सूर्य मावळला नाही तर... (कल्पनाप्रधान निबंध)

 सूर्य मावळला नाही तर...


'सूर्य पुरवू द्या सार जीवनासा|
प्राणवायू अन् अन्न सजीवांसी॥
ऋतूचक्रही सदैव फिरवू दे तो|
इथे जो तो स्तोत्रेच त्याची गातो॥'
          असा हा संपूर्ण विश्वाला तेजोमय करणारा, आपल्या प्रखर प्रकाशाने उजळून टाकणारा, सर्व जगाचा दाता म्हणजेच सूर्य, साऱ्या सृष्टीला दृश्यमान करणारा, काळ्या कुट्ट अंधाराला चिरत पुढे सरसावणारा आणि पृथ्वीतलावरील सर्व सृष्टीतील चराचरांत ऊर्जा फुंकणारा, न चुकता रोज आपल्या भेटीला येणारा अन् पुन्हा भेटण्याची खात्रीशीर हमी देऊन थोडा काळ डोंगराआड गुडूप होणारा. हा सूर्य जर मावळलाच नाही तर.... सरांच्या वर्गात विचारलेल्या या प्रश्नाची थोडी गंमत वाटली. 'सूर्य मावळला नाही तर...' तर काय, रात्र होणार नाही. खेळायला, मित्रांसोबत भटकायला, अंधाराची पाबंदी राहणार नाही. जेव्हा वाटेल तेव्हा झोपेतून जागे व्हावे, वाटेल तेव्हा बेडवर जाऊन झोपणे शक्य होईल. देशातील सर्व ऑफिसच्या वेळाही बदलतील. त्यामुळे, सर्व लहान मुलांना, घरातील सर्व  भावंडांना आई - बाबांची सोबत अधिक लाभेल. गावातील, शहरातील चोऱ्यामाऱ्या तर पूर्णपणे बंद होतील. सारी दुकाने, मॉल्स कायम चालू राहतील. वाटेल तेव्हा वाटेल तिकडे फिरता येईल. न थांबता साऱ्या गोष्टी करता येतील. किती गंमत येईल या विचारांनी  मन खूश झाले, पण काही क्षण विचार केला आणि मी पुन्हा स्तब्ध झालो.
          खरचं सूर्य मावळला नाही तर... तर दिवसानंतर रात्रीचे आगमन कधी होणारच नाही, पर्यायाने साऱ्या सृष्टीला आराम देणारी, थोडासा विसावा देणारी रात्र जीवनातून नाहीशी होईल. दिवसभराच्या धावपळीने थकलेल्या माणसाला रात्रीची निरव शांतता कशी बर लाभणार? लहान मुलांना आपलासा वाटणारा चांदोमामा आकाशात दिसणारच नाही. विविध लखलखत्या चांदण्यांनी आकाश सजणार नाही आणि या रात्रीवर कुठली कविताच रचली जाणार नाही. जीवन अगदीच निरस, कंटाळवाणे होईल. नदीकिनारी, डोंगरमाथ्यांवर सायंकाळी होणारे सूर्यास्ताचे सौंदर्य कसे बरे पाहायला मिळणार? सकाळी सकाळी चारा शोधण्यासाठी घरटयातून बाहेर पडलेल्या पाखरांना घरी परतायची सूचना या मावळतीच्या सूर्याशिवाय कोण बरं देणार? 'झोपा रे... खुप रात्र झाली' असे म्हणत आईचा गोड ओरडा कसा बरे मिळणार? लहान बाळाला निजवण्यासाठी चांदोमामा नसलेले अंगाईगीत आई कसे बरे गाणार? खरंच... सारं काही बेचव होऊन जाईल. संपूर्ण जीवनच निरस होईल.
