वृत्तपत्राचे मनोगत (आत्मवृत्तात्मक निबंध)

वृत्तपत्राचे मनोगत

          
          प्रत्येकाच्या सुट्टीचा दिवस म्हणजे रविवार. त्यामुळे रविवारच्या दिवशी सर्वजण निवांत झोपेत असताना मला मात्र लवकरच जाग आली. मग प्रथम ताजीतवानी होऊन, हाती चहाचा कप सांभाळत मी काहीतरी शोधू लागले आणि अचानक कानी वेगळाच आवाज ऐकू आला, 'वैशु.... अग मलाच शोधत आहेस ना? अगं मी अजून दारातच आहे. मला आधी आत तर घे!' चक्क वर्तमानपत्र माझ्याशी संभाषण करत होतं. मी थोडी भीतभीतच त्याला आत  आणलं, टेबलवर ठेवून मी त्याच्याकडे लांबूनच टक लावून पाहत राहिले.
          ते पाहून वृत्तपत्र म्हणालं, "वैशु, अगं भीतेस काय? मी तुला आवडणार वृत्तपत्र. खरं तर पत्र नव्हे तुझा मित्रच!" हे ऐकताच मी जरा स्वतःला सावरले आणि त्याच्या समोर येऊन न भीता बसले. तेव्हा ते मला म्हणालं, 'अगं, तू दररोज न चूकता माझे वाचन करतेस ना नेहमी, म्हणून मला तुझ्याजवळ मन मोकळ करावसं वाटलं. सगळ्या देशाविदेशातील बातम्या मी तुम्हांला देतो, पण प्रत्येक वेळी मात्र स्वतःच मन मोकळ करणं राहूनच जातं बघ! त्यामुळे, आज मी तुझ्याशी मनसोक्त गप्पा मारण्याच ठरवल आहे. अग वैशु, माझा जन्म झाला तो म्हणजे लोकशिक्षणासाठी. तुला माहित आहे का? बाळशास्त्री जांभेकरांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र काढले आणि तेव्हापासून  महाराष्ट्राच्या या भूमीत मी खऱ्या अर्थाने जन्मलो. तेव्हा माझे प्रथम नामकरण झाले ते म्हणजे, 'दर्पण'.  दर्पण म्हणजेच आरसा हे तुला माहित आहेच. खरे पाहता मी समाजाचे सत्य रूप दाखवणारा आरसाच होतो. सुरूवातीचा  काळ संघर्षाचा होता तेवढाच देशप्रेमाने भारलेलाही होता. समाजाचं वास्तव रूप दाखवणं आणि झोपी गेलेल्या समाजाला जागृत करणं हेच माझं काम. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात, लोकशाही निर्मितीत माझा सिंहाचा वाटा होता बरं का! प्रत्येक व्यक्तीमध्ये देशभक्तीची, देशसेवेची भावना निर्माण करण्याचे, लोकशाही खऱ्या अर्थाने सामान्यजनांपर्यंत पोहोचवण्यचे काम मी सतत अखंडपणे करत होतो. पुढे काळानुरूप माझ्या रूपात आणि माझ्या उद्दिष्टांमध्ये थोडेथोडे बदल होत गेले. काळानुसार ते गरजेचेच होते.
