मी सह्याद्री बोलतोय...
नमस्कार मित्रांनो, मी सह्याद्री. असे आश्चर्याने काय पाहताय? हो मी सह्याद्रीच बोलतोय.
'नानारुपी झाडे फुले
किलबिलाट पक्ष्यांचा सतत तिथे,
घुमते आहे आजही नाव शिवबाचे,
चकाकते आहे जेथे तलवारीचे पाते॥'
हो, तोच मी.... सह्याद्री महाराष्ट्र राज्याच्या भूगोलाचा एक अविभाज्य भाग आणि या महाराष्ट्राच्या महान इतिहासाचा मी एक साक्षीदार आहे. काळ्या पाषाणाच्या निधड्या छातीवर अनेक वर्षे घाव सहन करत आजही महाराष्ट्रभूमीला सुरक्षित ठेवणारा मी, तिच्या रक्षणार्थ झिजणारा मीच म्हणजे सह्याद्री. नजाणे कित्येक प्रकारची झाडे, वृक्ष, वेली, कित्येक प्रकारचे पक्षी आणि प्राणी माझ्या कुशीत जन्मले, तेथेच निपजले. अन माझ्याच खुशीत मोठे झाले. निसर्गाची, या सृष्टीची कित्येक गुपिते मी माझ्या उरात कित्येक वर्षापासून जपून ठेवली आहेत.. हजारो जाती - प्रजातीचे वनस्पती, प्राणी, पक्षी, लतावेली म्हणजे माझे वैभव. हे वैभव अनेक संकटांचा सामना करत, न डगमगता निरंतर सांभाळत आजही मी दिमाखात उभा आहे. यातील कित्येक वृक्षांच्या प्रजाती तर अख्ख्या जगात कुठेही सापडत नाहीत. माझा हा दुर्गम प्रदेश माणसांपेक्षा या पक्षांनी, या प्राण्यांनी, या वृक्षांनी आपलासा केला. कित्येक नद्यांना माझ्या या काळ्या पाषाणातून पाझर फुटला. भीमा, गोदावरी, कावेरी, कृष्णा, कोयना, तापी, नर्मदा आजही माझ्या महाराष्ट्रात खळाळून वाहत सर्वत्र आनंद पसरवत आहेत.
माझे भूगोलातील स्थान तर अढळ होतेच, पण मला इतिहासात स्थान मिळवून दिले ते माझ्या स्वराज्य संस्थापकाने माझ्या छत्रपती शिवरायाने!
'कणकण तिथला देत आहे
साक्ष माझ्या शिवबाच्या इतिहासाची ॥
आहेत उमटलेली पावले तेथे आजही
मावळ्यांच्या पराक्रमाची, त्यांच्या शौर्याची ॥'
माझ्या शिवबाने त्याच्या पराक्रमाची गाथा माझ्या या काळ्या पाषाणावर गोंदली. शिवबाच्या शौर्याने स्थापन झालेले स्वराज्य मी याचि देही याचि डोळा पाहिले. माझ्या शिवबाला साहाय्य करणारे कित्येक लढवय्ये, शिवरायांचे जिवलग मावळे माझ्या या कुशीत जन्मले आणि आपल्या शौर्याने त्यांनी माझ्या मस्तकात मानाचा तुरा खोवला. या सर्व वीरांच्या, मावळ्यांच्या रक्ताने माझी भूमी पावन झाली. आपल्याच उदरी निपजलेल्या या शूरांना आपल्याच ओटीत स्वतःचा प्राण सोडताना पाहून काळजावर तितकेच कठोर घावही झाले, पण स्वराज्याचे स्वप्न जसे महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेने पाहिले होते तसे मीही पाहिले होते आणि ते या बलिदानांनीच साकार झालेले मी अनुभवले. या वीरांनी माझे नाव इतिहासात नोंदवले ते कायमचे. मावळ्यांच्या माझ्या दऱ्याखोऱ्यातील केलेल्या गनिमी काव्याला साथ देत मीही स्वराज्य निर्मितीत खारीचा वाटा उचलला. एका समृद्ध काळाचा, एका विशाल स्वराज्याचा मी साक्षीदार बनलो. पण आता....
