मी अनुभवलेला लॉकडाऊन ( वर्णनात्मक निबंध )

 मी अनुभवलेला लॉकडाऊन

          'लॉकडाऊन......'!  आधी कधीच कानी न पडलेला शब्द आज मात्र प्रत्येकाच्या परिचयाचा झाला आहे. कारण प्रत्येकानेच तो अनुभवला आहे. 'कोव्हिड१९' या विषाणूने जगभरात घातलेले थैमान, भारतात त्याचे झालेले आगमन आणि प्रसार आणि त्यावर हतबल झालेल्या मानवाच्या हाती असलेला एकमेव इलाज म्हणजे लॉकडाऊन. २१ मार्च....मी माझ्या अकरावीच्या परीक्षेची तयारी करत होते. काही दिवसांनी परीक्षा सुरू होणार होती. 'करोना' च्या बातम्या टिव्हीवर येत होत्या, पण त्याचे गांभीर्य खरंच त्यावेळी लक्षात नाही आलं. लॉकडाऊन घोषित झाल्याने संपूर्ण राष्ट्रच थांबलं. वाहतूक, मॉल्स, सिनमागृहे, शाळा, कार्यालये आणि अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्वकाही ठप्प झालं.
          परीक्षेपूर्वी अभ्यासाला खूप वेळ मिळेल या आनंदाने मन हुरळून गेलं. पुढे तर परीक्षा रद्द केल्याने आनंदाला पारावारच उरला नाही, पण काही काळातच याचे दुष्पपरिणाम जाणवू लागले. सुरुवातीला सुट्टी मिळाल्याने झालेला आनंद घरात अडकून पडल्याने कुठच्या कुठं मावळला होता. खाण्यापिण्याचे सारे चोचले पूर्णपणे बंद झाले होते. अनेक दिवस कुटुंबियांशिवाय इतर कुणाशी संपर्क नसल्याने फार कंटाळा आला होता. परीक्षा रद्द झाल्याने बारावीत प्रवेश करण्याची उत्सुकता, गुणांचा अंदाज, बारावीची पूर्वतयारी या साऱ्यालाच आम्ही मुकलो. बाजारात पुस्तकेही नसल्याने अभ्यास करणेही अवघड झाले. घरातली प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या वेळापत्रकात इतकी गुरफटलेली असायची, की एकमेकांना देण्यासाठी कोणाकडे वेळच नसायचा, पण तिच मंडळी आज चोवीस तास एकमेकांसोबत राहत होती. त्यामुळे, थोडी चिडचिड, थोडे वाद होतच होते. कोव्हीडचा वाढता प्रसार व त्यासंदर्भातील बातम्या प्रचंड मानसिक ताण निर्माण करत होत्या.
          याच वेळी देशभरात 'कोव्हीड १९' गस्त लोकांच्या सेवेसाठी हजारो वैद्यकीय कर्मचारी आपल्या प्राणांची पर्वा न करता सेवा पुरवत होते. त्याक्षणी ते खरे सैनिक भासत होते. पोलीस कर्मचारीही बाहेर पडू पाहणाऱ्या जनतेला थोपवण्यासाठी रात्रंदिवस कार्यरत होते. अत्यावश्यक सेवा पुरवणारे लोकही या लढ्यात महत्त्वाची भूमिका पार पाडत होते. मात्र त्यांचे हे सर्मपण लक्षात न घेणाऱ्या, लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या समाजकंटकांची चिड येऊ लागली होती.
