पहाटेची भ्रमंती किंवा एक प्रसन्न पहाट
मार्च महिन्यामध्ये माझ्या वार्षिक परीक्षा संपल्या. वर्षभर अभ्यास करून थकलेल्या मनाला थोडा आराम मिळावा. मनामध्ये पुन्हा उत्साह निर्माण होवा. म्हणून मी या सुट्टीत माझ्या मित्राच्या गावाला जाण्याविषयी बाबांकडून अगोदर परवानगी मिळवली होती. माझा अभ्यास, वर्षभराची मेहनत पाहून बाबांनी सुध्दा मनमोकळेपणाने मला परवानगी दिली होती. त्यामुळे परीक्षा संपल्या संपल्या मी गावाला जाण्याची तयारी केली आणि मी या उन्हाळी सुट्टीत माझा वर्गमित्र दुर्गेश याच्या गावी जायचे निश्चित केले. ठरवल्याप्रमाणे दुर्गेशच्या गावी येऊन पोचलो. जेव्हा मी दुर्गेशच्या गावाला पोहचलो तेव्हा खुपच रात्र झाली होती. दिवसभर शेतामधील काबाडकष्टाची कामे करून गाव एकदम शांत झोपी गेले होते. दुर्गेशच्या घरातील सर्व कुटुंबियांनी अतिशय आनंदाने माझे मोठ्य प्रेमाने स्वागत झाले. रात्रीचे स्वादिष्ट, चवदार, गावाकडचे लज्जतदार जेवण घेतल्यावर केव्हा निद्रादेवीने माझ्या अंगावर आपले पांघरूण घातले, ते मला कळलेच नाही.
मला अगदी पहाटे पहाटे जाग आली, तेव्हा आजुबाजूला अजून सुध्दा सर्वत्र अंधार होता. मी जागा झालो तेव्हा पहाट सुध्दा झालेली नसावी. दुर्गेशच्या घरातील सर्व मंडळी मात्र झोपेतून जागी झालेली होती. त्या सर्वांची दररोजची कामे शांतपणे चालू होती. पहाटेची भटकंती करण्यासाठी मी आणि दुर्गेश घराबाहेर पडलो. दोघेजण इकडच्या तिकडच्या गप्पा मारत हळूहळू पुढे पुढे चालत होतो. दुर्गेश त्याच्या गावातील विविध गंमती- जमती याविषयी मला सांगत होता. गावातील सर्वच मंडळी जागी झाली होती. सर्वांची आपआपली कामे शांतपणे चालू होती.
सूर्योदय अद्याप झालेला नव्हता. सभोवार दिशा नुकत्याच उजळत होत्या. आता मात्र सारा गाव हळूहळू झोपेतून जागा होत होता. प्रत्येक घरासमोर अंगणात सडा - सारवण, झाडलोट, गुरा-ढोरांची ही कामे चालू होती. सर्वत्र गावातील वातावरण शांत, प्रसन्न आणि मनमोहक होते. शांतपणे हे सर्व दृश्य पाहत पाहत मी आणि दुर्गेश चालत होतो. गर्दीने गजबजलेल्या, नेहमी धावपळीच्या शहरात कधी अनुभवायला न मिळणारी नीरव शांतता, अल्हाददायकता, थंडगार गारवा व प्रसन्नता माझ्या मनाला सुखावत होती.
लवकरच आम्ही एका जवळच्या टेकडीवर येऊन पोचलो. सूर्योदय होण्याला आता थोडाच वेळ शिल्लक असावा म्हणून आता आजूबाजूला अंधुक अंधुक दिसू लागले होते. आकाशातील सर्व तारे हळूहळू दिसेनाशे होऊ लागले होते.
पूर्व दिशेला आकाश आता केशरी, गुलाबी, पिवळ्या अशा विविध रंगांच्या छटांनी उजळून निघायला सुरुवात झाली होती. एखाद्या सर्कसमधील विदूषकाने क्षणोक्षणी रंगीबेरंगी कपडे बदलावेत तसाच हा सर्व प्रकार मला वाटत होता. त्या क्षणी बालकवींची ओळ मनामध्ये जागी झाली -
'कुणी उधळिली ही मूठ नभी लाल गुलालाची!'
पाहता पाहता हळूहळू पूर्वेकडील क्षितिजाची कडा पिवळसर सोनेरी होऊ लागली. सर्वत्र पक्ष्यांच्या किलबिलाटाने झाडे सुध्दा जागी होऊ लागली होती. पूर्वेला मनमोहक अरुणोदय होत होता. पूर्वेकडील क्षितिज तेजोमय झाले होते. मनात आले, ही रम्य प्रसन्न अल्हाददायक अशी पहाट जो अनुभवतो, त्याचे अंतःकरणही तसेच विशाल होते. म्हणून तर खेडेगावांतून, गावागावातून अजूनही मानवतेचे, माणसुकीचे उद्दात दर्शन आपल्याला घडते!
त्या प्रसन्न वातावरणात, नीरव शांतता असणाऱ्या हिरव्यागार परिसरामध्ये काही क्षण घालवून आम्ही परत फिरलो. परतीच्या वाटेवर प्रत्येक घरांच्या छोट्या अंगणात तुळशीवृंदावनांपुढे रांगोळ्यांचे छान आणि उठावदार नक्षीकाम दिसले. काही घरांपुढे तर विविध रंगांनी रांगोळीकाम सजवले असल्यामुळे ते मनाला खूप मोहित करत होते. ते सुंदर नक्षीकाम पाहून त्यांचा फोटो मोबाइल मध्ये काढण्याचा माझा मोह आवरला नाही. या सर्व अविस्मरणीय आठवणी मी माझ्या मोबाइल जपून ठेवायच्या असे ठरवले होते. रानाकडे चारा खाण्यासाठी निघालेल्या गुरांच्या गळ्यांतील घंटा किणकिणत होत्या. दूरवरून मंदिरातील सनईचे मंजूळ सूर कानांवर पडत होते. सारे गाव आता कामाला लागले होते. पण शहरातील सततची धावपळ, धांदल, गर्दी त्यात कोठेच दिसत नव्हती. सगळीकडे वातावरणामध्ये 'प्रसन्नता, आल्हाददायकता, मनाला निरव आत्मसुख देणारी शांतता' भरून राहिली होती. होनाजी या प्रसिद्ध शाहीरची 'अमर भूपाळी' जणू या ठिकाणी साकार झाली होती.