वर्तमानात मात्र तुम्ही माझे सारे वैभव लुटू पाहताय. ज्या भूमीच्या रक्षणार्थ वीरांनी प्राण गमावले. त्याच भूमीला उजाड, ओसाड करून त्यावर उद्योगधंद, शहरे वसवून आजचा माणूस यशाचे झेंडे गाडत आहे. स्वतःच्या स्वार्थापायी माझ्या अंगावर सुरूंग लावून मला जखमी करत आहे. मला दररोज रक्तबंबाळ करत आहेत माझ्यातून वाहणाऱ्या पवित्र नद्यांना तो दूषित करत आहे. नद्यांमध्ये विविध प्रकारच्या घाणीचे साम्राज्य पसरवत आहेत. माझ्यात वाढणाऱ्या पशुपक्ष्यांच्या, वनस्पतींच्या कित्येक प्रजाती आज नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. माझे वैभव मी गमावत चाललो आहे, पण मित्रांनो, शत्रूचे घाव निधड्या छातीने झेलणारा मी आपल्याच माणसांनी घातलेले घाव सहन करण्यास आता मात्र असमर्थ ठरत आहे. आज माझ्या अस्तित्वाचा, माझ्या दीर्घ इतिहासाचा लोकांना विसर पडत आहे. माझी शान असलेले गड, किल्ले आज खचून कोसळत आहेत आणि त्यांच्या संरक्षणाची जाण मात्र थोडक्यांनाच असावी.... ही दुःखाची बाब आहे.
मित्रांनो, माझे येथे असणे हे भौगोलिकदृष्टया फार महत्त्वाचे आहे. माझे असणेच तुमच्या सुरक्षिततेला, तुमच्या समृध्द जीवनाला जपणारे आहे. माइयात वसलेले हे वृक्ष, लता, पशू - पक्षी ही माझीच नाही, तर ही तुमचीही संपत्ती आहे. आज जगात जैवविविधतेचे अतिसंवेदनशील क्षेत्र म्हणून मला ओळखले जाते, पण माझा ऱ्हास होण्याचा वेग पाहता माझे भविष्य बिकट असल्याचे जाणवते. मी अस्तित्व विनाशाकडे वाटचाल करतय अस वाटतय. माझा इतिहास आज धूसर होत चाललाय याची जाणीव मला सतत होत आहे. हे सारे थांबवणे तुमच्या हातात आहे. तुम्ही माझ्यात दडलेला, मुरलेला इतिहास शोधावा. तो वाचावा आणि तो जगाव असे मला मनापासून वाटते. मी महाराष्ट्राच्या इतिहासाचे सुवर्णपान आहे. मला इतिहासात हरवू देऊ नका.
खालील निबंधांचे सुध्दा वाचन करा.
