पेट्रोल संपले तर... (कल्पनाप्रधान निबंध)

 पेट्रोल संपले तर...

          इयत्ता बारावीच्या नवीन अभ्यासक्रमानूसार मराठी पाठ्यपुस्तकातील 'वेगवशता' हा पहिलाच पाठ वाचला आणि प्रथमच वास्तवाचे भान येऊन मी पूर्णपणे हादरूनच गेलो. माणसाच्या मनावर आणि पूर्णपणे डोक्यात स्वार झालेली वाहने पाहून मन चिंतित झालं. निर्सगाचा ऱ्हास करणारी हि वाढलेली वाहने कशी बरी थांबवता येतील, असा प्रश्न निर्माण झाला. या प्रश्नाचे उत्तर शोधता शोधता 'हि वाहने ज्या ऊर्जेशक्तीवर धावतात ते पेट्रोलच संपले तर...' असा नवा प्रश्न मनात गोंधळ घालू लागला अन् मन या प्रश्नाच्या मागे धावू लागले.
          खरंच... पेट्रोल संपले तर वाहने ठप्प होतील. रस्त्यावरील वाहतूककोंडीचा प्रश्न कायमचा सुटेल. अतिरिक्त वाहने वापरणारा माणूस वाहनांचा वापरच करू शकणार नाही. आज महामार्गवर वाढलेले अपघातांचे प्रमाण पूर्णपणे थांबेल. माणसांना आपला अमूल्य जीव गमवावा लागणार नाही. कोणालाही या अपघातामुळे येणारे शारीरिक अपंगत्व येणार नाही. त्यामुळे, तो वेगाला वश होणार नाही. वायूपदूषण तर मोठ्या प्रमाणात कमी होईल. वायुप्रदुषणामुळे होणारे विविध रोग होणार नाहीत. कर्णकर्कश हॉर्न थांबल्याने ध्वनीप्रदूषणासही आळा बसेल. माणसं वाहने नसल्याने पायी प्रवास करतील. त्यामुळे, त्यांच्या शरीराचा व्यायाम होऊन त्यांचे आरोग्य उत्तम राहील. प्रदूषण घटल्याने पशू - पक्षीही आनंदाने सैर करू लागतील. पेट्रोलच्या साहाय्याने गनिमान झालेला, आपल्या कुटुंबाला वेळ न देणारा माणूस आपला सगळा वेळ कुटुंबासोबत घालवू लागेल. प्रश्न किती सहज सुटतील ना?  पण...
          पेट्रोल संपले तर आजच्या या यंत्र युगात बरीचशी यंत्रे चालतात, फिरतात ती पेट्रोलच्या सामर्थावरच. पेट्रोल संपले तर सर्व यंत्रे फिरली नसती. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात होणारी माणसाची प्रगती फार थोडया प्रमाणात होईल. त्याचबरोबर अनावश्यक गतीसोबत आवश्यक गतीही माणूस गमावून बसेल. पेट्रोल आणि त्यासंबधीत अनेक व्यवसाय ठप्प होतील. अनेकांना बेरोजगारीला सामोरे जावे लागेल. संपूर्ण देशात नाही तर संपूर्ण विश्वामध्ये बेकारी पसरू लागेल. माणसामध्ये माणूसकी शिल्लक राहणार नाही. रस्ते, गल्ली, वस्त्या यांच्यामध्ये वाहनांचे