          आज वर्तमानपत्रातून संपूर्ण विश्वभरातील चालू घडामोडी तर वाचकांपर्यंत पोहोचवल्या जातातच. पण त्याच सोबत सर्वात महत्वाचे म्हणजे ज्ञानाची कवाड खुली करण्याचं कामही मी आणि माझे इतर काही बंधू मिळून करतो. तसेच वाचकांच्या मनोरंजनाचीही नेहमी आम्ही काळजी घेतो. घटनेमागील सत्यता पडताळूनच, त्याचा पाठपुरावा करून  बातम्या तयार करतो. त्यामुळे, आजही वाचक आमच्यावर म्हणजेच वर्तमानपत्रावर डोळे झाकून विश्वास ठेवतात. लोकशिक्षण करणे, मनोरंजन करणे, लोकजागृती करणे, विविध मार्गदर्शन करणे ही आमच्या निर्मितीची प्रयोजने आहेत आणि आजही ती पूर्ण करण्यासाठी आम्ही सतत झटत आहोत. वैशु,.... यातील गंमत म्हणजे लहान मुलांना सतत पुस्तके वाचा असा तगादा लावणारी मोठी माणसं पुस्तकांपासून दूर पळताना दिसतात. पण, माझं वाचन मात्र ते हमखास व आवडीने करतात. लहान मुले त्यांच्यासाठी आमच्या माध्यमातून येणाऱ्या 'बालमित्र' सारख्या सदरासाठी उत्सुक असतात, तर महाविद्यालयीन स्तरावरील मुले रविवारी येणाऱ्या खास पुरवणीची अतुरतेने वाट पाहतात. दहावीची मुले तर अभ्यासपर मार्गदर्शनासाठी माझाच वापर करतात आणि नोकरी शोधणारी मंडळीही माझीच कास धरतात. नोकरी-धंद्यात बांधली गेलेली माणसही वेळ काढून माझ्यावर थोडी का होईना नजर घालतात आणि घरांतील ज्येष्ठ मंडळी माझं प्रत्येक पान पिंजून काढतात. हे पाहून मी खास आहे याची मला खात्री वाटते.
          'वैशु, अगं आज टेलिव्हिजन, संगणक, मोबाइल, इंटरनेट अशी कित्येक पर्यायी साधने उपलब्ध झाली आहेत. काळानुसार, लोकांच्या गरजेनुसार आम्हीही आमच्या स्वरूपात बदल केले आहेत. वेगवेगळ्या मोबाइल ऍप्समधून तुम्हांला हवे तेव्हा आम्ही तुमच्या भेटीस येऊ शकतो. आमच्या रंगरूपात जरी बदल झाला असला तरीही आमचा आत्मा मात्र तोच आहे, बरं का! वाचकांच्या गरजेनुसार आम्ही बदललो असलो तरीही वर्तमानपत्राची घडी हातात घेऊन गरमागरम चहाचे सुरके मारणारा वाचकवर्ग आजही टिकून आहे. नाही का?
          अनेक स्थित्यंतरांना समर्थपणे सामोरे जात  आजही आम्ही आमचे अस्तित्व टिकवून आहोत ही फार आनंदाची अन् अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळेच, कविवर्य केशवसूत यांच्या  या ओळी जणू आमच्यासाठीच लिहिल्या आहेत असे मला वाटते.
          'आम्हांला वगळा, गतप्रभ झणी होतील तारांगणे
आम्हांला वगळा, विकेल कवडीमोलावरी हे जिणे II'
          वैशु, आम्ही तुमची नाळ गतकाळाशी जोडतो, त्याचबरोबर चालू वर्तमानाची तुम्हांस सैर घडवतो आणि भविष्याबद्दल तुम्हांला जागरूक करतो, तुम्हांला मार्गदर्शन करतो. आपल्यातील हे अतुट नाते असेच सांभाळा, तुम्हांला भेटायला, तुमचे मनोरंजन करायला, तुम्हांला देशविदेशांची ओळख करून द्यायला आम्हांला फार फार आवडते.' एवढे बोलून वर्तमानपत्र एकदम शांत झाले आणि मी आदराने त्यावरून हात फिरवला.



