आई, थोर तुझे उपकार किंवा आई-एक महान दैवत किंवा न ऋण जन्मदेचे फिटे
Mother, great thanks to you or mother आई a great deity or a debt of no birth
कविवर्य यशवंत यांनी आईची थोर थोरवी गाताना म्हटले आहे, 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी!' हे विधान अगदी सत्य आहे. मातेचे प्रेम हे अतुलनीय आणि महान आहे. आपल्या जन्मदेपुढे सत्ता, मत्ता, विद्वत्ता हे सर्वकाही क:पदार्था सारखे आहेत. त्यामुळेच तर संपूर्ण जगासमोर कधीही न झुकलेला जगज्जेता सिकंदर आपल्या आईसमोर मात्र नम्रतेने नतमस्तक होत असे. आपल्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत, महाराष्ट्राचे स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हेसुध्दा श्रेष्ठ मातृभक्त होते. आज अनेक प्रगतीपथावर पोहचलेल्या उद्योजकांना, विकासकांना त्यांच्या या प्रगती मागील कारण विचारले तर ते प्रथम स्थान स्वतःच्या आईला देतात. प्रत्येकाच्या तोंडून एकच वाक्य ऐकण्यास मिळत, 'आईच्या आशिर्वाद होता, म्हणून हे सर्व साध्य करू शकलो.' आपल्या आयुष्यात आई हिच आपली गुरु असते. ती आपल्याला बोट धरून एक एक पाऊल चालायला शिकवते. मातेचे प्रेम हे अथांग असते. आपल्या माते विषयी प्रत्येकाच्या मनात आदर असला पाहिजे. रस्त्यामध्ये चालताना कधी पायाला ठोकर लागली तर प्रथम तोंडी नाव येते ते आईचेच. प्रत्येकाची आई खूप खूप प्रेमळ असते.
विश्वपातळीवर सर्वत्र मातेच्या वात्सल्याचे स्वरूप सारखेच आढळते. आईच्या प्रेमाची, मायेची, वात्सल्याची असंख्य उदाहरणे आपल्या सर्वांच्याच परिचयाची आहेत. गावामध्ये दिवसभर चारपाच घरे हिंडून भाकर-तुकडा गोळा करून आणणारी भिकारीण सुध्दा स्वतः उपाशी राहते, पण स्वतःच्या लेकराला सर्वप्रथम ओला असो की सुका तुकडा ती मायेने भरवते. वेळप्रसंगी ती अपत्याच्या प्रेमापोटी आपल्या प्राणांची आहुती देते. रायगडावरील हिरकणी बुरुज हे इतिहासामधील याचे जिवंत स्मारक आहे. कारण हिरकणीने स्वतःच्या बाळासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अवघड कडा उतरला होता.
आई आपल्या लेकरासाठी काय काय करत नाही? ती बाळाला जन्म देते. त्याची रात्रदिवस जागून सेवा करते. आपल्या बाळाचे प्रत्येक हट्ट पुरवण्यासाठी ती सदैव तत्पर असते. बाळाच्या प्रत्येक बालिश हट्टापुढे ती झुकते. मुलाला पहिले पाऊल चालण्यास आईच मदत करते. एवढेच नाही, तर हिच माता सर्वस्वी परावलंबी असलेल्या आपल्या लेकराला ती स्वतःच्या नयनांचा दिप आणि तळहाताचा पाळणा करून जीवापाड सांभाळते. ती त्याचे योग्य संगोपन करते, त्याचा योग्य विकास व्हावा यासाठी त्याला चातुर्यकथा, नीतिकथा यांचे कथन करून त्याचे ती कुसुमकोमल मन घडवते. त्यावर सतत सुसंस्कार घडवते. शिवाजी महाराज, विनोबा भावे, महात्मा गांधीजी यांसारख्या थोर व्यक्तींनी आपल्या आईलाच आपल्या यशाचे सर्व श्रेय दिले आहे. बापूजी तर आपल्या आत्मवृत्तात प्रांजळपणे लिहतात, "एक आई ही सहस्त्र शिक्षकांपेक्षा श्रेष्ठ आहे."
प्रत्येकाचा आई आपल्या मुलावर भरभरून प्रेम करते. ती सतत काहीना काही काम करत असते. टेलिव्हिजन वरील निवडक कार्यक्रम पाहते. परंतू असे कार्यक्रम पाहताना ती कधी थांबत नाही. तिचा हात कामात नेहमी व्यस्त असतो. या मातेचा विनक्रमच भल्या पहाटेपासून सुरू होतो. आपली लेकर जागी होण्याच्या अगोदर खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था करते. एवढ सर्व करून सुद्धा तिच्या कामामध्ये आणखी भर पडते ती मुलांच्या अभ्यासाची. याबरोबर ती स्वतः मधील विविध कला, छंद जोपासत असते. स्वतःच्या कलागुणांसोबत इतरांच्या कलागुणांनाही प्रेरणा देते. त्यामुळे आईचे उपकार न फिटणारे आहेत.
