability and inequality in the society. However, this caste discrimination still seems to be hidden in the minds of the upper caste community or many people.  But in my opinion, why is this? The stigma of our society or this stereotype in the minds of the people should be eradicated forever.  Must act. "


 "People in the Dalit community who have learned and prospered. Those who are working in high positions will not forget their own Dalit community as they develop themselves. Only when such a change takes place will we all become truly independent.  There is a need to move from Swarajya to Surajya.