आमची अविस्मरणीय सहल
९ ऑगस्ट २०१२, प्रचंड उत्सुकतेचा, आनंदाचा दिवस. उत्सुकता असणारच होती कारण त्या दिवशी आमच्या अंदमान सहलीला प्रारंभ होणार होता. निसर्गसौंदर्याचा अप्रतिम खजिना म्हणजे अंदमान. डोळ्यांचे पारणे फिटवणारी अनेक छायाचित्रे मी गुगलवर पाहिली होती. त्यामुळे, साहजिकच माझी उत्सुकता शिगेला पोहोचली होती. एकदाचा हा दिवस उजडला आणि आमचा मुंबई ते चेन्नई हा प्रवास रेल्वेने झाला. पुढील प्रवास विमानाने करायचा होता. त्यामुळे विमानप्रवासाच्या औत्सुक्यामध्ये चेन्नई केव्हा गाठले हे कळलेच नाही. चेन्नई येथील विमानतळावर समोर पाहिल्यांदाच प्रत्यक्ष डोळ्याने विमान पाहिले होते. प्रत्यक्ष विमानाला स्पर्श केला होता. विमान उडताना पोटात आलेला गोळा, कानाला बसलेले दडे या सगळ्यांचा खिडकीतून खाली पाहताना पूर्णपणे विसर पडला. दोन तासांत विमान अंदमान बोटांच्या नजीक पोहोचले. आजूबाजूच्या ढगांची पांढरी चादर दूर करत जेव्हा निळ्याशार समुद्रातली लहान लहान बेटे दृष्टीत पडली तेव्हा छायाचित्रांमध्ये पाहिलेल्या सौंदर्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक असलेल्या सोंदर्याची मला प्रचीती आली. विमान पोर्टब्लेअरच्या विमानतळावर उतरले. त्यावेळी वातावरणात छान गारवा, प्रसन्नता आणि अल्लाददायकता होती. लख्ख प्रकाशात तेथील सौंदर्य डोळ्यांत टिपत आम्ही पुढे निघालो. सामान घेऊन बाहेर येईपर्यंत वातावरण पूर्ण बदलले होते. काळ्याकट्ट ढगांनी आकाश भरून आले आणि क्षणार्धात पावसाने आमची धांदल उडवली. खरं सांगू का, मला भिजायला खरंच खूप मजा आली. विश्रामगृहात जाऊन थोडा आराम करून दुपारी दोन वाजता आम्ही बीचवर जायला निघालो. एवढ्या दुपारी जायचं, रखरखत्या उन्हात जायच म्हटल्यावर थोडा कंटाळाही आला होता. पण नंतर संध्याकाळी पाचच्या दरम्यान पडणारा अंधार येथील वेळेचे गणित समजवून गेला. अंधारात समुद्राचे सौंदर्य पहायला न मिळाल्याने मी मात्र नाराज झालो.
दुसऱ्या दिवसानंतर मात्र माझी ही नाराजी कुठल्याकुठे पळून गेली. राधानगरी, हॅव्हलॉक, कालापथ्यर असे एक ना अनेक समुद्रकिनारे निळ्याशार आसमंताचे तेवढेच निळेशार प्रतिबिंब प्रकट करताना दिसले. तेथील प्रत्येक समुद्रकिनारे अतिशय स्वच्छ होते. घाणीचा कोठेही नामोनिशानाही नव्हता. जिकडे नजर जाईल तिथपर्यंत स्वच्छ वाळू आणि स्वच्छ पाणी दिसत होते. पाणी इतके पारदर्शक, की सारा समुद्रतळ स्पष्टपणे नजरेत भरत होता. झुंडीने पळणारे विविध रंगी मासे, अनेकविध आकारांचे प्रवाळखडक, अनेक सुंदर आणि नाविन्यपूर्ण जीव पाहताना मी हरखूनच गेले होते. सृष्टीने साऱ्या सौंदर्याची उधळण अंदमानातच केली असावी आणि अंदमान परमेश्वराचीही आवडीची कलाकृती असावी असे क्षणभर वाटल्यावाचून राहत नाही. कित्येक शंख - शिंपले, प्रवाळांचे तुकडे मी जमा केले होते. सहलीचे पाच दिवस मी या समुद्रकिनाऱ्यांमधील सौंदर्याने माझे डोळे निववत होतो. तेथील वृक्षराजी, विरळ वस्ती, निसर्गाचा सहवास आणि शांत समुद्रकिनारा पर्यटकांस मनाने या जागी बांधून ठेवतो हेच खरे!