खालील निबंधांचे सुध्दा वाचन करा.
पहाटेची भ्रमंती ( वर्णनात्मक निबंध ) :
https://essayseries1.blogspot.com/2020/12/blog-post.html

माझा आवडता कलावंत (व्यक्तिचित्रणात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2020/12/blog-post_31.html

मी सह्याद्री बोलतोय... (आत्मवृत्तात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post.html

सूर्य मावळला नाही तर... (कल्पनाप्रधान निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_2.html

तंत्रज्ञानाची किमया ( वैचारिक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_81.html

आमची अविस्मरणीय सहल (वर्णनात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_4.html

माझे आवडते शिक्षक (व्यक्तिचित्रणात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_5.html

वृत्तपत्राचे मनोगत (आत्मवृत्तात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_6.html

पेट्रोल संपले तर... (कल्पनाप्रधान निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_7.html

वाचते होऊया ( वैचारिक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_15.html

मी अनुभवलेला लॉकडाऊन  ( वर्णनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/%20%20%20Maharashtra%20Lockdown%20Extended%20Till%2031%20January%202021%20-%20%20%20....html

माणुसकीचा झरा - बाबा आमटे (व्यक्तिचित्रणात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_74.html

शेतकऱ्याचे आत्मवृत्त ( आत्मवृत्तात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_29.html

परीक्षा रद्द झाल्या तर... (कल्पनाप्रधान निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_64.html

आजची स्त्री (वैचारिक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/02/blog-post.html

ऋतुराज वसंत ( वर्णनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/02/blog-post_2.html

माझी कारखान्याला भेट ( कथनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/02/blog-post_3.html

माझे आजोबा (व्यक्तिचित्रणात्मक निबंध / शब्दचित्रणात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/02/blog-post_7.html

राष्ट्रपिता बापूजी - एक थोर आदर्श किंवा माझा आवडता पुढारी ( चरित्रात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/02/blog-post_9.html

एका क्रांतिकारकाचे मनोगत किंवा हुतात्म्याचे मनोगत किंवा देशभक्ताचे आत्मवृत्त ( आत्मवृत्तात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/02/blog-post_13.html

ज्ञानेश्वरांची समाधी बोलू लागली तर.... (कल्पनाविलासात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post.html

आई, थोर तुझे उपकार किंवा आई-एक महान दैवत किंवा न ऋण जन्मदेचे फिटे ( चितंनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_24.html

आम्हांला मातृभाषेचा अभिमान आहे का? किंवा मातृभाषेचे ऋण ( चर्चात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_25.html

विना सहकार नाही उद्धार किंवा एकमेकां साहाय्य करू | अवघे धरू सुपंथ ( सुभाषितपर निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_26.html

मागणीपत्र / विनंतीपत्र ( पत्रलेखन नमुना कृती - १ ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_54.html

विनंतीपत्र / मागणीपत्र : पत्रलेखन - उपयोजित लेखन कृती आराखडा क्र. २ - विषय : मराठी. : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_28.html

अभिनंदन पत्र - पत्रलेखन नमुना कृती -३ : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post_8.html

माणूस हसण्याची शक्ती गमावून बसला तर... ( कल्पनारम्य निबंध / कल्पनाविलासात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_27.html

मी करोडपती झाले तर... (कल्पनाविलासात्मक निबंध / कल्पनारम्य निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_29.html

वीज बंद पडली तर... (कल्पनाविलासात्मक निबंध / कल्पनारम्य निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_83.html

गूड फ्रायडे : पवित्र शुक्रवार, शुभ शुक्रवार, महा शुक्रवार, की काळा शुक्रवार...! : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_30.html

व्यायामाचे जीवनातील महत्त्व ( चिंतनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_31.html

जाहिरातीचे युग किंवा जाहिरातीची कला ( चिंतनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post.html

लोकसंख्येचा भस्मासूर किंवा लोकसंख्यावाढ - एक भस्मासूर किंवा लोकसंख्येचा विस्फोट ( चिंतनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post_3.html

नापास झालेल्या विद्यार्थ्याचे आत्मकथन ( आत्मवृत्तात्मक निबंध किंवा आत्मनिवेदनपर निबंथ ) : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post_4.html

समाज घडविण्यात युवकांची जबाबदारी किंवा समर्थ तरूण - समर्थ भारत किंवा आम्ही नवभारताचे शिल्पकार (चिंतनात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post_5.html

प्रसारमाध्यमांची सामाजिक बांधिलकी किंवा प्रसारमाध्यमे विद्यार्थ्यांना बिघडवतात का? ( चर्चात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post_6.html

गुढीपाडवा  - शुभसंदेश Gudhi Padva  - Good Wishes : https://essayseries1.blogspot.com/2021/04/gudhi-padva-good-wishes.html

डॉ. बाबासाहेब आंबेडकर : दलित-समाजसूर्य (चरित्रात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post_12.html