आम्हांला मातृभाषेचा अभिमान आहे का? किंवा मातृभाषेचे ऋण
Are we proud of our mother tongue? Or mother tongue debt
माणूस या धरतीवर जन्म घेतो ते स्वतःच्या डोक्यावर अनेक गोष्टींच्या ऋणांचे ओझे घेऊनच! या सर्व ऋणांपैकी आयुष्यात कधीच फेेडता न येणारे ऋण म्हणजेच आपल्या मातृभाषेचे ऋण! समजा असा विचार मनात आला की, माणसाला ही मातृभाषा गवसलीच नसती तर माणसाने काय केले असते? आई जवळ त्याला हवा असलेला हट्ट बाळाने कसा व्यक्त केला असता? याच बाळाने त्याच्या वेदना, भावना, त्याला हवेेे - नको या सर्व गोष्टी व्यक्त करण्यासाठी त्याने कशाचा आधार घेतला असता?
आजीं-आजोबा, आई-बाबा यांच्याकडून लहान बाळाला मातृभाषेचा वसा मिळतो. आईच्या मधूर वाणीतूनच बाळ पाळण्यात असताना त्याच्या कानावर गोड अंगाईगीत पडते. स्वतःच्या मातृभाषेतूनच, बाळ चिऊकाऊच्या मनोरंजक गोष्टी ऐकते. हे सर्व ऐकल्यावर त्याला मिळालेला आनंद व्यक्त करण्यासाठी, 'चांदोबा, चांदोबा भागालास का?' असे बोबडया बोलांतून बाळ गाऊ लागते. अशी ही मातृभाषा जी आपले जीवन समृद्ध करते, ती जन्मापासूनच सदैव आपल्या सोबत असते. बाळाचा जन्म झाल्यापासून त्याच्या कानावर त्याच्या मातृभाषेचा वर्षाव होत असतो. आई लाडालाडाने लाड करते ती तिच्या भाषेतून, हिच भाषा त्या बाळाची मातृभाषा असते. मातृभाषा शिकवावी लागत नाही. ती जन्मापासूनच प्रत्येकाला आपोआप अवगत होते. कोणतीही माहिती असो, ती स्वतःच्या मातृभाषेतून सहज समजते. पूर्णपणे समजते. एखादी समस्या सुध्दा आपण आपल्या मातृभाषेतूनच प्रभावीपणे समोरच्या व्यक्तीला समजावू शकतो.
मनुष्याच्या संपूर्ण आयुष्यात जेवढे मातेचे आणि मायभूमीचे महत्त्व असते तेवढेच महत्त्व मातृभाषेचेही असते. कारण हिच मातृभाषा त्याच्यावर सुयोग्य असे संस्कार करत असते. या सर्व संस्कारांमधूनच त्याचे व्यक्तिमत्त्व आकार घेते, विकसित होते, सर्व बाजूने फुलते, संपन्न होते. अस म्हणतात, मातृभाषेतून घेतलेल शिक्षण कधीच वाया जात नाही. संत ज्ञानेश्वरांनी मातृभाषेमधील हे सामर्थ्य ओळखले होते, म्हणूनच त्यांनी आपल्या गोरगरिब जनसामान्यांना भगवद् गीतेतील तत्त्वज्ञान मराठी भाषेतूनच सांगण्याचा निर्धार केला. ज्ञानदेवांना मराठी मातृभाषेची ही महानता समजली होती, म्हणून तर त्यांनी समाजातील कर्मठ लोकांचा विरोध सहन करून मातृभाषेतच स्वतःच्या काव्यरचना करण्याचा आग्रह धरला. संत तुकाराम यांनी आपल्या अभंगरचनांनमध्ये मातृभाषेतूनच स्वतःचे विचार रोखठोकपणे व विलक्षण तळमळीने लोकांसमोर व्यक्त केले. त्याचबरोबर झोपी गेलेल्या समाजामध्ये समाजप्रबोधन करण्यासाठी समर्थ रामदासांना मातृभाषाच उपयोगी पडली. या सर्वांनी समाजप्रबोधनासाठी मातृभाषेचा वापर केला नसता तर त्यांच्या रचलेल्या अंभंगातील, श्लोकातील, भारूडातील ज्ञान लोकांपर्यंत पोहचलेच नसते. ते तसेच बंद पुस्तकात पडून राहिले असते.
आपल्या भावनांचे आणि विचारांचे प्रभावी आदानप्रदान सहजपणे आपल्याला मातृभाषेतूनच करता येते, म्हणूनच सर्व ठिकाणी मातृभाषा हेच शिक्षणाचे माध्यम असायला हवे. आज मातृभाषे ऐवजी इतर भाषेमधून शिक्षण घेण्याची प्रथा समाजामध्ये फोफावू लागली आहे. परंतू त्याचे होणारे विपरित परिणाम वेळ निघून गेल्यावर समजतात. कोणत्याही विषयावर आपण आपल्या मनामध्ये विचार करतो तो मातृभाषेतूनच करतो. परंतू मातृभाषेव्यतिरिक्त इतर भाषेतून शिक्षण घेण्यासाठी किंवा ती भाषा अभ्यासण्यासाठी आपली शक्ती नाहक खर्च होते. आपण आपल्या मातृभाषेतून आजची प्रगत शास्त्रे व त्यांची परिभाषा आणू शकणार नाही, हि आपली विचारधाराच निराधार आहे. एकेकाळी अणुबॉम्बने पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या जपानसारख्या देशाने सुध्दा स्वतःची प्रगती स्वतःच्या मातृभाषेतूनच केली आहे. जपानमधील जनतेने कोणत्याही विदेशी भाषेचा पांगुळगाडा घेऊन प्रवास केला नाही.
सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे, 'आम्हांला आपल्या मातृभाषेचा खरचं अभिमान आहे का?' आपल्या गावाचा, जिल्ह्याचा, राज्याचा, देशाचा आणि एकंदरीत आपला स्वतःचा व्यक्तिगत सर्वांगीन विकास साधायचा असेल तर मातृभाषेचे ऋण मानले पाहिजे आणि आपल्या मातृभाषेचा महान ठेवा प्रत्येकाने जतन केलाच पाहिजे. हा अभिमान बाळगण्यासाठी इतर भाषांप्रमाणे आपण आपल्या मातृभाषेचा सुध्दा अभिमान बाळगला पाहिजे. सर्वत्र मातृभाषेचा वापर केला पाहिजे. निदान आपण प्रत्येकाने आपल्या मुला - मुलींचे प्राथमिक शिक्षण तरी मातृभाषेतूनच पूर्ण केले पाहिजे. सर्व सरकारी दप्तरांमध्ये मातृभाषेतूनच कारभार केला पाहिजे. जेणे करून सरकारी कामकाज सर्वसामान्य जनतेला सहजपणे करता येईल. एवढे जरी केले तरी आपण आपल्या मातृभाषेचे ऋण थोडयाशा प्रमाणात फेडू शकतो.
English translation
Are we proud of our mother tongue? Or mother tongue debt
Man is born on this earth with the burden of many things on his head! Out of all these debts, the debt that can never be repaid in life is the debt of our mother tongue! Suppose the thought came to mind that if man had not found this mother tongue, what would man have done? How could a stubborn baby want to be close to his mother? What would this baby have used to express his pain, his feelings, his desires?
The baby gets mother tongue fat from grandparents and parents. Sweet lullabies fall on the ears of the baby while the baby is being raised by the mother's sweet voice. From his own mother tongue, the baby hears interesting things from Chihuahua. To express the joy he felt after hearing all this, 'Chandoba, why did Chandoba run away?' The baby starts singing with such dumb words. This mother tongue which enriches our life, is always with us from birth. From the moment a baby is born, his mother tongue is raining on his ears. The mother caresses the baby through her language, which is the mother tongue of the baby. Mother tongue does not have to be taught. She was automatically aware of everyone from birth. Whatever the information, it is easily understood from one's own mother tongue. Fully understands. We can effectively explain a problem to the person in front of us through our mother tongue.
The mother tongue is as important as the mother and the motherland in the whole life of a human being. Because this is the mother tongue that nurtures him in the right way. It is through all these rites that his personality takes shape, develops, flourishes on all sides, thrives. That being said, learning from the mother tongue is never wasted. Saint Dnyaneshwar had recognized this power in the mother tongue, so he decided to convey the philosophy of the Bhagavad Gita to his poor masses in Marathi. Dnyandev understood the greatness of the Marathi mother tongue, so he insisted on composing his own poetry in the mother tongue by enduring the opposition of the hardworking people in the society. Saint Tukaram, in his Abhangarachanan, expressed his thoughts in front of the people in his mother tongue. At the same time, Samarth Ramdas found his mother tongue useful for social enlightenment in the sleeping society. If all of them had not used their mother tongue for social enlightenment, the knowledge in their compositions, verses and verses would not have reached the people. It would have been lying in a closed book as well.
We can easily communicate our feelings and thoughts through our mother tongue, so mother tongue should be the medium of instruction everywhere. Today, the practice of learning in languages other than one's mother tongue is gaining ground in society. But over time, that is likely to change. Whatever we think about in our minds, we do in our mother tongue. But our energy is wasted on learning or studying a language other than our mother tongue. We will not be able to bring today's advanced scriptures and their definitions from our mother tongue, our ideology is baseless. Even a country like Japan, which was once completely destroyed by the atomic bomb, has made its progress in its mother tongue. The people of Japan did not travel with the cradle of any foreign language.
The most important question is, 'Are we really proud of our mother tongue?' If we want to achieve our own holistic development of our village, district, state, country and overall, we must consider the mother tongue as a debt and everyone must preserve the great treasure of our mother tongue. To be proud of this, we must be proud of our mother tongue, just like any other language. Mother tongue should be used everywhere. At least we should all complete the primary education of our children in their mother tongue. All government departments should be run in their mother tongue. So that government work can be done easily by the general public. Even so, owning one is still beyond the reach of the average person.
चर्चात्मकनिबंध