माझी आई (शब्दचित्रात्मक निबंध / व्यक्तिचित्रणात्मक निबंध)

 माझी आई (शब्दचित्रात्मक निबंध / व्यक्तिचित्रणात्मक निबंध)



मुद्दे :   मातृदेवो भव - आईचे थोर उपकार -  बालपणी आईने घेतलेले कष्ट - आपल्यातील त्रुटी जाणून केलेल्या उपाय योजना - माझ्या विकासासाठी स्वतःच्या आवडी व छंद बाजूला ठेवले - सर्वांगीण विकासाची काळजी - थोर व्यक्ती आणि त्यांच्या थोर माता - आई थोर गुरु - आईसंबंधी माझे कर्तव्य...

          रामायणात महर्षी वाल्मिकींनी रंगवलेले प्रभू रामचंद्र म्हणतात, " जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी." खरोखरच किती अचूक वर्णन आहे हे!  आई समोर स्वर्गाचेही महात्म्य थिटे पडते. आईच्या प्रेमाची बरोबरी कोणीही करू शकत नाही. कविवर्य मोरोपंत आईची महती सांगताना म्हणतात, "इतर लोकांनी आपल्यावर कितीही प्रेम केले, माया केली तरी त्यांचे 'प्रसादपट' हे थिटे ठरतात. तसे आईचे नसते. आईची माया कधीच आटत नाही. अगदी आपल्या कुपुत्रालाही ती विटत नाही."

          माझी आई ही अगदी अशीच आहे. आजचे माझे यश पूर्णपणे माझ्या आईमुळेच आहे. परवाच शाळेतील विविध स्पर्धात मला बक्षिसे मिळाली. माझे हस्ताक्षर सर्व विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरापेक्षा उत्कृष्ट ठरले, याचे संपूर्ण श्रेय माझ्या आई कडे जाते. लहानपणी अनेकदा मी लिहिलेला मजकूर पसंत पडला नाही की आई मला तो परत लिहायला लावी. परत परत लिहिल्यामुळे माझे अक्षर घोटीव व वळणदार झाले होते.

          मला पूर्णपणे आठवतेय,  मी चौथीमध्ये असताना पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळी परीक्षेला जाण्यापूर्वी मला अचानक पोटात दुखू लागले आणि उलट्या व्हायला लागल्या.  मी परीक्षेला घाबरायचो. कशीबशी परीक्षा संपवून मी घरी आलो. आईने ओळखले,  याला परीक्षेची भीती वाटते.  मग पाचवीमध्ये असताना माझ्या आईने मला अनेक परीक्षांना बसवले  आणि त्यामुळे आता कोणत्याही परीक्षेची मला अजिबात भिती वाटत नाही. कसे घडवले मला माझ्या आईने. मनात येते की, ' न ऋण जन्मदेचे फिटे.'

          माझ्या आईने माझ्यासाठी स्वतःच्या 'करिअर' चा कधीच विचार केला नाही. ती स्वतः एम्. एस्सी असूनही मी लहान असताना तिने कधीच नोकरीचा विचार केला नाही. मी आठवीत गेल्यावर तिने पीएच. डी केली, तीही शिष्यवृत्ती मिळवून. स्वतःचा अभ्यास करतानाही ती घरातील सर्व कामे कोणत्याही प्रकारचा चिडचिडपणा न करता स्वतः करत होती.

          माझ्या आईचे माझ्याबाबतीत सर्व गोष्टीकडे अगदी बारीक लक्ष असते. मी कोणत्या प्रकारचे साहित्य वाचावे, कोणकोणत्या विविध स्पर्धांमध्ये भाग घ्यावा याकडे तिचे बारकाईने लक्ष असते. ती वाचत असताना तिच्या वाचनात काही उत्कृष्ठ प्रतीचे वाचन आले की, ती आवर्जून मला वाचायला सांगते, पण माझे निर्णय मीच घ्यावेत याबाबत ती आग्रही असते. खरोखरच आई आपल्या मुलांसाठी किती करत असते. जिजाऊने शिवाजीला स्वराज्याची प्रेरणा दिली. महात्माजींच्या मनात सत्याचा आग्रह त्यांच्या मातेने ठसवला, तर भूदानाची कल्पना विनोबांना सुचवली ती आईच्याच शिकवणुकीतून. विनोबांची आई म्हणे, ' विन्या, आपल्या जवळ पाच घास असतील, तर त्यातील एक तरी दुसऱ्याला द्यावा.'