ढिग लागतील. सर्वत्र भंगार सदृश्य स्थिती निर्माण होईल. त्यामुळे वाहनांमार्फत पोहोचवल्या जाणाऱ्या अत्यावश्यक सेवांपासून माणूस वंचित राहील. प्रत्येक व्यवसाय, छोट्यातील छोटे उद्योगधंदे वाहतुकीअभावी ठप्प होतील. कोणतीच सेवा माणसापर्यत पोहोचवणे शक्य होणार नाही. शेतामध्ये पिकणारा शेतमाल शेतामध्येच सडून जाईल. शहरातील माणसे अन्नधान्यासाठी वनवन भटकतील. अनेक संशोधनांना पूर्णविराम बसेल. त्यामुळे देशाच्या प्रगतीला खीळ बसेल. कामाच्या ठिकाणी वेळेत पोहोचणे कोणालाही शक्य होणार नाही. पेट्रोलवर चालणारे इंजिन बंद झाल्याने अनेक उद्योगांना फटका बसेल. देशामध्ये अनेक बेरोजगार, बेकार निर्माण होतील. यावर उपाय म्हणून सौरऊर्जा, विद्युत ऊर्जेवर चालणारी वाहने, यंत्रे यांच्यासंदर्भातील अनेक संशोधने होतीलच, पण त्यासाठी बराच वेळ द्यावा लागेल. त्यासाठी येणारा खर्च ही फार मोठा असेल. तो माणसाला परवडणारा नसेल. त्यामुळे माणसाची चांगलीच परवड होईल.
          आज माणसागणिक वाहन अशी स्थिती झाल्याने पेट्रोलचा वापर अतिरिक्त होत आहे. पेट्रोल निर्माण करणे मानवाच्या हाती नसतानाही त्याचा अवाजवी वापर करून माणसाने या मर्यादित साठ्यांना उतरंड लावली आहे. त्यामुळे भविष्यात हे साठे शिल्लक राहतील की नाही याविषयी चिंता वाढू लागली आहे. त्यामुळे आवश्यक तेथे, आवश्यक तेवढ्या प्रमाणात हे इंधन वापरले गेले, तर ते निश्चितच फायदेशीर ठरेल, पण पेट्रोलचे साठे मर्यादित असून त्याचा काटकसरीने वापर करणे किती गरजेचे आहे हे माणसाला जाणवणे महत्त्वाचे आहे.
          पृथ्वीवर पेट्रोल नसणे मानवाच्या प्रगतीच्या दृष्टीने फार हानिकारक ठरेल. पेट्रोल संपले, तर सारे जग ठप्प होईल. माणसाची प्रगती पूर्णपणे खुंटेल. मानव ज्या वेगाने पट्रोलचे साठे संपवत आहे त्याचा विचार करता 'पेट्रोल संपले तर...' ही कल्पना यापुढे कल्पना न राहता ते वास्तव बनेल की काय? अशी भीती वाटते. त्यामुळे, प्रत्येकाने महत्त्वाच्या कामानिमित्तच वाहनांचा वापर करावा. जास्तीत जास्त सार्वजनिक वाहनांचा वापर करावा. फक्त हौस, मौज याकरीता वाहनांचा वापर होतो तो वेळीच थांबला पाहिजे. खरचं मानवाने  योग्य वेळी हात आवरता घेतला तरच पेट्रोल वाचवणे शक्य होईल व माणसाच्या प्रगतीचा रथ पुढे सरकत राहील.