पहाटेच्या या आज झालेल्या आगळ्यावेगळ्या भ्रमंतीने आपण समृद्ध झालो आहोत, असे मला वाटले.
खालील निबंधांचे सुध्दा वाचन करा.
पहाटेची भ्रमंती ( वर्णनात्मक निबंध ) :
https://essayseries1.blogspot.com/2020/12/blog-post.html
माझा आवडता कलावंत (व्यक्तिचित्रणात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2020/12/blog-post_31.html
मी सह्याद्री बोलतोय... (आत्मवृत्तात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post.html
सूर्य मावळला नाही तर... (कल्पनाप्रधान निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_2.html
तंत्रज्ञानाची किमया ( वैचारिक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_81.html
आमची अविस्मरणीय सहल (वर्णनात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_4.html
माझे आवडते शिक्षक (व्यक्तिचित्रणात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_5.html
वृत्तपत्राचे मनोगत (आत्मवृत्तात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_6.html
पेट्रोल संपले तर... (कल्पनाप्रधान निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_7.html
वाचते होऊया ( वैचारिक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_15.html
मी अनुभवलेला लॉकडाऊन ( वर्णनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/%20%20%20Maharashtra%20Lockdown%20Extended%20Till%2031%20January%202021%20-%20%20%20....html
माणुसकीचा झरा - बाबा आमटे (व्यक्तिचित्रणात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_74.html
शेतकऱ्याचे आत्मवृत्त ( आत्मवृत्तात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_29.html
परीक्षा रद्द झाल्या तर... (कल्पनाप्रधान निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_64.html
आजची स्त्री (वैचारिक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/02/blog-post.html
ऋतुराज वसंत ( वर्णनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/02/blog-post_2.html
माझी कारखान्याला भेट ( कथनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/02/blog-post_3.html
माझे आजोबा (व्यक्तिचित्रणात्मक निबंध / शब्दचित्रणात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/02/blog-post_7.html
राष्ट्रपिता बापूजी - एक थोर आदर्श किंवा माझा आवडता पुढारी ( चरित्रात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/02/blog-post_9.html
एका क्रांतिकारकाचे मनोगत किंवा हुतात्म्याचे मनोगत किंवा देशभक्ताचे आत्मवृत्त ( आत्मवृत्तात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/02/blog-post_13.html
ज्ञानेश्वरांची समाधी बोलू लागली तर.... (कल्पनाविलासात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post.html
आई, थोर तुझे उपकार किंवा आई-एक महान दैवत किंवा न ऋण जन्मदेचे फिटे ( चितंनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_24.html
आम्हांला मातृभाषेचा अभिमान आहे का? किंवा मातृभाषेचे ऋण ( चर्चात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_25.html
विना सहकार नाही उद्धार किंवा एकमेकां साहाय्य करू | अवघे धरू सुपंथ ( सुभाषितपर निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_26.html
मागणीपत्र / विनंतीपत्र ( पत्रलेखन नमुना कृती - १ ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_54.html
विनंतीपत्र / मागणीपत्र : पत्रलेखन - उपयोजित लेखन कृती आराखडा क्र. २ - विषय : मराठी. : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_28.html
अभिनंदन पत्र - पत्रलेखन नमुना कृती -३ : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post_8.html
माणूस हसण्याची शक्ती गमावून बसला तर... ( कल्पनारम्य निबंध / कल्पनाविलासात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_27.html
मी करोडपती झाले तर... (कल्पनाविलासात्मक निबंध / कल्पनारम्य निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_29.html
वीज बंद पडली तर... (कल्पनाविलासात्मक निबंध / कल्पनारम्य निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_83.html
गूड फ्रायडे : पवित्र शुक्रवार, शुभ शुक्रवार, महा शुक्रवार, की काळा शुक्रवार...! : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_30.html
व्यायामाचे जीवनातील महत्त्व ( चिंतनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_31.html
जाहिरातीचे युग किंवा जाहिरातीची कला ( चिंतनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post.html
लोकसंख्येचा भस्मासूर किंवा लोकसंख्यावाढ - एक भस्मासूर किंवा लोकसंख्येचा विस्फोट ( चिंतनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post_3.html
नापास झालेल्या विद्यार्थ्याचे आत्मकथन ( आत्मवृत्तात्मक निबंध किंवा आत्मनिवेदनपर निबंथ ) : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post_4.html
समाज घडविण्यात युवकांची जबाबदारी किंवा समर्थ तरूण - समर्थ भारत किंवा आम्ही नवभारताचे शिल्पकार (चिंतनात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post_5.html
प्रसारमाध्यमांची सामाजिक बांधिलकी किंवा प्रसारमाध्यमे विद्यार्थ्यांना बिघडवतात का? ( चर्चात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post_6.html
गुढीपाडवा - शुभसंदेश Gudhi Padva - Good Wishes : https://essayseries1.blogspot.com/2021/04/gudhi-padva-good-wishes.html
डॉ. बाबासाहेब आंबेडकर : दलित-समाजसूर्य (चरित्रात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post_12.html
वर्णनात्मकनिबंध