तंत्रज्ञानाची किमया ( वैचारिक निबंध )

 तंत्रज्ञानाची किमया



          विज्ञान आणि तंत्रज्ञान ही आपल्या विकसनशील भारत देशाच्या प्रगतीची दोन चाके आहेत. विज्ञानाचा आपल्या सामान्य जीवनात उपयोग होणे त्यालाच तंत्रज्ञान म्हणतात. या तंत्रज्ञानानं आज सर्व विश्व  काबीज केलं आहे आणि त्यावरच आपल्या भारत देशाचा विकास  उभारू लागला आहे.
          तंत्रज्ञानाची किमया अशी आहे की, आज माणूस झोपेतून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत या तंत्रज्ञानाचा पाठपुरावा सोडत नाही. माणसाचे जीवन साधेसोपे, सुलभ, सहज आणि सुसह्य करण्याचे, ते गनिमान करण्याचे आणि प्रगतीपथावर पोहचवण्याचे सारे श्रेय या तंत्रज्ञानाचेच. तंत्रज्ञानामुळे माणसाचे संपूर्ण जीवन सुखकारक झाले आहे. अनेक अवघड कामे यंत्रांच्या साहाय्याने मनुष्य क्षणार्धात पार पाडू लागला आहे. यामुळे माणसाचे श्रम तर कमी झालेच आहेत, परंतू त्याबरोबरच त्याचा अमूल्य वेळ सुध्दा वाचला आहे.
          तंत्रज्ञानाने साऱ्या विश्वात कुशल यंत्रयुग उभे केले. या यंत्रांनी माणसाचे जीवन वेगवान आणि सहज बनवले. माणसाला पाहिजे असलेली कोणतीही गोष्ट यंत्रांच्या साहाय्याने हव्या तेवढ्या मोठ्या प्रमाणात उत्पादित करणे या तंत्रज्ञानामुळेच शक्य होते. भारतासारख्या विकसनशील देशात झालेली हरितक्रांती, त्यामुळे आलेली जीवनातील समृद्धता ही या तंत्रज्ञानाचीच जादू म्हणता येईल. हरितक्रांती झाल्यामुळे झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा होऊ लागला आहे. आज कोठेही पाहा किंवा कोणत्याही क्षेत्रातील संशोधनास या तंत्रज्ञानाचा हातभार लागतोच. संगणक, दूरदर्शन, मोबाइल, वाहने, विमाने हे सर्व काही मानवाला लाभलेभी तंत्रज्ञानाची देणगीच.
          तंत्रज्ञानाच्या जोरावर माणसाने आकाशाला गवसणी घातली. विविध ग्रह तसेच परग्रहावर जाऊन संशोधन केले. विविध उपग्रहांच्या मदतीने मनोरंजन क्षेत्रात, संरक्षण विभागामध्ये, संशोधनात, त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रात विलक्षण क्रांती आणण्यात या तंत्रज्ञानाचा मोठा वाटा आहे. आज कित्येक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करणे या तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे सहजसोप झाले आहे. वैद्यकीय क्षेत्रासाठी तर तंत्रज्ञान हे मोठे वरदान लाभत आहे. शिक्षणाकरता वापरले जाणारे अनेकविध उपग्रह, सध्याची ऑनलाईन