ज्ञानेश्वरांची समाधी बोलू लागली तर.... (कल्पनाविलासात्मक निबंध ) If Dnyaneshwar's Samadhi starts talking ...

 ज्ञानेश्वरांची समाधी बोलू लागली तर...

If Dnyaneshwar's Samadhi starts talking ...


          एक दिवस आळंदीमधील संत ज्ञानेश्वरांच्या समाधीजवळ उभा होतो. जवळच अनेक भक्तगण हरिपाठाचे अभंग एकतानतेने मंत्रमुग्ध होऊन गात होते. 'देवाचिये द्वारी उभा क्षणभरी I तेणे मुक्ती चारी साधीयल्या॥' भक्तगणांचा मंत्रमुग्धता पाहून माझ्या मनात आले, ज्ञानेश्वरांना हा भक्तांचा प्रचंड भक्तिभाव बघून काय वाटत असेल? भक्तगण आपल्या परमेश्वराशी संवांद साधतात ते या भजन, कीर्तन - गायनातूनच, परंतू ज्ञानेश्वरांची ही समाधी खरोखरच बोलू लागली तर काय होईल, ती आपल्याला काय सांगेल? आजच्या संपूर्ण जगाकडे, त्यांना प्रिय असणाऱ्या विश्वाकडे पाहून त्यांना काय वाटत असेल?

          तेराव्या शतकामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये संत ज्ञानेश्वर होऊन गेले. त्यांनी लहान वयातच ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना केली. ज्ञानदेवांची गणना आपल्या देशातील महान संतांमध्ये आणि उत्कृष्ट कवी म्हणून केली जाते. ज्ञानेश्वरांनी स्वतःच्या जीवनामध्ये अनेक पुस्तके लिहिली. त्यांनी 'अमृतानुभव' हे पुस्तक लिहल्यानंतर चार भाऊ व बहिणीसह ते आळंदी येथे आले.  त्यांनी या ठिकाणी भक्तीभावाचा प्रसार केला. अनेक अभंग रचले. याच आळंदी गावात त्यांनी जिवंत समाधी घेण्याचा निर्णय घेतला. अवघ्या वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यांनी समाधी घेतली. ज्ञानेश्वरांच्या या समाधीचे अत्यंत भक्तीभावाने 'समाधीचे अभंग' असे वर्णन नामदेवांनी केले आहे. ज्ञानेश्वरांच्या समाधी घेण्याच्या वेळेचे वर्णन नामदेवांनी स्वतःच्या डोळ्यानी पाहून हुबेहुब केले आहे. या प्रसंगाचे चोखामेळा यांनी 'समाधी निर्धार संजीवनी' असे केले आहे.  तिच समाधी आज बोलू लागली तर?

          संपूर्ण विश्वव्यापी देवांना 'विश्वात्मके देवे' म्हणून आळवणाऱ्या ज्ञानदेवांना चार भिंतीमध्ये कोंडून ठेवणारा देव कसा रुचेल? या समाधीमधून ज्ञानदेव बाहेर आले आणि त्यांनी आजच्या विश्वावर नजर फिरवली, तर त्यांच्या मनाला किती दुःख होईल! कारण ज्ञानदेवांनी विश्वशांतीसाठी विश्वात्मक देवाकडे पसायदान मागितले आहे. ज्ञानेश्वरांनी सर्व भूतमात्रांकडे उदार, व्यापक, विशाल आणि एकात्मदृष्टीने पाहिले. त्यांनी सर्व विश्वासाठी 'जे खळांची व्यंकटी सांडो' हे पसायदान मागितले. परंतू आज सर्व ठिकाणी चालू असलेले खलांचे साम्राज्य बघून समाधीमधून जागे झालेले ज्ञानदेव दुःखाने व्यथित होतील. त्यांनी स्वतःच्या नैतिकतेच्या अखंड शिकवणीत दीनदुबळ्या लोकांना, सर्व सामान्य लोकांना अनेक प्रकारचे अधिकार दिले आहेत. त्यांचे आध्यात्मिक प्रथा हि कवितांनी चैतन्यशीलतेने परिपूर्ण आहे. त्यांनी त्यांच्या कवितांमध्ये तत्वज्ञान सांगितले आहे. ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक भागामध्ये रस, काव्य आणि अलंकार यांचा सुंदर संगम आहे. त्यांच्या शिकवणीमुळे महाराष्ट्रामध्ये सर्व जमातीमध्ये भगवद्धक्तांची एक पिढी निर्माण झाली होती. असे सर्व असताना वर्तमानातील वास्तव पाहून त्यांच्या मनाला काय वाटत असेल.

          ज्ञानेश्वरांना मराठी भाषेचा नितांत अभिमान होता. आपल्या मराठी भाषेचा बोलच आहे, 'अमृतातेही पैजा जिंके.' असे ज्ञानेश्वर विश्वाला अभिमानपूर्वक सांगत असत. त्यामुळे स्वतःच्याच समाधीच्या अवतीभोवती अशुद्ध आणि वेडीवाकडी मराठी भाषा ऐकून त्यांना किती दुःख होईल. मराठी भाषेच केलेला अवमान त्यांना समाधी मध्ये गप्प बसू देत असेल ना. या विचाराने मन हळहळून जाते. आपल्या मराठी भाषेतील कुशाग्र बुद्धिमान विचारवंतांकडून होणारी मराठीची अवहेलना पाहून त्यांचे मन किती दुःखी होईल. आजूबाजूचा अश्वत्थमुळांचा फास समाधिस्थ ज्ञानेश्वरांना बसत आहे, असा संत एकनाथांना दृष्टान्त झाला तेव्हा त्या जाणत्या भक्ताने ज्ञानेश्वरांचे पूर्णपणे संशोधन आणि संपादन केले. खरचं, ज्ञानेश्वरांची समाधी बोलू लागली, तर तिला आजही निष्ठावंत संत एकनाथांसारख्या भक्तांची नितांत आवश्यकता भासेल. 