          लॉकडाऊनमुळे आलेल्या मानसिक अस्वस्थतेमुळे माझी प्रचंड चिडचिड होत होती, पण शांतपणे विचार केला असता अनेक गोष्टी माझ्यासमोर उलगडत गेल्या. मला जाणीव झाली, की जगाच्या रहाटगाड्यात आपण इतके अडकतो, की आपल्या कुटुंबापासूनच आपण दूर राहतो. या लॉकडाऊनने खरं तर कुटुंबालाच एकत्र आणलं आहे. एकमेकांसोबत खेळण्याची, हसण्याची आणि एकमेकांच्या सहवासात राहण्याची ही एक संधी अनायसे आपल्या पदरी पडली आहे. तिचा लाभ घेण्याचा मोका पुन्हा मिळणार नाही हे मला जाणवले. जगाच्या प्रवाहात आपण कित्येक अनावश्यक वस्तूंना जवळ करत आहोत याची मला प्रचीती आली. मॉल्स, सिनेमागृहे, रेल्वे, गाड्या बंद पडल्या, तर काय होईल या विचारापासूनही दूर पळणाऱ्या मानवाच्या आयुष्यात या गोष्टींनी खरंच फरक पडतो का? असा प्रश्न मनात निर्माण झाला. अनावश्यक खर्च, अनावश्यक खादयपदार्थ, अनावश्यक कामे, अनावश्यक फिरणे सारं काही क्षणार्धात थांबले आणि आयुष्य मात्र सुलभपणे सुरू आहे याची मला जाणीव झाली. आपल्या गरजा किती कमी आहेत अन् आपण त्या किती वाढवून ठेवल्या आहेत या विचाराने मी चमकलेच. या लॉकडाऊनच्या काळात मी खूप वाचन केले. साहित्याचा मनसोक्त आस्वाद मी घेतला. अनेक गोष्टींवर साऱ्या कुटुंबासोबत चर्चा झाल्या. बाहेरच्या पिझ्झा - बर्गरपेक्षा आईच्या हातची भाकरी साऱ्या कुटुंबासोबत खाण्यातील गोडवा मला कळला. मला स्वतःला जाणता आले. याकाळात मी बऱ्याच वेळा आत्मसंवादही साधला. त्यामुळे, मीच मला अधिक उमगत गेले. तंत्रज्ञानाच्या जाळ्यातून बाहेर पडत मी कुटुंबासोबत रमले.
          अनेक टप्प्यांनी वाढत गेलेले हे लॉकडाऊन राष्ट्राचा आर्थिक डोलारा हादरवणारे असले तरी मानसिक पातळीवर ते स्वतःचा स्वतःलाच परिचय करून देणारे ठरले आहे असे मला वाटते. या लॉकडाऊनमध्ये मी स्वतःला आणि माझ्या कुटुंबाला जाणू शकले. देशात ठिकठिकाणी अडकलेल्या जनतेचे दुःख मला जाणता आले. माणूस म्हणून माणसाच्या वेदना माझ्यापर्यंत पोहोचल्या. आयुष्य अनमोल आहे, बाकी सर्व मिथ्या आहे या सत्याचा मला या लॉकडाऊनमध्ये शोध लागला. निसर्ग सर्वश्रेष्ठ आहे आणि मानव त्यातील एक लहानसा घटक आहे हे मीच नव्हे, तर प्रत्येकानेच जाणले. परमेश्वर माणसात वसतो हे सत्य या विषाणूशी लढणाऱ्या योद्ध्यांना पाहून पटले. त्यामुळे, या योद्ध्यांविषयीचा, निसर्गाविषयीचा, अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांविषयीचा आदर मनात आणखी वाढला. त्यामुळे, हे लॉकडाऊन बरेच काही नेणारे असले तरी खूप काही देऊनही गेले आहे असे मला वाटते.
 