अंदमानातील सौंदर्य पाहताना हे जर सौंदर्य असेल तर आजवर आपण ज्या गोष्टी सुंदर मानत होतो, त्यांच्या सौंदर्याविषयी क्षणभर माझे मन शाशंकच होते. या सहलीतील प्रत्येक जलप्रवास हा सागराची विशालता व माणसाचे त्यापुढचे क्षुल्लकत्व दर्शवणारा होता. या सहलीतील जारवा बेटावरील प्रवास सर्वाधिक संस्मरणीय होता. या बेटावर 'जारवा' नावाची एक जमात राहत असून आजही ती अश्मयुगीन मानवाप्रमाणे जगत आहे. आजही ही जमात प्रगत तंत्रज्ञानापासून कोसभर दूर आहे. आजही अंदमानातील अनेक बेटांवर प्रगत समाजापासून तुटलेल्या अनेक जमाती अलिप्तपणे वास्तव्य करत आहेत. आपला हस्तक्षेप त्यांना त्यांच्या जीवनात नकोसा वाटतो. अशा एका जमातीला पाहण्यासाठी पोलीस संरक्षणासह आम्ही बेटाकडे निघालो. जारवा दिसणं ही या अंदमान प्रवासातील नशिबाची बाब होती आणि आमचे नशीब त्यावेळी जोरदार होते. जारवांचे संपूर्ण कुटुंब पाहण्याचे भाग्य आम्हांला लाभले. गाडयांचा ताफा पाहून लपणारे, आम्हाला पाहून लाजणरे, आमच्याकडे आश्चर्याने पाहणारे हे जारवा मला इतर कुठल्याही मानवापेक्षा अधिक निरागस, अधिक सुंदर आणि अधिक माणूसपणा असलेले वाटले. या जमातीविषयी, त्यांच्या निसर्गाशी असलेल्या बंधांविषयी आदरभाव मनात भरून आम्ही त्यांचा निरोप घेतला. या सहलीत मी खरी माणसं पाहिली. ज्यांना कोणत्याही बाहेरच्या सजावटीने रंगवलं गेल नव्हतं. त्यांच्या चेहऱ्यावर कोणताही मुखवटा नव्हता. निसर्गाच्या सान्निध्यात रमणाऱ्या या जारवांविषयी थोडसा हेवा आणि खूप सारा आदर घेऊन मी परतीच्या प्रवासाला निघालो.
खालील निबंधांचे सुध्दा वाचन करा.
