शाळा नसत्या तर...
किंवा
शाळा बंद पडल्या तर...
कल्पनाविलासात्मक निबंध / कल्पनाप्रधान निबंध
मुद्दे : प्रस्तावना - लहानपणीचा दृष्टीकोन - बंधन - शिक्षा, परीक्षा - मुक्ततेत अटकाव - अनुभवाचे पुस्तक - गुरुविना ज्ञान असंभव - रम्य ती शाळा - ज्ञानार्जनासाठी महत्व - मित्र-मैत्रिणी, शिक्षक - आपुलकी, सहली, विविध स्पर्धा, बक्षीस समारंभ - अनंत आठवणी - संस्कार - शाळा नसत्या तर - पुढील शाखा, व्यवसायाच्या वाटा - शाळेचे महत्त्व - समाजाची घडी बिघडून जाईल...
शाळा म्हणजे 'कडक बंधने', शाळा म्हणजे 'विविध प्रकारच्या शिक्षा' अशीच समीकरणे बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या मनात बसलेली असतात. शाळा नसत्या तर... शाळा बंद झाली तर मुलांच्या वाट्याला मुक्तजीवन येईल. मनाला लागेल तेव्हा खावे, मनाला वाटेल तेव्हा पाणी प्यावे, नाचावे, बागडावे, आरडाओरडा करावा... त्यांना कोणी अडवणार नाही. जीवनाच्या मुक्त शाळेच्या अनुभवाच्या पुस्तकातून त्यांनी हवे ते, हवे तेवढे शिकावे, पण हे शिकणे सर्वांनाच कसे जमावे? कारण 'गुरुविना ज्ञान प्राप्त करणे असंभव आहे' असे थोर माणसे सांगून गेली आहेत.
शाळेतील काही काही गोष्टी मनाला खूप त्रासदायक वाटत असल्या तरी 'रम्य ती शाळा' हेच खरे! शाळेत जीवाभावाचे सोबती जोडले जातात. मित्रांच्या संगतीत नाना मनोराज्ये रंगवली जातात. साहस करण्यासाठी शाळा आणि शाळकरी मित्र आवश्यकच असतात. शाळेतील स्नेहसंमेलने, त्यात रंगवलेली नाटके, शाळेत केलेली इतर धमाल, शाळेतील सहली, श्रमदानांचे कार्यक्रम आणि त्यानंतर श्रमपरिहाराची भोजने, क्रीडास्पर्धा, बक्षीस समारंभ या सार्या गोष्टी शाळा बंद पडल्या तर अनुभवायला मिळणार नाहीत.
शाळा म्हटली की चुरशीच्या स्पर्धा आल्या. कबड्डी, खो-खो, क्रिकेट, व्हॉलीबॉल कोणताही सामना असा रंगतो की, सामना संपला तरी पुढे महिनोनमहिने त्याबाबतच्या आठवणींची उजळणी होते. शाळा बंद पडल्या किंवा शाळा नसत्या तर मग असे विविध प्रकारचे चुरशीचे, मनोरंजनात्मक सामने कसे बरे रंगणार?
शाळा ही विद्यार्थ्यांची माता असते. अनेक कडू-गोड आठवणी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनात जमा केलेल्या असतात. शाळेमध्ये शिकत असताना आपल्या प्रत्येकाच्या मनावर फार मोलाचे संस्कार उमटलेले असतात. म्हणून माणूस त्याच्या जीवनामध्ये किती हि मोठा झाला, तरी तो आपल्या शाळेला विसरू शकत नाही. म्हणूनच शाळा नसत्या तर मानवाचे नक्कीच फार मोठे नुकसान झाले असते. त्यापेक्षाही माणूस स्वतःचे माणूसपण गमावून बसला असता.
If there were no schools ... Or If schools close ... Imaginative Essay / Imaginary Essay
Points : Introduction - Childhood Perspectives - Bondage - Education, Exams - Obstacles to Freedom - Book of Experience - Knowledge Impossible Without Guru - Beautiful School - Importance for Acquiring Knowledge - If there is no school - The next branch, the share of business - The importance of school - The society will be ruined ...
The equation that school means 'strict restrictions', school means 'various kinds of punishment' is ingrained in the minds of most students. If there is no school ... If the school is closed, the children will have a free life. Eat when you feel like it, drink water when you feel like it, dance, run around, shout ... no one will stop them. They should learn as much as they want from the free school experience book of life, but how can everyone learn this? Because great men have said that it is impossible to get knowledge without a guru.
Although some things in school seem very annoying to the mind, it is true that 'Ramya te shala'! Lifelong companions are added to the school. Various mental states are painted in the company of friends. School and school friends are essential for adventure. The school reunions, the plays painted in them, the other activities at the school, the school trips, the Shramdana programs and the subsequent Shramparihara meals, sports competitions, prize ceremonies will not be experienced if the school is closed.
The school said Churshi competitions came. Kabaddi, Kho-Kho, Cricket, Volleyball. If schools are closed or there are no schools, then how can such a variety of fun-filled matches be played?
The school is the mother of the students. Many bitter-sweet memories are accumulated by the students in their school life. While studying in school, valuable values are inculcated in the mind of each of us. So no matter how old a man is in his life, he cannot forget his school. Therefore, without schools, human beings would have suffered a great loss. Even more than that, man would have lost his humanity.