युद्धात कामी आलेल्या सैनिकाच्या पत्नीचे मनोगत (आत्मवृत्तात्मक / आत्मनिवेदनपर निबंध)

 युद्धात कामी आलेल्या सैनिकाच्या पत्नीचे मनोगत

(आत्मवृत्तात्मक / आत्मनिवेदनपर निबंध)



मुद्दे :  प्रस्तावना - युद्धस्य कथा रम्या - सैनिकाची पत्नी मनोगत व्यक्त करते - युद्धामध्ये कामी आलेल्या पतीविषयाचे विचार - युद्धप्रसंग - बातमीचा झालेला परिणाम - शासनाची मदत - राष्ट्रपती कडून गौरव - वीरपत्नी आता वीरमाता बनणार - निर्धार...


     "युद्धस्य कथा रम्या" असे म्हणतात, ते खरेच! पण कोणाला? ज्याचे जवळचे असे कोणी लढाईवर गेले नसतील त्यालाच! माझ्या दुःखावरील खपली अगदी ताजी आहे. कारगिलच्या लढाईत माझ्या पतीला वीरगती प्राप्त झाली."


     "भारताच्या सीमेवर शत्रूने छुपे युद्ध सुरू केले. घनघोर लढाई झाली. त्या युद्धात भारतीय सैन्याची सरशी झाली. युद्ध जिंकल्यामुळे सर्व देशामध्ये आनंदोत्सव करणे चालू असताना माझ्या व माझ्या छोट्या बाळाच्या जीवनात मात्र दाट अंधार पसरला. कारण त्या लढाईत माझ्या बाळाच्या बाबांना वीर मरण लाभले होते. मी अभागिनी निराधार झाले."


     "नवऱ्याला युद्धभूमीवर वीरगती प्राप्त झालेल्यामुळे मी माझ्या मावशीकडे पुढील जीवनचा प्रवास सुरू केला. माझ्या मावशीची परिस्थिती सुध्दा हलाकिची असल्यामुळे त्यांनी आपल्या ऐपतीप्रमाणे माझे संगोपन केले. माझे लाड कधीच झाले नाही, पण दुःस्वासही माझ्या वाट्याला कधी आला नाही. एस. सी. सी. झाल्यावर नोकरीला लागले. स्वतःच्या पायांवर उभी राहत होते, तोच लग्न जमले. माझ्या घरच्यांनी कोणताही विलंब न करता माझे लग्न लावून दिले. कारण माझे पती लष्करात होते. भारतीय लष्कराचे जेव्हा बोलावणे येईल तेव्हा त्यांना तत्काळ युध्दभूमीवर जावे लागणार होते."


     "अचानक युद्ध सुरू झाल्याची घोषणा झाली आणि त्यामुळे ताबडतोब माझ्या पतीला रनभूमीवर हजर राहण्याचा हुकूम आला आणि त्यांनी माझा निरोप घेतला. आताच कोठे आमचा सुखी संसार सुरू झाला होता. त्यांनी त्या दिवशी माझा जो निरोप घेतला ती भेट दुर्दैवाने माझी आणि त्यांची शेवटचीच भेट ठरली. बाबाने बाळाला पाहिले नाही. बाळाने ही आपल्या पित्याला कधीच पाहिले नाही."


     "पतीच्या अचानक जाण्याने या जगामध्ये मी एकटी पडले आहे असा विचार मनात सतत येऊ लागला, कारण माझा भक्कम आसरा निघून गेला होता, पण माझ्या मुलाला मला पोरके करायचे नव्हते. एक विलक्षण आत्मिक बळ माझ्यात निर्माण झाले. मी माझे अश्रू पुसले, कारण आता मी वीरपत्नी होते. माझ्या पतीला वीरगती मिळाली होती. आता मला वीरमाता व्हायचे होते."


      "मला पुढे जाऊन सरकारी नोकरी मिळाली आणि राहण्यासाठी सुध्दा शासनाकडून जागा ही देण्यात आली. मी माझ्या छोट्याशा मुलाला पाळणाघरात ठेवून मी आता कामावर जाऊ लागले. येणाऱ्या २६ जानेवारीच्या दिवशी आपल्या देशाच्या सन्माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते मी माझ्या पतीचे मरणोत्तर वीरपदक स्वीकारले. आज मी माझे जीवन एकाकीपणाने जगत असताना या नैराश्यमय जीवनात माझ्यासोबत फक्त या साऱ्या शौर्यगाथाच मला सोबत करतात. मात्र या सर्वामधून जीवन जगण्याचा  माझा निर्धार मात्र अधिक बळकट आणि दृढ झाला आहे, म्हणूनच मी माझ्या बाळाला ही शूर सैनिक बनवणार आहे."


The psyche of the wife of a soldier who came to work in the war

 (Essay on autobiography)



 Points : Introduction - War story Ramya - Soldier's wife expresses her thoughts - Thoughts about her husband who came to work in the war - War incident - The result of the news - Government help - Pride from the President - Veerapatni will now become Veermata - Determination ...


 It's called "War Story", really!  But to whom?  Only those close to him who have not gone to war!  The scab on my grief is very fresh.  My husband won the battle of Kargil. "


 "The enemy started a covert war on the border of India. There was a fierce battle. The Indian army was victorious in that battle. The victory of the war was celebrated all over the country.  I was devastated. "


 "After my husband passed away on the battlefield, I started the journey of my next life with my aunt. My aunt's condition was also poor and she took care of me like her own. I was never pampered, but I never had any misfortune.  "I was standing on my own two feet. The marriage took place. My family arranged my marriage without any delay because my husband was in the army. When the Indian Army was called in, they had to go to the battlefield immediately."


 "Suddenly the war was announced and immediately my husband was ordered to be present on the battlefield and he said goodbye to me. Our happy world had just begun. The goodbye he said to me that day was unfortunately my last meeting with him.  He never saw the baby. The baby never saw his father. "


 "The sudden departure of my husband made me think that I was alone in this world, because my stronghold was gone, but my son did not want to orphan me. A wonderful spiritual force was created in me. I wiped away my tears, because now I am a heroine.  My husband had got Veergati. Now I wanted to be a Veermata. "


 "I went ahead and got a government job and was given a place to live by the government. I left my youngest child in the nursery and now I am going to work.  All these heroic deeds accompany me in this depressing life. But through all this, my determination to live life has become stronger and stronger, that is why I am going to make my baby this brave soldier. "