माझे आवडते शिक्षक
'गुरूर्बम्हा गुरूरष्णु:
गुरुर्देवो महेश्वरा: l
गुरु:साक्षात परब्रम्ह,
तस्मै श्रीगुरवे नम: I I
गुरुंची महती सांगणारं हे कवन ऐकलं की, समोर उभे राहतात ते आमचे श्रीयुत पिसाळ सर. शालेय जीवनामध्ये उत्तम शिक्षणाबरोबर उत्तम माणूस म्हणून जगायला शिकवणारे हे गुरूवर्य म्हणजे आम्हां सर्व विद्यार्थ्यांच्या गळ्यातलं ताईतच. आठवीच्या वर्गात प्रवेश करताच वर्गशिक्षक म्हणून आमच्यासमोर उभे ठाकलेले पिसाळ सर आपली छाप आमच्या मनावर कायमची उमटवून जातील याची कल्पनाच केली नव्हती. त्यांचा अध्यापनाचा विषय इंग्रजी आणि आम्हा सर्वांना नावडता विषय म्हणजेच इंग्रजी. परंतू एखादया विषयावर प्रभुत्व कसे असावे हे फक्त पिसाळ सरांकडे पाहिले की समजते.
जाड भिंगाचा चष्मा, कडक इस्त्री केलेले कपडे, पायात चकाकणारे बूट आणि चेहऱ्यावर शिस्तप्रीयतेचे भाव या साऱ्याला फाटा फोडत जगाच्या प्रवाहाच्या विरुद्ध पोहणारा हा अवलिया हायस्कूलमधल्या पहिल्याच दिवशी मनावर आपला ठसा उमटवून गेला. पाहता क्षणी हे नक्की शिक्षकच आहेत का? असा प्रश्न पडावा अशी त्यांची साधी राहणी. साधेस कपडे, साधीशी चप्पल आणि चेहऱ्यावर कुठलाही मुखवटा नसल्याने अगदी जिवंतपणाचे भाव. स्वभाव तर क्षणभरात विद्यार्थ्यांना आपलेसे करून घेणारा. 'साधी राहणी उच्च विचारसरणी' खरा प्रत्यय आला तो त्यांना पाहूनच.
हायस्कूलच्या पहिल्याच दिवसाच्या पहिल्याच तासाला पिसाळ सर आम्हां विद्यार्थ्यांच्या मनावर राज्य करू लागले होते. आपला हसरा स्वभाव, विषयावरचे प्रभुत्व, शिकवण्यातील सहजता, हसत - खेळत विषय आमच्यापर्यंत पोहोचवण्याची पद्धत, चेहऱ्यावरचे मिश्किल भाव आणि गमती, गमतीत- बोलताबोलता मुलांच्या मनाचा घेतलेला ठाव यांमुळे पिसाळ सर अगदी मनात घर करून बसले. नेहमीच विद्यार्थ्यांचा घोळका सरांभोवती असायचाच. अभ्यासातल्या शंका तर ते सहजपणे सोडवायचे, पण आम्हां विद्यार्थ्यांच्या जीवनातले अनेक प्रश्नही त्यांनी आपल्या मार्गदर्शनाने, प्रसंगी मदतीने सोडवलेले आम्ही पाहिले आहेत.