खालील निबंधांचे सुध्दा वाचन करा.
पहाटेची भ्रमंती ( वर्णनात्मक निबंध ) :
https://essayseries1.blogspot.com/2020/12/blog-post.html

माझा आवडता कलावंत (व्यक्तिचित्रणात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2020/12/blog-post_31.html

मी सह्याद्री बोलतोय... (आत्मवृत्तात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post.html

सूर्य मावळला नाही तर... (कल्पनाप्रधान निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_2.html

तंत्रज्ञानाची किमया ( वैचारिक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_81.html

आमची अविस्मरणीय सहल (वर्णनात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_4.html

माझे आवडते शिक्षक (व्यक्तिचित्रणात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_5.html

वृत्तपत्राचे मनोगत (आत्मवृत्तात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_6.html

पेट्रोल संपले तर... (कल्पनाप्रधान निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_7.html

वाचते होऊया ( वैचारिक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_15.html

मी अनुभवलेला लॉकडाऊन  ( वर्णनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/%20%20%20Maharashtra%20Lockdown%20Extended%20Till%2031%20January%202021%20-%20%20%20....html

माणुसकीचा झरा - बाबा आमटे (व्यक्तिचित्रणात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_74.html

शेतकऱ्याचे आत्मवृत्त ( आत्मवृत्तात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_29.html

परीक्षा रद्द झाल्या तर... (कल्पनाप्रधान निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/01/blog-post_64.html

आजची स्त्री (वैचारिक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/02/blog-post.html

ऋतुराज वसंत ( वर्णनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/02/blog-post_2.html

माझी कारखान्याला भेट ( कथनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/02/blog-post_3.html

माझे आजोबा (व्यक्तिचित्रणात्मक निबंध / शब्दचित्रणात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/02/blog-post_7.html

राष्ट्रपिता बापूजी - एक थोर आदर्श किंवा माझा आवडता पुढारी ( चरित्रात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/02/blog-post_9.html

एका क्रांतिकारकाचे मनोगत किंवा हुतात्म्याचे मनोगत किंवा देशभक्ताचे आत्मवृत्त ( आत्मवृत्तात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/02/blog-post_13.html

ज्ञानेश्वरांची समाधी बोलू लागली तर.... (कल्पनाविलासात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post.html

आई, थोर तुझे उपकार किंवा आई-एक महान दैवत किंवा न ऋण जन्मदेचे फिटे ( चितंनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_24.html

आम्हांला मातृभाषेचा अभिमान आहे का? किंवा मातृभाषेचे ऋण ( चर्चात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_25.html

विना सहकार नाही उद्धार किंवा एकमेकां साहाय्य करू | अवघे धरू सुपंथ ( सुभाषितपर निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_26.html

मागणीपत्र / विनंतीपत्र ( पत्रलेखन नमुना कृती - १ ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_54.html

विनंतीपत्र / मागणीपत्र : पत्रलेखन - उपयोजित लेखन कृती आराखडा क्र. २ - विषय : मराठी. : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_28.html

अभिनंदन पत्र - पत्रलेखन नमुना कृती -३ : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post_8.html

माणूस हसण्याची शक्ती गमावून बसला तर... ( कल्पनारम्य निबंध / कल्पनाविलासात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_27.html

मी करोडपती झाले तर... (कल्पनाविलासात्मक निबंध / कल्पनारम्य निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_29.html

वीज बंद पडली तर... (कल्पनाविलासात्मक निबंध / कल्पनारम्य निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_83.html

गूड फ्रायडे : पवित्र शुक्रवार, शुभ शुक्रवार, महा शुक्रवार, की काळा शुक्रवार...! : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_30.html

व्यायामाचे जीवनातील महत्त्व ( चिंतनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/03/blog-post_31.html

जाहिरातीचे युग किंवा जाहिरातीची कला ( चिंतनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post.html

लोकसंख्येचा भस्मासूर किंवा लोकसंख्यावाढ - एक भस्मासूर किंवा लोकसंख्येचा विस्फोट ( चिंतनात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post_3.html

नापास झालेल्या विद्यार्थ्याचे आत्मकथन ( आत्मवृत्तात्मक निबंध किंवा आत्मनिवेदनपर निबंथ ) : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post_4.html

समाज घडविण्यात युवकांची जबाबदारी किंवा समर्थ तरूण - समर्थ भारत किंवा आम्ही नवभारताचे शिल्पकार (चिंतनात्मक निबंध) : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post_5.html

प्रसारमाध्यमांची सामाजिक बांधिलकी किंवा प्रसारमाध्यमे विद्यार्थ्यांना बिघडवतात का? ( चर्चात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post_6.html

गुढीपाडवा  - शुभसंदेश Gudhi Padva  - Good Wishes : https://essayseries1.blogspot.com/2021/04/gudhi-padva-good-wishes.html

डॉ. बाबासाहेब आंबेडकर : दलित-समाजसूर्य (चरित्रात्मक निबंध ) : https://essayseries1.blogspot.com/2021/04/blog-post_12.html