          वास्तवाचा विचार करता सूर्य उगवणे - मावळणे या चक्रावर आधारलेली ही सृष्टी हे चक्र थांबताच विस्कळीत होईल. सूर्याची प्रखर उष्णता पूर्ण वेळ सहन करणे पृथ्वीवरील कोणत्याही सजीव प्राण्याला शक्य होणार नाही. अनेक प्राण्यांच्या, वनस्पतींच्या, पक्षांच्या प्रजाती यामुळे या पृथ्वीवर टिकाव धरू शकणार नाहीत. माणसाला जशी रात्री आरामाची गरज असते तशीच वनस्पतींनाही ऊर्जा विश्लेषणासाठी रात्रीची आवश्यकता भासते. ती रात्रच झाली नाही, तर वनस्पतींचे जीवनचक्रही विस्कळीत होईल. त्यामुळे सर्व पृथ्वीवरील वनस्पती नाहीशा होतील. सर्वत्र अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होईल. माणूस अन्न मिळवण्यासाठी वनवन भटकेल. तसेच उन्हामुळे, वाढत्या उष्णतेमुळे माणूस हैराण होईल. कित्येक आजार नव्याने बळावतील. सगळीकडे रोगराईचे थैमान माजेल. सूर्याच्या उष्णतेने ध्रुवांवरील बर्फ वितळून जगभरातील समुद्राच्या पाण्याची पातळी वाढेल आणि मानवाला या पृथ्वीवर राहायला जागा अपुरी पडेल. सर्वत्र महाप्रलयाचे स्वरूप निर्माण होईल.
          सूर्याच्या उगवण्या - मावळण्यावर आधारित जलचक्रही पूर्णपणे कोलमडून जाईल. पाऊस नसल्याने पाण्याचे दुर्भिक्ष, दुष्काळ यांमुळे सजीवसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात येईल. ऋतूबदलांचे चक्र पूर्णपणे थांबेल. अन्न पाण्यावाचून सजीव तडफडून प्राण सोडतील. साऱ्या पृथ्वीवर हाहाकार माजेल.
          सूर्याचे नित्य नियमित येणे, त्याचे उगवणे जेवढे महत्त्वाचे आहे तेवढेच महत्त्व त्याच्या मावळण्यालाही आहे. सृष्टीचे हे चक्र एक विधात्याची अनोखी निर्मिती आहे. त्यातील अशा प्रकारचा बिघाड पृथ्वीचा विनाश करण्यास कारणीभूत ठरेल. छे! 'सूर्य मावळला नाही तर...' ही कल्पनाच नकोशी वाटली. ही कल्पना आता मनात जरी आली तरी मनाचा तर थरकाप उडवणारी वाटू लागली.  यामुळे परमेश्वराने तयार केलेल्या या चक्राचे मनभर कौतुक तर वाटलेच, पण या निसर्गाविषयीचा आदरही मनामध्ये दुणावला आणि शाळेतून बाहेर पडल्यावर मावळतीला जाणाऱ्या सूर्यासमोर नकळतपणे हात जुळले.