'प्रत्येक विद्यार्थी खास आहे' या विचारांच्या पिसाळ सरांनी आम्हां विद्यार्थ्यांमध्ये कधी भेद केला नाही. त्यांनी सर्वांना जवळ केले. मराठी विषयाचा लळा लावला तो याच सरांमुळे. त्यांचा व्यासंग, त्यांचे भाषेवरील प्रभुत्व, त्यांच्या विचारांमधील प्रगल्भता, त्यांचा आनंदी स्वभाव, जीवनाकडे पाहण्याचा अगदी सोपा दृष्टिकोन यांमुळे आमच्या मनातील त्यांच्याविषयीचा आदरभाव वाढतच गेला. आपल्या वागण्यातून, आपल्या शिकवण्याच्या कलेतून त्यांनी विषयाबरोबरच अनेक मूल्येही आमच्यात रुजवली. त्यांना जेव्हा केंद्राकडून उत्तम शिक्षक म्हणून गौरवले गेले त्यावेळी न थांबणाऱ्या टाळ्यांनी त्यांच्याविषयीचे प्रत्येक विद्यार्थ्याचे भाव त्यांच्यापर्यंत पोहोचवले. अगदी त्यांनी व्यासपीठावर पुन्हा येऊन टाळ्या थांबवण्याची सूचना करेपर्यंत हे सत्र सुरूच होते. पिसाळ सरांनी जीवन अनमोल आहे आणि त्याचे महत्त्व जाणून त्याचा प्रत्येक क्षण आनंदात कसा घालवावा हे शिकवले. त्यांनी पाठयपुस्तकापलीकडे जात ज्ञानाची कवाडे आमच्यासाठी खुली केली. प्रत्येकातील कलागुण जाणून, आवडी जाणून पुढील मार्गदर्शन केल्याने अनेक विद्यार्थी यशाची शिखरे गाठण्यात यशस्वी झाले होते. गावाशेजारी असलेल्या आदीवासीपाड्यावरील मुला - मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी केलेली मेहनत, त्यांनी दिलेला लढा पाहून तर त्यांच्याविषयीचा आदरभाव आणखी दुणावला.
पिसाळ सरांनी शिक्षणाची क्लिष्ट वाटणारी, बोजड वाटणारी प्रक्रिया इतकी सुसह्य केली की, 'शिक्षण म्हणजे आनंद' हे सूत्र आमच्या मनात बसले. प्रत्येक विषयातील कठीणता सहज सोप्या भाषेत समजावून दिली. पिसाळ सरांचा तास आहे म्हटल की सर्व मुले त्यांची उत्सुकतेने वाट पाहायची. कारण त्यांनी त्यांच्या अध्यापनातून प्रत्येक मुलांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी हि गोडी निर्माण केली होती. त्यांचा तास कधी सुरू झाला अन् कधी संपला हेच समजत नव्हते. प्रत्येक वाक्य आणि त्या वाक्यातील प्रत्येक शब्द समजावून देताना त्यांनी सांगितलेल्या उदाहरणामुळे मन मंत्रमुग्ध होऊन जात असे. दहावीनंतर पुढील शिक्षणासाठी मी शहरात आलो, पण आजही जीवनाच्या प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयाच्यावेळी त्यांचे मार्गदर्शन मला लाभते. याबद्दल मी त्यांचा ऋणी आहेच.
'माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो आणि तो अनुभवातून शिकत असतो' असे म्हटले जाते. मात्र या अनुभवांना सामोरे जाण्याचे बळ, जीवनातील विविध संकंटाना समर्थपणे पेलवण्याची ताकद मला देणाऱ्या श्रीयुत तथा आदरणीय पिसाळ गुरुजींना माझे शतशः प्रणाम!
खालील निबंधांचे सुध्दा वाचन करा.