          आई हा थोर गुरू आहे. म्हणून तर बापूजी म्हणून, ' एक आई शंभर गुरूंहूनही श्रेष्ठ आहे.' आजच्या काळातला दहशतवाद, भ्रष्टाचार या गोष्टींविषयी बोलत असताना परवा आई म्हणाली, " प्रत्येकाने लक्षात ठेवावे की, प्रत्येकालाच असते आई." खरेच एवढा विचार प्रत्येकाने केला तर  हिंसा करणाचे हात हिंसा करताना थबकतील.

          आई आपल्यासाठी केलेल्या या सर्व गोष्टी आठवल्या की मनात येते, ज्याला लहानपणापासून आईचा विरह झाला असेल त्याचे केवढे दुर्भाग्य! म्हणूनच कवी यशवंत म्हणतात,

'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी'


My Mother (Pictorial Essay)

 Points : Matrudevo Bhav - Mother's great benevolence - Childhood mother's hard work - Remedy plan knowing your mistakes - Putting aside my own hobbies and hobbies for my development - Care for all-round development  .

 Lord Ramachandra, painted by Maharshi Valmiki in the Ramayana, says, "Janani Janmabhumishch Swargadapi Gariyasi."  What an accurate description!  The greatness of heaven also falls in front of the mother.  No one can match the love of a mother.  Explaining the importance of motherhood, the poet Moropant says, "No matter how much other people love you, their 'prasadpat' is the same. It is not like mother's. Mother's love never fades. It does not hurt even your son."

 My mother is just like that.  My success today is entirely due to my mother.  I received prizes in various competitions at Parvach School.  My handwriting was better than the handwriting of all the students, all the credit goes to my mother.  As a child, I often did not like the text I wrote, so my mother asked me to write it back.  Writing over and over again made my letters crooked and crooked.

 I totally remember, when I was in the fourth grade, I suddenly started having stomach pains and vomiting before going to the exams during the pre-secondary scholarship exams.  I was scared of exams.  Somehow I came home after finishing the exam.  Recognized by the mother, she is afraid of exams.  Then when I was in fifth grade, my mother put me through many exams and so now I am not afraid of any exam.  How my mother made me.  It comes to mind that, 'No debt is born.'

 My mother never thought of her own 'career' for me.  She herself m.  Despite Essie, she never considered a job when I was younger.  When I was eight, she had a Ph.D.  D. Kelly, also getting a scholarship.  Even while studying on her own, she was doing all the household chores on her own without any irritability.

 My mother pays close attention to everything about me.  She pays close attention to what kind of literature I read, what different competitions I take part in.  While she was reading, she read a few good copies, and she told me to read, but she insisted that I make my own decisions.  How much a mother really does for her children.  Jijau inspired Shivaji to Swarajya.  While his mother insisted on the truth in Mahatmaji's mind, the idea of ​​Bhudana was suggested to Vinoba through her mother's teachings.  Vinoba's mother said, 'Vinya, if you have five grasses, give at least one of them to the other.'

 Mother is a great teacher.  So as Bapuji says, 'A mother is superior to a hundred gurus.'  Talking about terrorism and corruption these days, Parva's mother said, "Everyone should remember that everyone has a mother."  In fact, if everyone thinks like this, the hands of the perpetrators of violence will stumble while committing violence.

 Remembering all these things that mother did for you comes to mind, how unfortunate it is for someone who has been separated from his mother since childhood!  That is why the poet Yashwant says

 'Swami beggar without mother of three worlds'