वाचते होऊया ( वैचारिक निबंध )

 वाचते होऊया

          माणसाला घडवण्याकरता दोन गोष्टी महत्तपूर्ण ठरतात. पहिली गोष्ट म्हणजे त्याच्या जीवनात त्याला लाभलेली उत्कृष्ट माणसं आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वाचन. म्हणूनच, पुस्तकांना 'विशाल काळाच्या भव्य सागरातून ममुष्याला तरून नेणारं जहाज' असंही म्हटलं जातं. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने पुस्तकांना आपले सगे मित्र मानले पाहिजे. पुस्तक वाचनामुळे माणसाचे ज्ञान तर वृध्दींगत होतेच पण त्याचबरोबर त्याचे भाषेवरील प्रभूत्व सुध्दा वाढते. पुस्तकांच्या अवांतर वाचनामुळे माणसाचे आचारविचार उच्च पातळीवर पोहचतात. वाचनामुळे शब्द संपत्ती वाढते. संभाषण कौशल्य विकसित होते. वाचन माणसाचे निखळ मनोरंजन करते. यामुळेच अनेकजण आपल्याला 'वाचल तर वाचाल' असा सल्ला देतात. 
          आजकाल विविध स्पर्धा परीक्षा, शाळा स्तरावरील परीक्षांमध्ये पास होण्यासाठी, विविध परीक्षेत अव्वल येण्याकरता केलेले वाचन एवढाच या वाचनाचा मर्यादित अर्थ घेतला जातो, पण या वाचनाची व्याप्ती फार मोठी आहे आणि याची जाणीव मात्र आज क्वचितच असलेली दिसून येते. 'वाचन केवळ फक्त आणि फक्त विद्यार्थी दशेतच करायचे असते' असाही विचार करणारे लोक आपल्याला दिसतात. मात्र वाचन करण्यासाठी कोणतीही प्रकारची वयोमर्यादा नसते, उलट प्रत्येक क्षणाला केलेले वाचन जीवनभर चिरतरुण राहण्यास मदत करते. वाचनाने माणूस समृद्ध होतो.
          वाचनाने प्रगल्भ विचारांची समृद्धी तर प्रत्येकामध्ये येतेच शिवाय नवनव्या विचारांची निर्मिती करण्याची आणि या विचारांना प्रवाही ठेवण्याची शक्तीही या वाचनातूनच मिळते. वाचनातून नवनवे विचार मनामध्ये सुचतात आणि लेखणीतून ते हळूवारपणे कागदावर उतरवले जातात. म्हणूनच, वाचनाला लेखनाची प्रेरणा म्हटले जाते. वाचन विविध कल्पना करण्याची ताकद वाढवते, सृजनशक्तीला वाव देते, प्रतिभाशक्ती जागृत करते आणि दुसऱ्याचे सुख-दु:ख जाणणारे संवेदनशील आणि प्रामाणिक मनही निर्माण करते.
          आपल्या देशाची  संस्कृती विश्वातील एक महान संस्कृती असून ती समृद्ध जीवनाचा सुगम मार्ग दाखवते. तो मार्ग समजून घेण्यासाठी या संस्कृतीचे प्रतिबिंब असेलेली विविध पुराणे, पोथ्या, ग्रंथ, पुस्तकेच आपली मदत करू शकतात. वाचनाने मनुष्याला स्वतःचे आत्मभान येते, त्याचा स्वतःचा त्याला स्वतःला नव्याने परिचय होतो. वाचनामधून समर्थपणे व्यक्त होण्याची क्षमता त्याच्यात निर्माण होते.
          विद्यार्थीदशेत वाचनामुळे मेंदूला चालना मिळते. आपली शब्दसंपत्ती वाढते. शिवाय, अनुभवांची मोठी शिदोरी कायमची गाठीशी राहते. हे वाचन विविध निबंधमाला, भाषण स्पर्धा यांसाठी उपयुक्त ठरतेच तसेच यामुळे स्वतःचे मत, तसेच अभिव्यक्तीसाठी हातभार लागतो. या वाचनामुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात.  त्यामुळे परिसरामध्ये, विविध जन समुदयामध्ये तसेच मित्रमंडळीतं वावरताना वेगवेगळ्या विषयांवरील चर्चामध्ये सहभागी होऊन महत्त्वाचे विषय चोखाळता येतात. वाचनाने व्यक्ती प्रगल्भ होते. एकंदरीत वाचन मानवाला प्रतिष्ठाही मिळवून देते.
          वाचन केल्याने इतरांना मनोरंजन देण्याचा हेतू तर साध्य होतोच, पण सोबतच आपल्याला एक जिवलग दोस्त गवसतो. हा मित्र सर्व परिस्थितीत आपल्या सोबत असतो. तो विशाल विश्वाच्या या भवसागरात आपणांस तरायला मदत करतो. तो जगण्याचा आशावाद निर्माण करतो, तो सदैव खुश राहायला शिकवतो. हा आपला सखासोबती एका ठिकाणी बसून साऱ्या विश्वाची सैर आपल्याला घडवतो. तो बिकट स्थितीत खंबीर राहायला शिकवतो. केवळ वाचन केल्यानेच सर्व काळजी, सर्व चिंता मिटून जातात. हा सखासोबती आपले मन आनंदी तर करतोच त्याचबरोबर आपल्या मनामध्ये सकारात्मकताही वाढीस लावतो. या वाचनाच्या छंदाने न जाणारा वेळ आणि त्या वेळेचा आलेला कंटाळा ही बाबच विसरायला होते. आपल्याला पाहिजे तेव्हा आपल्या मनोरंजनात्मक सेवेला उभा असणारा हा सखा आपल्याला फक्त देत अन देतच राहतो. खरतर शेवटपर्यंत आपण त्याचे देणेकरी राहतो.
           शंकर सारडा हे जे प्रसिद्ध समीक्षक आहेच ते म्हणतात, 'पुस्तकांशी कधीतरी आपली मैत्री जुळ्ते आणि मग पुस्तके जन्मभर आपली साथ, संगत करत राहतात'. पुस्तकांचे जग किती विशाल किती अथांग असते. संपूर्ण विश्वातील  कानाकोपऱ्यातील व्यक्तीशी आपलं  अतुट नातं जोडणारी, भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळचा वेध घेणारी पुस्तक 'हे विश्वचि माझे घर' याचा साक्षात्कार पुनःपुन्हा घडवतात. म्हणूनच, यापुढे आपण सर्वच वाचते होण्याचा दृढ संकल्प करूया, विविध विचारांनी समृदृध होऊया!