खालील निबंधांचे सुध्दा वाचन करा.
पहाटेची भ्रमंती ( वर्णनात्मक निबंध ) :
https://essayseries1.blogspot.com/2020/12/blog-post.html

माझा आवडता कलावंत (व्यक्तिचित्रणात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2020/12/blog-post_31.html

मी सह्याद्री बोलतोय... (आत्मवृत्तात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post.html

सूर्य मावळला नाही तर... (कल्पनाप्रधान निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_2.html

तंत्रज्ञानाची किमया ( वैचारिक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_81.html

आमची अविस्मरणीय सहल (वर्णनात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_4.html

माझे आवडते शिक्षक (व्यक्तिचित्रणात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_5.html

वृत्तपत्राचे मनोगत (आत्मवृत्तात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_6.html

पेट्रोल संपले तर... (कल्पनाप्रधान निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_7.html

वाचते होऊया ( वैचारिक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_15.html

मी अनुभवलेला लॉकडाऊन  ( वर्णनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/%20%20%20Maharashtra%20Lockdown%20Extended%20Till%2031%20January%202021%20-%20%20%20....html

माणुसकीचा झरा - बाबा आमटे (व्यक्तिचित्रणात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_74.html

शेतकऱ्याचे आत्मवृत्त ( आत्मवृत्तात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_29.html

परीक्षा रद्द झाल्या तर... (कल्पनाप्रधान निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_64.html

आजची स्त्री (वैचारिक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/02/blog-post.html

ऋतुराज वसंत ( वर्णनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/02/blog-post_2.html

माझी कारखान्याला भेट ( कथनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/02/blog-post_3.html

माझे आजोबा (व्यक्तिचित्रणात्मक निबंध / शब्दचित्रणात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/02/blog-post_7.html

राष्ट्रपिता बापूजी - एक थोर आदर्श किंवा माझा आवडता पुढारी ( चरित्रात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/02/blog-post_9.html

एका क्रांतिकारकाचे मनोगत किंवा हुतात्म्याचे मनोगत किंवा देशभक्ताचे आत्मवृत्त ( आत्मवृत्तात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/02/blog-post_13.html

ज्ञानेश्वरांची समाधी बोलू लागली तर.... (कल्पनाविलासात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post.html

आई, थोर तुझे उपकार किंवा आई-एक महान दैवत किंवा न ऋण जन्मदेचे फिटे ( चितंनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_24.html

आम्हांला मातृभाषेचा अभिमान आहे का? किंवा मातृभाषेचे ऋण ( चर्चात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_25.html

विना सहकार नाही उद्धार किंवा एकमेकां साहाय्य करू | अवघे धरू सुपंथ ( सुभाषितपर निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_26.html

मागणीपत्र / विनंतीपत्र ( पत्रलेखन नमुना कृती - १ ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_54.html

विनंतीपत्र / मागणीपत्र : पत्रलेखन - उपयोजित लेखन कृती आराखडा क्र. २ - विषय : मराठी. : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_28.html

अभिनंदन पत्र - पत्रलेखन नमुना कृती -३ : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post_8.html

माणूस हसण्याची शक्ती गमावून बसला तर... ( कल्पनारम्य निबंध / कल्पनाविलासात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_27.html

मी करोडपती झाले तर... (कल्पनाविलासात्मक निबंध / कल्पनारम्य निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_29.html

वीज बंद पडली तर... (कल्पनाविलासात्मक निबंध / कल्पनारम्य निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_83.html

गूड फ्रायडे : पवित्र शुक्रवार, शुभ शुक्रवार, महा शुक्रवार, की काळा शुक्रवार...! : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_30.html

व्यायामाचे जीवनातील महत्त्व ( चिंतनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_31.html

जाहिरातीचे युग किंवा जाहिरातीची कला ( चिंतनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post.html

लोकसंख्येचा भस्मासूर किंवा लोकसंख्यावाढ - एक भस्मासूर किंवा लोकसंख्येचा विस्फोट ( चिंतनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post_3.html

नापास झालेल्या विद्यार्थ्याचे आत्मकथन ( आत्मवृत्तात्मक निबंध किंवा आत्मनिवेदनपर निबंथ ) : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post_4.html

समाज घडविण्यात युवकांची जबाबदारी किंवा समर्थ तरूण - समर्थ भारत किंवा आम्ही नवभारताचे शिल्पकार (चिंतनात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post_5.html

प्रसारमाध्यमांची सामाजिक बांधिलकी किंवा प्रसारमाध्यमे विद्यार्थ्यांना बिघडवतात का? ( चर्चात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post_6.html

गुढीपाडवा  - शुभसंदेश Gudhi Padva  - Good Wishes : https://essayseries1.blogspot.com/2021/04/gudhi-padva-good-wishes.html

डॉ. बाबासाहेब आंबेडकर : दलित-समाजसूर्य (चरित्रात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post_12.html