पहाटेची भ्रमंती ( वर्णनात्मक निबंध ) :
https://essayseries1.blogspot.com/2020/12/blog-post.html
माझा आवडता कलावंत (व्यक्तिचित्रणात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2020/12/blog-post_31.html
मी सह्याद्री बोलतोय... (आत्मवृत्तात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post.html
सूर्य मावळला नाही तर... (कल्पनाप्रधान निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_2.html
तंत्रज्ञानाची किमया ( वैचारिक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_81.html
आमची अविस्मरणीय सहल (वर्णनात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_4.html
माझे आवडते शिक्षक (व्यक्तिचित्रणात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_5.html
वृत्तपत्राचे मनोगत (आत्मवृत्तात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_6.html
पेट्रोल संपले तर... (कल्पनाप्रधान निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_7.html
वाचते होऊया ( वैचारिक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_15.html
मी अनुभवलेला लॉकडाऊन ( वर्णनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/%20%20%20Maharashtra%20Lockdown%20Extended%20Till%2031%20January%202021%20-%20%20%20....html
माणुसकीचा झरा - बाबा आमटे (व्यक्तिचित्रणात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_74.html
शेतकऱ्याचे आत्मवृत्त ( आत्मवृत्तात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_29.html
परीक्षा रद्द झाल्या तर... (कल्पनाप्रधान निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_64.html
आजची स्त्री (वैचारिक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/02/blog-post.html
ऋतुराज वसंत ( वर्णनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/02/blog-post_2.html
माझी कारखान्याला भेट ( कथनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/02/blog-post_3.html
माझे आजोबा (व्यक्तिचित्रणात्मक निबंध / शब्दचित्रणात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/02/blog-post_7.html
राष्ट्रपिता बापूजी - एक थोर आदर्श किंवा माझा आवडता पुढारी ( चरित्रात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/02/blog-post_9.html
एका क्रांतिकारकाचे मनोगत किंवा हुतात्म्याचे मनोगत किंवा देशभक्ताचे आत्मवृत्त ( आत्मवृत्तात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/02/blog-post_13.html
ज्ञानेश्वरांची समाधी बोलू लागली तर.... (कल्पनाविलासात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post.html
आई, थोर तुझे उपकार किंवा आई-एक महान दैवत किंवा न ऋण जन्मदेचे फिटे ( चितंनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_24.html
आम्हांला मातृभाषेचा अभिमान आहे का? किंवा मातृभाषेचे ऋण ( चर्चात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_25.html
विना सहकार नाही उद्धार किंवा एकमेकां साहाय्य करू | अवघे धरू सुपंथ ( सुभाषितपर निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_26.html
मागणीपत्र / विनंतीपत्र ( पत्रलेखन नमुना कृती - १ ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_54.html
विनंतीपत्र / मागणीपत्र : पत्रलेखन - उपयोजित लेखन कृती आराखडा क्र. २ - विषय : मराठी. : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_28.html
अभिनंदन पत्र - पत्रलेखन नमुना कृती -३ : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post_8.html
माणूस हसण्याची शक्ती गमावून बसला तर... ( कल्पनारम्य निबंध / कल्पनाविलासात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_27.html
मी करोडपती झाले तर... (कल्पनाविलासात्मक निबंध / कल्पनारम्य निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_29.html
वीज बंद पडली तर... (कल्पनाविलासात्मक निबंध / कल्पनारम्य निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_83.html
गूड फ्रायडे : पवित्र शुक्रवार, शुभ शुक्रवार, महा शुक्रवार, की काळा शुक्रवार...! : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_30.html
व्यायामाचे जीवनातील महत्त्व ( चिंतनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_31.html
जाहिरातीचे युग किंवा जाहिरातीची कला ( चिंतनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post.html
लोकसंख्येचा भस्मासूर किंवा लोकसंख्यावाढ - एक भस्मासूर किंवा लोकसंख्येचा विस्फोट ( चिंतनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post_3.html
नापास झालेल्या विद्यार्थ्याचे आत्मकथन ( आत्मवृत्तात्मक निबंध किंवा आत्मनिवेदनपर निबंथ ) : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post_4.html
समाज घडविण्यात युवकांची जबाबदारी किंवा समर्थ तरूण - समर्थ भारत किंवा आम्ही नवभारताचे शिल्पकार (चिंतनात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post_5.html
प्रसारमाध्यमांची सामाजिक बांधिलकी किंवा प्रसारमाध्यमे विद्यार्थ्यांना बिघडवतात का? ( चर्चात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post_6.html
गुढीपाडवा - शुभसंदेश Gudhi Padva - Good Wishes : https://essayseries1.blogspot.com/2021/04/gudhi-padva-good-wishes.html
डॉ. बाबासाहेब आंबेडकर : दलित-समाजसूर्य (चरित्रात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post_12.html