आपल्या आईच्या या उपकाराची परतफेड आपण आपल्या आयुष्यात खरचं करू शकतो का? आयुष्याच्या या विसाव्यावर आपल्या वृद्ध आईवडिलांची निस्वार्थ सेवा करणे, ही काही अंशाने त्या ऋणांची परतफेड म्हणता येईल. खरं पाहिलं तर हा आपल्या कर्तव्याचाच एक भाग असतो. परंतू अनेक ठिकाणी अनेक कृतघ्न करंटे याचीच फेड पैशाने करू पाहतात आणि आपल्या जन्मदात्या मातापित्यांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवतात. ज्यांनी आयुष्यभर आपले आयुष्य सुखकारक व्हावे यासाठी खस्ता खालल्या तेच मातापिता म्हातारपणी आपल्या मुलांच्या प्रेमाच्या सावलीत विसावण्यासाठी आतुरलेले असतात. असे घडल्यास ते स्वतःच्या जीवनाचे सार्थक समजतात.
आईचे आपल्यावर असलेले हे कृपाछत्र एवढे विशाल आहे, तिचे उपकार एवढे अमाप आहेत की आपण शेकडो वेळा जन्म घेऊनही ते फिटणारे नाहीत. जननी हे दैवतच असे असामान्य आणि महान आहे. हे दैवत आयुष्यभर आपल्यावर सतत कृपाप्रसादाची खैरात करत असते. म्हणूनच तर प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राना सुध्दा माता ही स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ वाटते. मातेच्या या महानतेवरूनच कवी म्हणतो, 'मातेसारखे आराध्य दैवत साऱ्या जगतामधि नाही.'
English translation
Mother, great thanks to you or mother आई a great deity or a debt of no birth
Poet Yashwant has sung his mother's great song, 'Swami, beggar without mother of the three worlds!' This statement is absolutely true. Mother's love is incomparable and great. Before your birth, power, wealth, knowledge, everything is like substance. That is why Alexander the Great, who never bowed before the whole world, humbly bowed before his eyes. Chhatrapati Shivaji Maharaj, the deity of Maharashtra, the founder of Swarajya of Maharashtra, was also a great mother devotee. Many advanced entrepreneurs today, if developers are asked the reason behind their progress, they give first place to their own mother. Hearing the same sentence from everyone's mouth, 'Mother was blessed, so we were able to achieve all this.' Mother is our Guru in our life. She teaches you to hold your finger and walk one step at a time. Mother's love is endless. Everyone should have respect for their mother. Whenever I stumble on the road, the first thing that comes to my mind is my mother's name. Everyone’s mother is very, very loving.
The nature of mother's affection is the same everywhere in the world. Numerous examples of mother's love, affection, affection are familiar to all of us. The beggar who walks around the village four days a day to collect a piece of bread is also starving herself, but the first thing her child does is wet or dry, she fills it with love. In time, she sacrifices her life for the love of her child. The Hirkani Buruj on Raigad is a living monument in history. Because Hirkani had come down a difficult cliff for her own baby, regardless of her own life.
What does a mother not do for her child? She gives birth to a baby. Serves him awake day and night. She is always ready to provide for your baby's every move. She bows to every childish hue of the baby. The mother helps the child to take the first step. Not only that, but the same mother takes care of her child with the help of her own eyes and palms. She nurtures him properly, develops his tender heart by telling him clever stories and fables for his proper development. It constantly cultivates. Great people like Shivaji Maharaj, Vinoba Bhave, Mahatma Gandhiji have given all the credit for their success to their mother. Bapuji frankly writes in his autobiography, "A mother is superior to a thousand teachers."
Everyone's mother loves her child dearly. She is constantly working on something. Watches selected programs on television. But she never stops watching such programs. Her hand is always busy at work. This mother's humility starts from a good morning. Your child arranges all food and drink before waking up. Even so, owning one is still beyond the reach of the average person. Along with this, she cultivates various arts and hobbies in herself. Inspires the art of others as well as one's own. So mother's favors are unfathomable.
Can we really repay this kindness of our mother in our life? Selfless service to your aging parents during this rest of life can be said to be a repayment of those debts to some extent. In fact, it is part of our duty. But in many places many ungrateful currants try to do the same with Fed money and show their birth parents the way to the old age home. Only those parents who have worked hard to make their lives happier are eager to rest in the shadow of their children's love in old age. When that happens, they find their lives meaningful.
Mother's grace is so great, her blessings are so immense that even if you are born hundreds of times, they will not fit. Janani is such an unusual and great deity. This deity is constantly bestowing grace on us throughout our lives. That is why even the real Lord Ramachandra thinks that mother is superior to heaven. It is from this greatness of the mother that the poet says, 'There is no deity like the mother in the whole world.'