शिक्षणपद्धती, प्रेझेंटेशन इत्यादी एक ना अनेक गोष्टी ह्या तंत्रज्ञानामुळेच शक्य होतात. आज जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून इतर कुठेही क्षणार्धात संपर्क किंवा निरोप पाठवता येतो, व्यावसायिक सभा घेण या तंत्रज्ञानामुळे चुटकीसरशी शक्य होते. डिजिटल भारत देशाची अगळीवेगळी कल्पना आज सत्यात आली ती या तंत्रज्ञानामुळेच. बँकांचे ऑनलाईन व्यवहार, खरेदी - विक्रीही आज सर्वांना घरबसल्या शक्य झाली ती यामुळेच. मानवापेक्षा अधिक सक्षम आणि अनेक क्षेत्रात उपयुक्त असा यंत्रमानव तयार करण्यातही तंत्रज्ञानाचा हात आहे. या तंत्रज्ञानाच्या किमयेचे जेवढ  वर्णन करावे तितके कमीच.
          तंत्रज्ञानाची उपयुक्तता किंवा फायदे ही नाण्याची एक बाजू झाली, पण त्याचबरोबरीने आलेले तोटे किंवा नुकसान दुसऱ्या बाजूला दडलेले आहेत. आज यंत्रांनी कित्येक माणसांचे रोजगार, कामधंदे हिसकावून घेतले आहेत. अकुशल कामगारांची तर गरजच नाहिशी झाली आहे. देशाची अर्थव्यवस्था सशक्त होत आहे, पण त्याचबरोबर बेरोजगारीही तेवढीच वाढत आहे. तंत्रज्ञानाचा बेकायदेशीर आणि अतिवापर केल्याने माणसाला अनेक शारीरिक व मानसिक आजार होत आहेत, त्याचबरोबर त्यांचे प्रमाणही मानवामध्ये बळावत आहेत. वाढत्या औद्योगिकरणाने प्रदूषणची भीषण समस्या सर्व विश्वासमोर तोंड वासून उभी आहे. ऊर्जाशक्तीचे, इंधनांचे मर्यादित असलेले साठे आज या तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे संपुष्टात येऊ लागले आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील उच्च प्रगती ही तंत्रज्ञानाची देणगी असली तरीही सोनोग्राफीसारख्या तंत्राचा वापर करून स्त्रीभ्रुण हत्येसारखे अपराध सर्रास घडताना दिसतात. डिजिटल झालेल्या या जगात फसवणुकीचे प्रकार क्षणोक्षणी घडताना दिसतात. आज माणूस तंत्रज्ञानाच्या इतका आहारी गेला आहे की, त्याला स्वतःचाच, त्याचबरोबा स्वतःच्या प्रिय माणसांचा विसर पडला आहे. तंत्रज्ञानाला आपलेसे करून तो सर्वांपासून अन् स्वतःपासूनही खूप दूर होत चालला आहे.
          तंत्रज्ञान जेवढे उपयोगी आहे. तेवढेच ते विनाशक आणि घातक सुध्दा आहे. त्यामुळे, याचा वापर शास्त्र म्हणून करायचा, की शस्त्र म्हणून हे आपण ठरवायचे आहे. यंत्र तयार करता करता आपण यंत्रवत होऊ नये याची काळजी आपण घ्यायची आहे. तंत्रज्ञान हे मनुष्याला लाभलेले सर्वश्रेष्ठ वरदान आहे, त्याचा उपयोग मानवाच्या कल्याणसाठीच होणे आवश्यक आहे.


