मराठी निबंध मालिक Marathi Essayseries : इयत्ता ८ वी ते १२ वी या इयत्ताकरीता विविध परीक्षांसाठी मराठी विषयाच्या विविध घटकावर आधारीत ही निबंधमाला आपल्याकरीता सादर करताना खूप आनंद होत आहे. नक्कीच वार्षिक परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांचे गुणाकंन वाढवण्यास याचा उपयोग होईल. या मालिकेत वर्णनात्मक निबंध, कथनात्मक निबंध, चिंतनात्मक निबंध, चर्चात्मक निबंध, आत्मविलासात्मक निबंध, पत्रलेखन, सुभाषितपर निबंध, चरित्रात्मक निबंध, आत्मनिवेदनपर निबंध, कल्पनाविलासात्मक निबंध यावर आधारित अनेक निबंध दिले आहेत. धन्यवाद!
या जगाच्या वेगासोबत धावताना मानवाला चार क्षण विरंगुळ्याचे अनुभवावेसे वाटतात. त्याची ही स्वइच्छा पूर्ण करण्याचे काम करतात ते विविध कला आपल्यापर्यंत पोहोचवणारे प्रतिभावंत कलावंत. कलेच्या जोरावर आकाशाला छेदणाऱ्या, प्रत्येकाला आपलेसे करून ठेवणाऱ्या या कलावंतांचे 'सुख आणि स्वप्नांचे कारखानदार' असे अचूक वर्णन अनंत काणेकरांनी केले आहे. हा कलावंत आपल्या ठायी वसणाऱ्या विविध प्रतिभेच्या माध्यमातून रसिकजनांच्या मनोरंजनाची भूक भागवत असतात. अशा विविध प्रतिभावंत कलावंतापैकी माझा आवडता कलावंत कोण? हा प्रश्न येताच माझ्या नजरे समोर उभा राहतो, 'एक अद्वितीय विदुषक, एक महान गायक आणि एक वेसंगी लेखक जो माझ्या मनात लहानपणापासून दडून आहे' हे सांगणारा महान विनोदी लेखक, उत्तम गायक, उकृष्ट संगीतकार, उत्तम नट आणि भला माणूस असलेले पु. ल. देशपांडे. पुस्तकांचे वाचन करता करता साहित्यविश्वात प्रवेश केल्यावर मला भेटलेली एक अवखळ, विनोदी आसामी म्हणजे पु. ल. देशपांडे होय. 'पोटापाण्याचा कामधंदा तुम्हांला जगवील, पण विविध कलांसोबत जमलेली मैत्री तुम्हांला का जगायचं हे सांगून जाईल' असे म्हणणारे पु. ल. देशपांडे हे बटाट्याच्या चाळीतून माझ्या मनात अलगद प्रवेश करतात आणि एक आवडता कलावंत बनून माझ्या मनात कायमचे वसतात.
नाटककार, लेखक, पटकथाकार व कथाकार, दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक आणि अभिनेता अशा अनेक भूमिकांनी अनेकांच्या मनात अभेद जागा करणारे महाराष्ट्रातील लाडके व्यक्तिमत्त्व म्हणजे पु. ल. देशपांडे. अनेकविध कला सोबत घेऊन, अत्यंत भोळा आणि साधासुधा जगणारा हा कलाकार म्हणजे एक अवलियाच. चालता - बोलता सहजपणे विनोद तयार करणारा हा वल्ली आपल्या विनोदांप्रमाणेच अवखळ अन् निरागस मनाचा होता असा त्यांच्या परिचितांचा अनुभव आहे.