          समाधी भोवती ज्ञानेश्वरी ग्रंथाचे केवळ यंत्रवत पठण करणाऱ्या भक्तांचा ज्ञानेश्वरांना नक्कीच राग येईल. त्या सर्वांना ज्ञानदेव संतापून कर्मयोगाचा आदेश देत असतील. हा सर्वश्रेष्ठ योगी जीवनात नामस्मरणाला प्रत्यक्ष कर्माची जोड ही हवीच असा मानणारा होता. चुकीचा मार्गावरून प्रस्थान करणाऱ्या या मनुष्य जमातीला सत्प्रवृत्त करण्यासाठी पुनः या भूलोकावर यावेच लागेल, असा विचार ज्ञानदेवांच्या मनात नक्कीच बळावेत असेल यात वादच नाही. कारण ज्ञानेश्वरांनी महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाच्या पायाभरणी करता समर्थपणे काम केले आहे. समाजातील सर्व लोकांना वारकरी संप्रदायामध्ये घेऊन त्यांनी सर्वांना ज्ञानोत्तर भक्ती मार्ग दाखवून दिला. 


English translation


If Dnyaneshwar's Samadhi starts talking ...

One day he stands near the tomb of Saint Dnyaneshwar in Alandi.  Nearby, many devotees were mesmerized and sang Haripatha in unison.  'Standing at the door of God for a moment, you have attained liberation.'  Seeing the enchantment of the devotees, it came to my mind, what would Dnyaneshwar feel seeing this huge devotion of the devotees?  Devotees communicate with their Lord only through this bhajan, kirtan-singing, but what will happen if this samadhi of Dnyaneshwar really starts speaking, what will it tell us?  How would they feel about the world today, the world they love?

 In the thirteenth century, Saint Dnyaneshwar passed away in our Maharashtra.  He composed Dnyaneshwari at an early age.  Gyan Devas are counted among the great saints and great poets of our country.  Dnyaneshwar wrote many books in his own life.  After writing the book 'Amritanubhav', he came to Alandi with his four brothers and sisters.  He spread devotion in this place.  Composed many abhangs.  He decided to take Samadhi alive in this Alandi village.  He passed away at the tender age of 21.  Namdeo has described this Samadhi of Dnyaneshwar as 'Abhang of Samadhi' with great devotion.  Namdeo has described the time of Dnyaneshwar's Samadhi with his own eyes.  Chokhamela has described this occasion as 'Samadhi Nirdhar Sanjeevani'.  What if she started talking about Samadhi today?

 How can a god who calls all the world gods as 'Vishwatmake Devas' confine the gods of knowledge in four walls?  If Dnyandev came out of this Samadhi and looked at today's world, how sad his mind would be!  Because the gods of knowledge have asked the cosmic god for world peace.  Dnyaneshwar looked at all the ghosts in a generous, comprehensive, vast and united manner.  He asked for the pasayadan 'Je khalanchi vyankati sando' for all faith.  But Gyandev, who woke up from Samadhi today, will be saddened to see the kingdom of Khalas going on everywhere.  He has given many kinds of rights to the poor, to all the common people in his uninterrupted teaching of morality.  His spiritual practice is perfected by poetry.  He has stated philosophy in his poems.  Every part of Dnyaneshwari has a beautiful confluence of juice, poetry and ornaments.  His teachings had created a generation of Bhagavad-gita devotees in all the tribes of Maharashtra.  In spite of all this, what will be on their minds when they see the present reality.

 Dnyaneshwar was very proud of Marathi language.  In our Marathi language, 'Amritatehi Paija Jinke.'  That is what Dnyaneshwar used to proudly tell the world.  Therefore, how sad it will be for them to hear the Marathi language around their own Samadhi.  The insult done in Marathi language will not allow them to remain silent in Samadhi.  The mind is moved by this thought.  How sad their minds will be to see the contempt of Marathi by the sharp intelligent thinkers in our Marathi language.  When Saint Eknath had a vision that Samadhistha Dnyaneshwar was being trapped by the Ashwattha roots around him, the conscious devotee thoroughly researched and edited Dnyaneshwar.  In fact, if Dnyaneshwar's Samadhi is spoken, she will still be in dire need of devotees like the faithful Saint Eknath.

 Devotees who only mechanically recite Dnyaneshwari scriptures around Samadhi will surely get angry with Dnyaneshwar.  Dnyandev will be angry and order Karma Yoga to all of them.  In the life of this best yogi, Namasmarana was supposed to be a combination of actual karma.  There is no doubt that the minds of the Gods of Knowledge will have to come back to this earth to make this human race, which has departed from the wrong path, good.  Because Dnyaneshwar has worked hard to lay the foundation of Warkari sect in Maharashtra.  He brought all the people of the society into the Warkari sect and showed them the path of post-enlightenment devotion.