खालील निबंधांचे सुध्दा वाचन करा.
पहाटेची भ्रमंती ( वर्णनात्मक निबंध ) :
https://essayseries1.blogspot.com/2020/12/blog-post.html

माझा आवडता कलावंत (व्यक्तिचित्रणात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2020/12/blog-post_31.html

मी सह्याद्री बोलतोय... (आत्मवृत्तात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post.html

सूर्य मावळला नाही तर... (कल्पनाप्रधान निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_2.html

तंत्रज्ञानाची किमया ( वैचारिक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_81.html

आमची अविस्मरणीय सहल (वर्णनात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_4.html

माझे आवडते शिक्षक (व्यक्तिचित्रणात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_5.html

वृत्तपत्राचे मनोगत (आत्मवृत्तात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_6.html

पेट्रोल संपले तर... (कल्पनाप्रधान निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_7.html

वाचते होऊया ( वैचारिक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_15.html

मी अनुभवलेला लॉकडाऊन  ( वर्णनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/%20%20%20Maharashtra%20Lockdown%20Extended%20Till%2031%20January%202021%20-%20%20%20....html

माणुसकीचा झरा - बाबा आमटे (व्यक्तिचित्रणात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_74.html

शेतकऱ्याचे आत्मवृत्त ( आत्मवृत्तात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_29.html

परीक्षा रद्द झाल्या तर... (कल्पनाप्रधान निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_64.html

आजची स्त्री (वैचारिक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/02/blog-post.html

ऋतुराज वसंत ( वर्णनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/02/blog-post_2.html

माझी कारखान्याला भेट ( कथनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/02/blog-post_3.html

माझे आजोबा (व्यक्तिचित्रणात्मक निबंध / शब्दचित्रणात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/02/blog-post_7.html

राष्ट्रपिता बापूजी - एक थोर आदर्श किंवा माझा आवडता पुढारी ( चरित्रात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/02/blog-post_9.html

एका क्रांतिकारकाचे मनोगत किंवा हुतात्म्याचे मनोगत किंवा देशभक्ताचे आत्मवृत्त ( आत्मवृत्तात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/02/blog-post_13.html

ज्ञानेश्वरांची समाधी बोलू लागली तर.... (कल्पनाविलासात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post.html

आई, थोर तुझे उपकार किंवा आई-एक महान दैवत किंवा न ऋण जन्मदेचे फिटे ( चितंनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_24.html

आम्हांला मातृभाषेचा अभिमान आहे का? किंवा मातृभाषेचे ऋण ( चर्चात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_25.html

विना सहकार नाही उद्धार किंवा एकमेकां साहाय्य करू | अवघे धरू सुपंथ ( सुभाषितपर निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_26.html

मागणीपत्र / विनंतीपत्र ( पत्रलेखन नमुना कृती - १ ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_54.html

विनंतीपत्र / मागणीपत्र : पत्रलेखन - उपयोजित लेखन कृती आराखडा क्र. २ - विषय : मराठी. : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_28.html

अभिनंदन पत्र - पत्रलेखन नमुना कृती -३ : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post_8.html

माणूस हसण्याची शक्ती गमावून बसला तर... ( कल्पनारम्य निबंध / कल्पनाविलासात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_27.html

मी करोडपती झाले तर... (कल्पनाविलासात्मक निबंध / कल्पनारम्य निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_29.html

वीज बंद पडली तर... (कल्पनाविलासात्मक निबंध / कल्पनारम्य निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_83.html

गूड फ्रायडे : पवित्र शुक्रवार, शुभ शुक्रवार, महा शुक्रवार, की काळा शुक्रवार...! : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_30.html

व्यायामाचे जीवनातील महत्त्व ( चिंतनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_31.html

जाहिरातीचे युग किंवा जाहिरातीची कला ( चिंतनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post.html

लोकसंख्येचा भस्मासूर किंवा लोकसंख्यावाढ - एक भस्मासूर किंवा लोकसंख्येचा विस्फोट ( चिंतनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post_3.html

नापास झालेल्या विद्यार्थ्याचे आत्मकथन ( आत्मवृत्तात्मक निबंध किंवा आत्मनिवेदनपर निबंथ ) : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post_4.html

समाज घडविण्यात युवकांची जबाबदारी किंवा समर्थ तरूण - समर्थ भारत किंवा आम्ही नवभारताचे शिल्पकार (चिंतनात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post_5.html

प्रसारमाध्यमांची सामाजिक बांधिलकी किंवा प्रसारमाध्यमे विद्यार्थ्यांना बिघडवतात का? ( चर्चात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post_6.html

गुढीपाडवा  - शुभसंदेश Gudhi Padva  - Good Wishes : https://essayseries1.blogspot.com/2021/04/gudhi-padva-good-wishes.html

डॉ. बाबासाहेब आंबेडकर : दलित-समाजसूर्य (चरित्रात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post_12.html