पु. ल. देशपांडे यांनी जवळपास चाळीस पुस्तके लिहिली. त्यामध्ये 'बटाट्याची चाळ', 'असामी असामी', 'व्यक्ती आणि वल्ली', 'गोळाबेरीज', 'हसवणूक' अशा त्यांच्या अद्वितीय पुस्तकांमधून ते वाचकमनावर राज्य करू लागले. त्यांच्या लेखनातील जिवंतपणामुळे त्यांच्या प्रत्येक पुस्तकातील विनोद आजवर कधीच जुने वाटले नाहीत. ते प्रत्येक वेळी मलाच नव्हे, तर मराठी वाचकांस तितकेच खळखळून हसवत आहेत. त्यांची 'पूर्वरंग', 'अपूर्वाई', 'जावे त्यांच्या देशा' अशी त्यांनी केलेली विविधप्रवासवर्णनेही त्यांच्या निरीक्षणशक्तीची चुणूक दाखवतात. त्यांचे 'एक कोळियाने', 'ती फुलराणी' हे अनुवादित साहित्य अनुवाद या क्षेत्रात मानाचा मानदंड स्थापन करणारे ठरले. हे साहित्य अनुवादित नसून ते आपल्याच मराठी मातीत आधीपासूनच जन्मलेले वाटावे इतकी सहजता त्यांच्या अनुुवादात होती. लेखनावर जसे त्यांचे प्रभुत्व होते, तसेच इतर विविध कलांमध्येही त्यांचा अचूक हातखंडा होता. हार्मोनियमवर त्यांची बोटं सहजपणे फिरत असत, अभिनयाची कलाही त्यांच्या अंगी लहानपणापासूनच वसली होत. 'गुळाचा गणपती' या चित्रपटातील त्यांची कला हरहुन्नरी कलावंताचे दर्शन घडवतो. उत्तम दिग्ददर्शनाबरोबरच उत्तम संगीत दिग्दर्शक म्हणूनही ते सर्वत्र परिचित होते.
पु. ल. देशपांडे यांनी केवळ कलेच्या विविध क्षेत्रातच मुशाफिरी केली असे नाही, तर त्यांना मिळालेल उदंड लोकप्रियेतेचा कधीच विचार न करता विविध सामाजिक प्रश्नांबाबत स्वतःची स्पष्ट भूमिकाही घेतली. वेळप्रसंगी वादही घातले, पण त्यांनी आपल्या वैचारिक मतभेदांचे रूपांतर कधीही शत्रूत्वात होऊ दिले नाही. व्यक्तीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला विरोध करणारी राजवट उलथून टाकायला हवी याची जाणीव झाल्यावर हा कलावंत राजकीय लढ्यातही उतरला आणि महत्त्वाचे म्हणजे ही लढाई संपल्यावर ह्या कलावंताने कोणत्याही पक्षाचा टिळा लावून न घेता पुन्हा आपल्या लेखनाच्या विश्वात परतला.
'जन्म आणि मृत्यू' या दोन्ही दरीच्या तावडीत न सापडता नियतीने चालवलेली आपली फसवणूक पाहिली ना की आपुलकीने जगणाऱ्या रसिकांची हसवणूक करण्यापलीकडे आपल्या हाती काय उरते?' असे सहज निरागस मनाने विचारणारा हा अवलिया नकळतपणे जीवनाचे सार सांगून जातो. या महान, अनोख्या कलाकाराने रवींद्र साहित्य संगीतापासून, कुमार गंधर्वाच्या सुफी संगीतापर्यंत, निर्गुण भजनांपर्यंत या सर्वामधील कलारस भरभरून अनुभवला. पु. ल. बालगंधर्वाच्या प्रत्येक संगीत नाटकात जेवढे रमले तसे ते बाबा आमटेंच्या आनंदवनातही तेवढेच रमले. घनदाट जंगलात कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आणि सेवेसाठी करत असलेल्या कामात आमटेंबरोबर पु. ल. नाही हातभार लावला. दिनदलितांच्या वेदना व्यक्त करणाऱ्या विद्रोही साहित्याशीही ते तितकेच एकरूप झाले. या सर्वामधून हा कलावंत साहित्याशी जेवढा एकरूप होता तेवढाच तो समाजाशीही एकरूप झाला होता हे चटकन लक्षात येते.