खालील निबंधांचे सुध्दा वाचन करा.
पहाटेची भ्रमंती ( वर्णनात्मक निबंध ) :
https://essayseries1.blogspot.com/2020/12/blog-post.html

माझा आवडता कलावंत (व्यक्तिचित्रणात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2020/12/blog-post_31.html

मी सह्याद्री बोलतोय... (आत्मवृत्तात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post.html

सूर्य मावळला नाही तर... (कल्पनाप्रधान निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_2.html

तंत्रज्ञानाची किमया ( वैचारिक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_81.html

आमची अविस्मरणीय सहल (वर्णनात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_4.html

माझे आवडते शिक्षक (व्यक्तिचित्रणात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_5.html

वृत्तपत्राचे मनोगत (आत्मवृत्तात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_6.html

पेट्रोल संपले तर... (कल्पनाप्रधान निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_7.html

वाचते होऊया ( वैचारिक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_15.html

मी अनुभवलेला लॉकडाऊन  ( वर्णनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/%20%20%20Maharashtra%20Lockdown%20Extended%20Till%2031%20January%202021%20-%20%20%20....html

माणुसकीचा झरा - बाबा आमटे (व्यक्तिचित्रणात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_74.html

शेतकऱ्याचे आत्मवृत्त ( आत्मवृत्तात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_29.html

परीक्षा रद्द झाल्या तर... (कल्पनाप्रधान निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_64.html

आजची स्त्री (वैचारिक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/02/blog-post.html

ऋतुराज वसंत ( वर्णनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/02/blog-post_2.html

माझी कारखान्याला भेट ( कथनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/02/blog-post_3.html

माझे आजोबा (व्यक्तिचित्रणात्मक निबंध / शब्दचित्रणात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/02/blog-post_7.html

राष्ट्रपिता बापूजी - एक थोर आदर्श किंवा माझा आवडता पुढारी ( चरित्रात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/02/blog-post_9.html

एका क्रांतिकारकाचे मनोगत किंवा हुतात्म्याचे मनोगत किंवा देशभक्ताचे आत्मवृत्त ( आत्मवृत्तात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/02/blog-post_13.html

ज्ञानेश्वरांची समाधी बोलू लागली तर.... (कल्पनाविलासात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post.html

आई, थोर तुझे उपकार किंवा आई-एक महान दैवत किंवा न ऋण जन्मदेचे फिटे ( चितंनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_24.html

आम्हांला मातृभाषेचा अभिमान आहे का? किंवा मातृभाषेचे ऋण ( चर्चात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_25.html

विना सहकार नाही उद्धार किंवा एकमेकां साहाय्य करू | अवघे धरू सुपंथ ( सुभाषितपर निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_26.html

मागणीपत्र / विनंतीपत्र ( पत्रलेखन नमुना कृती - १ ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_54.html

विनंतीपत्र / मागणीपत्र : पत्रलेखन - उपयोजित लेखन कृती आराखडा क्र. २ - विषय : मराठी. : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_28.html

अभिनंदन पत्र - पत्रलेखन नमुना कृती -३ : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post_8.html

माणूस हसण्याची शक्ती गमावून बसला तर... ( कल्पनारम्य निबंध / कल्पनाविलासात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_27.html

मी करोडपती झाले तर... (कल्पनाविलासात्मक निबंध / कल्पनारम्य निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_29.html

वीज बंद पडली तर... (कल्पनाविलासात्मक निबंध / कल्पनारम्य निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_83.html

गूड फ्रायडे : पवित्र शुक्रवार, शुभ शुक्रवार, महा शुक्रवार, की काळा शुक्रवार...! : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_30.html

व्यायामाचे जीवनातील महत्त्व ( चिंतनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_31.html

जाहिरातीचे युग किंवा जाहिरातीची कला ( चिंतनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post.html

लोकसंख्येचा भस्मासूर किंवा लोकसंख्यावाढ - एक भस्मासूर किंवा लोकसंख्येचा विस्फोट ( चिंतनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post_3.html

नापास झालेल्या विद्यार्थ्याचे आत्मकथन ( आत्मवृत्तात्मक निबंध किंवा आत्मनिवेदनपर निबंथ ) : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post_4.html

समाज घडविण्यात युवकांची जबाबदारी किंवा समर्थ तरूण - समर्थ भारत किंवा आम्ही नवभारताचे शिल्पकार (चिंतनात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post_5.html

प्रसारमाध्यमांची सामाजिक बांधिलकी किंवा प्रसारमाध्यमे विद्यार्थ्यांना बिघडवतात का? ( चर्चात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post_6.html

गुढीपाडवा  - शुभसंदेश Gudhi Padva  - Good Wishes : https://essayseries1.blogspot.com/2021/04/gudhi-padva-good-wishes.html

डॉ. बाबासाहेब आंबेडकर : दलित-समाजसूर्य (चरित्रात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post_12.html