पहाटेची भ्रमंती ( वर्णनात्मक निबंध ) :
https://essayseries1.blogspot.com/2020/12/blog-post.html
माझा आवडता कलावंत (व्यक्तिचित्रणात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2020/12/blog-post_31.html
मी सह्याद्री बोलतोय... (आत्मवृत्तात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post.html
सूर्य मावळला नाही तर... (कल्पनाप्रधान निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_2.html
तंत्रज्ञानाची किमया ( वैचारिक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_81.html
आमची अविस्मरणीय सहल (वर्णनात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_4.html
माझे आवडते शिक्षक (व्यक्तिचित्रणात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_5.html
वृत्तपत्राचे मनोगत (आत्मवृत्तात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_6.html
पेट्रोल संपले तर... (कल्पनाप्रधान निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_7.html
वाचते होऊया ( वैचारिक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_15.html
मी अनुभवलेला लॉकडाऊन ( वर्णनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/%20%20%20Maharashtra%20Lockdown%20Extended%20Till%2031%20January%202021%20-%20%20%20....html
माणुसकीचा झरा - बाबा आमटे (व्यक्तिचित्रणात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_74.html
शेतकऱ्याचे आत्मवृत्त ( आत्मवृत्तात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_29.html
परीक्षा रद्द झाल्या तर... (कल्पनाप्रधान निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_64.html
आजची स्त्री (वैचारिक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/02/blog-post.html
ऋतुराज वसंत ( वर्णनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/02/blog-post_2.html
माझी कारखान्याला भेट ( कथनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/02/blog-post_3.html
माझे आजोबा (व्यक्तिचित्रणात्मक निबंध / शब्दचित्रणात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/02/blog-post_7.html
राष्ट्रपिता बापूजी - एक थोर आदर्श किंवा माझा आवडता पुढारी ( चरित्रात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/02/blog-post_9.html
एका क्रांतिकारकाचे मनोगत किंवा हुतात्म्याचे मनोगत किंवा देशभक्ताचे आत्मवृत्त ( आत्मवृत्तात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/02/blog-post_13.html
ज्ञानेश्वरांची समाधी बोलू लागली तर.... (कल्पनाविलासात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post.html
आई, थोर तुझे उपकार किंवा आई-एक महान दैवत किंवा न ऋण जन्मदेचे फिटे ( चितंनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_24.html
आम्हांला मातृभाषेचा अभिमान आहे का? किंवा मातृभाषेचे ऋण ( चर्चात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_25.html
विना सहकार नाही उद्धार किंवा एकमेकां साहाय्य करू | अवघे धरू सुपंथ ( सुभाषितपर निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_26.html
मागणीपत्र / विनंतीपत्र ( पत्रलेखन नमुना कृती - १ ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_54.html
विनंतीपत्र / मागणीपत्र : पत्रलेखन - उपयोजित लेखन कृती आराखडा क्र. २ - विषय : मराठी. : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_28.html
अभिनंदन पत्र - पत्रलेखन नमुना कृती -३ : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post_8.html
माणूस हसण्याची शक्ती गमावून बसला तर... ( कल्पनारम्य निबंध / कल्पनाविलासात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_27.html
मी करोडपती झाले तर... (कल्पनाविलासात्मक निबंध / कल्पनारम्य निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_29.html
वीज बंद पडली तर... (कल्पनाविलासात्मक निबंध / कल्पनारम्य निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_83.html
गूड फ्रायडे : पवित्र शुक्रवार, शुभ शुक्रवार, महा शुक्रवार, की काळा शुक्रवार...! : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_30.html
व्यायामाचे जीवनातील महत्त्व ( चिंतनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_31.html
जाहिरातीचे युग किंवा जाहिरातीची कला ( चिंतनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post.html
लोकसंख्येचा भस्मासूर किंवा लोकसंख्यावाढ - एक भस्मासूर किंवा लोकसंख्येचा विस्फोट ( चिंतनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post_3.html
नापास झालेल्या विद्यार्थ्याचे आत्मकथन ( आत्मवृत्तात्मक निबंध किंवा आत्मनिवेदनपर निबंथ ) : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post_4.html
समाज घडविण्यात युवकांची जबाबदारी किंवा समर्थ तरूण - समर्थ भारत किंवा आम्ही नवभारताचे शिल्पकार (चिंतनात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post_5.html
प्रसारमाध्यमांची सामाजिक बांधिलकी किंवा प्रसारमाध्यमे विद्यार्थ्यांना बिघडवतात का? ( चर्चात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post_6.html
गुढीपाडवा - शुभसंदेश Gudhi Padva - Good Wishes : https://essayseries1.blogspot.com/2021/04/gudhi-padva-good-wishes.html
डॉ. बाबासाहेब आंबेडकर : दलित-समाजसूर्य (चरित्रात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post_12.html