संगीत नाटक अकादमी, साहित्य अकादमी हे दोन्ही श्रेष्ठ पुरस्कार मिळवणारे पु. ल. सामाजिक क्षेत्रातही कार्यरत होते. त्यांच्या या कार्याच्या गौरवार्थ त्यांचा एक स्टँपही सरकारने काढला होता. पु. ल. देशपांडे हे अनेक कलांचे सर्वश्रेष्ठ वरदान लाभलेला अनोखा कलावंत होता, ज्याने सर्वांनाच एवढे काही दिले, की 'किती घेशील दो कराने' अशी सर्वांचीच अवस्था झाली. म्हणूनच, म्हणावेसे वाटते
परीक्षा रद्द झाल्या तर... (कल्पनाप्रधान निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_64.html
आजची स्त्री (वैचारिक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/02/blog-post.html
ऋतुराज वसंत ( वर्णनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/02/blog-post_2.html
माझी कारखान्याला भेट ( कथनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/02/blog-post_3.html
माझे आजोबा (व्यक्तिचित्रणात्मक निबंध / शब्दचित्रणात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/02/blog-post_7.html
राष्ट्रपिता बापूजी - एक थोर आदर्श किंवा माझा आवडता पुढारी ( चरित्रात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/02/blog-post_9.html
एका क्रांतिकारकाचे मनोगत किंवा हुतात्म्याचे मनोगत किंवा देशभक्ताचे आत्मवृत्त ( आत्मवृत्तात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/02/blog-post_13.html
ज्ञानेश्वरांची समाधी बोलू लागली तर.... (कल्पनाविलासात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post.html
आई, थोर तुझे उपकार किंवा आई-एक महान दैवत किंवा न ऋण जन्मदेचे फिटे ( चितंनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_24.html
आम्हांला मातृभाषेचा अभिमान आहे का? किंवा मातृभाषेचे ऋण ( चर्चात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_25.html
विना सहकार नाही उद्धार किंवा एकमेकां साहाय्य करू | अवघे धरू सुपंथ ( सुभाषितपर निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_26.html
विनंतीपत्र / मागणीपत्र : पत्रलेखन - उपयोजित लेखन कृती आराखडा क्र. २ - विषय : मराठी. : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_28.html
अभिनंदन पत्र - पत्रलेखन नमुना कृती -३ : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post_8.html
माणूस हसण्याची शक्ती गमावून बसला तर... ( कल्पनारम्य निबंध / कल्पनाविलासात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_27.html
मी करोडपती झाले तर... (कल्पनाविलासात्मक निबंध / कल्पनारम्य निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_29.html
वीज बंद पडली तर... (कल्पनाविलासात्मक निबंध / कल्पनारम्य निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_83.html
गूड फ्रायडे : पवित्र शुक्रवार, शुभ शुक्रवार, महा शुक्रवार, की काळा शुक्रवार...! : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_30.html
व्यायामाचे जीवनातील महत्त्व ( चिंतनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_31.html
जाहिरातीचे युग किंवा जाहिरातीची कला ( चिंतनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post.html
लोकसंख्येचा भस्मासूर किंवा लोकसंख्यावाढ - एक भस्मासूर किंवा लोकसंख्येचा विस्फोट ( चिंतनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post_3.html
नापास झालेल्या विद्यार्थ्याचे आत्मकथन ( आत्मवृत्तात्मक निबंध किंवा आत्मनिवेदनपर निबंथ ) : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post_4.html
समाज घडविण्यात युवकांची जबाबदारी किंवा समर्थ तरूण - समर्थ भारत किंवा आम्ही नवभारताचे शिल्पकार (चिंतनात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post_5.html
प्रसारमाध्यमांची सामाजिक बांधिलकी किंवा प्रसारमाध्यमे विद्यार्थ्यांना बिघडवतात का? ( चर्चात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post_6.html
गुढीपाडवा - शुभसंदेश Gudhi Padva - Good Wishes : https://essayseries1.blogspot.com/2021/04/gudhi-padva-good-wishes.html
डॉ. बाबासाहेब आंबेडकर : दलित-समाजसूर्य (चरित्रात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post_12.html