खालील निबंधांचे सुध्दा वाचन करा.
पहाटेची भ्रमंती ( वर्णनात्मक निबंध ) :
https://essayseries1.blogspot.com/2020/12/blog-post.html

माझा आवडता कलावंत (व्यक्तिचित्रणात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2020/12/blog-post_31.html

मी सह्याद्री बोलतोय... (आत्मवृत्तात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post.html

सूर्य मावळला नाही तर... (कल्पनाप्रधान निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_2.html

तंत्रज्ञानाची किमया ( वैचारिक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_81.html

आमची अविस्मरणीय सहल (वर्णनात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_4.html

माझे आवडते शिक्षक (व्यक्तिचित्रणात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_5.html

वृत्तपत्राचे मनोगत (आत्मवृत्तात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_6.html

पेट्रोल संपले तर... (कल्पनाप्रधान निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_7.html

वाचते होऊया ( वैचारिक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_15.html

मी अनुभवलेला लॉकडाऊन  ( वर्णनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/%20%20%20Maharashtra%20Lockdown%20Extended%20Till%2031%20January%202021%20-%20%20%20....html

माणुसकीचा झरा - बाबा आमटे (व्यक्तिचित्रणात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_74.html

शेतकऱ्याचे आत्मवृत्त ( आत्मवृत्तात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_29.html

परीक्षा रद्द झाल्या तर... (कल्पनाप्रधान निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_64.html

आजची स्त्री (वैचारिक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/02/blog-post.html

ऋतुराज वसंत ( वर्णनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/02/blog-post_2.html

माझी कारखान्याला भेट ( कथनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/02/blog-post_3.html

माझे आजोबा (व्यक्तिचित्रणात्मक निबंध / शब्दचित्रणात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/02/blog-post_7.html

राष्ट्रपिता बापूजी - एक थोर आदर्श किंवा माझा आवडता पुढारी ( चरित्रात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/02/blog-post_9.html

एका क्रांतिकारकाचे मनोगत किंवा हुतात्म्याचे मनोगत किंवा देशभक्ताचे आत्मवृत्त ( आत्मवृत्तात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/02/blog-post_13.html

ज्ञानेश्वरांची समाधी बोलू लागली तर.... (कल्पनाविलासात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post.html

आई, थोर तुझे उपकार किंवा आई-एक महान दैवत किंवा न ऋण जन्मदेचे फिटे ( चितंनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_24.html

आम्हांला मातृभाषेचा अभिमान आहे का? किंवा मातृभाषेचे ऋण ( चर्चात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_25.html

विना सहकार नाही उद्धार किंवा एकमेकां साहाय्य करू | अवघे धरू सुपंथ ( सुभाषितपर निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_26.html

मागणीपत्र / विनंतीपत्र ( पत्रलेखन नमुना कृती - १ ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_54.html

विनंतीपत्र / मागणीपत्र : पत्रलेखन - उपयोजित लेखन कृती आराखडा क्र. २ - विषय : मराठी. : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_28.html

अभिनंदन पत्र - पत्रलेखन नमुना कृती -३ : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post_8.html

माणूस हसण्याची शक्ती गमावून बसला तर... ( कल्पनारम्य निबंध / कल्पनाविलासात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_27.html

मी करोडपती झाले तर... (कल्पनाविलासात्मक निबंध / कल्पनारम्य निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_29.html

वीज बंद पडली तर... (कल्पनाविलासात्मक निबंध / कल्पनारम्य निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_83.html

गूड फ्रायडे : पवित्र शुक्रवार, शुभ शुक्रवार, महा शुक्रवार, की काळा शुक्रवार...! : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_30.html

व्यायामाचे जीवनातील महत्त्व ( चिंतनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_31.html

जाहिरातीचे युग किंवा जाहिरातीची कला ( चिंतनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post.html

लोकसंख्येचा भस्मासूर किंवा लोकसंख्यावाढ - एक भस्मासूर किंवा लोकसंख्येचा विस्फोट ( चिंतनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post_3.html

नापास झालेल्या विद्यार्थ्याचे आत्मकथन ( आत्मवृत्तात्मक निबंध किंवा आत्मनिवेदनपर निबंथ ) : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post_4.html

समाज घडविण्यात युवकांची जबाबदारी किंवा समर्थ तरूण - समर्थ भारत किंवा आम्ही नवभारताचे शिल्पकार (चिंतनात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post_5.html

प्रसारमाध्यमांची सामाजिक बांधिलकी किंवा प्रसारमाध्यमे विद्यार्थ्यांना बिघडवतात का? ( चर्चात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post_6.html

गुढीपाडवा  - शुभसंदेश Gudhi Padva  - Good Wishes : https://essayseries1.blogspot.com/2021/04/gudhi-padva-good-wishes.html

डॉ. बाबासाहेब आंबेडकर : दलित-समाजसूर्य (चरित्रात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post_12.html