पहाटेची भ्रमंती ( वर्णनात्मक निबंध ) :
https://essayseries1.blogspot.com/2020/12/blog-post.html
माझा आवडता कलावंत (व्यक्तिचित्रणात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2020/12/blog-post_31.html
मी सह्याद्री बोलतोय... (आत्मवृत्तात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post.html
सूर्य मावळला नाही तर... (कल्पनाप्रधान निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_2.html
तंत्रज्ञानाची किमया ( वैचारिक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_81.html
आमची अविस्मरणीय सहल (वर्णनात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_4.html
माझे आवडते शिक्षक (व्यक्तिचित्रणात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_5.html
वृत्तपत्राचे मनोगत (आत्मवृत्तात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_6.html
पेट्रोल संपले तर... (कल्पनाप्रधान निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_7.html
वाचते होऊया ( वैचारिक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_15.html
मी अनुभवलेला लॉकडाऊन ( वर्णनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/%20%20%20Maharashtra%20Lockdown%20Extended%20Till%2031%20January%202021%20-%20%20%20....html
माणुसकीचा झरा - बाबा आमटे (व्यक्तिचित्रणात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_74.html
शेतकऱ्याचे आत्मवृत्त ( आत्मवृत्तात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_29.html
परीक्षा रद्द झाल्या तर... (कल्पनाप्रधान निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_64.html
आजची स्त्री (वैचारिक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/02/blog-post.html
ऋतुराज वसंत ( वर्णनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/02/blog-post_2.html
माझी कारखान्याला भेट ( कथनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/02/blog-post_3.html
माझे आजोबा (व्यक्तिचित्रणात्मक निबंध / शब्दचित्रणात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/02/blog-post_7.html
राष्ट्रपिता बापूजी - एक थोर आदर्श किंवा माझा आवडता पुढारी ( चरित्रात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/02/blog-post_9.html
एका क्रांतिकारकाचे मनोगत किंवा हुतात्म्याचे मनोगत किंवा देशभक्ताचे आत्मवृत्त ( आत्मवृत्तात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/02/blog-post_13.html
ज्ञानेश्वरांची समाधी बोलू लागली तर.... (कल्पनाविलासात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post.html
आई, थोर तुझे उपकार किंवा आई-एक महान दैवत किंवा न ऋण जन्मदेचे फिटे ( चितंनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_24.html
आम्हांला मातृभाषेचा अभिमान आहे का? किंवा मातृभाषेचे ऋण ( चर्चात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_25.html
विना सहकार नाही उद्धार किंवा एकमेकां साहाय्य करू | अवघे धरू सुपंथ ( सुभाषितपर निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_26.html
मागणीपत्र / विनंतीपत्र ( पत्रलेखन नमुना कृती - १ ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_54.html
विनंतीपत्र / मागणीपत्र : पत्रलेखन - उपयोजित लेखन कृती आराखडा क्र. २ - विषय : मराठी. : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_28.html
अभिनंदन पत्र - पत्रलेखन नमुना कृती -३ : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post_8.html
माणूस हसण्याची शक्ती गमावून बसला तर... ( कल्पनारम्य निबंध / कल्पनाविलासात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_27.html
मी करोडपती झाले तर... (कल्पनाविलासात्मक निबंध / कल्पनारम्य निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_29.html
वीज बंद पडली तर... (कल्पनाविलासात्मक निबंध / कल्पनारम्य निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_83.html
गूड फ्रायडे : पवित्र शुक्रवार, शुभ शुक्रवार, महा शुक्रवार, की काळा शुक्रवार...! : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_30.html
व्यायामाचे जीवनातील महत्त्व ( चिंतनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_31.html
जाहिरातीचे युग किंवा जाहिरातीची कला ( चिंतनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post.html
लोकसंख्येचा भस्मासूर किंवा लोकसंख्यावाढ - एक भस्मासूर किंवा लोकसंख्येचा विस्फोट ( चिंतनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post_3.html
नापास झालेल्या विद्यार्थ्याचे आत्मकथन ( आत्मवृत्तात्मक निबंध किंवा आत्मनिवेदनपर निबंथ ) : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post_4.html
समाज घडविण्यात युवकांची जबाबदारी किंवा समर्थ तरूण - समर्थ भारत किंवा आम्ही नवभारताचे शिल्पकार (चिंतनात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post_5.html
प्रसारमाध्यमांची सामाजिक बांधिलकी किंवा प्रसारमाध्यमे विद्यार्थ्यांना बिघडवतात का? ( चर्चात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post_6.html
गुढीपाडवा - शुभसंदेश Gudhi Padva - Good Wishes : https://essayseries1.blogspot.com/2021/04/gudhi-padva-good-wishes.html
डॉ. बाबासाहेब आंबेडकर : दलित-समाजसूर्य (चरित्रात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post_12.html