विना सहकार नाही उद्धार किंवा एकमेकां साहाय्य करू | अवघे धरू सुपंथ ( सुभाषितपर निबंध )
Without salvation there is no salvation or help Avaghe Dharu Supanth (Essay on Subhashit)
आपण सर्वांनी रामायण पाहिले असेल किंवा कोणाकडून ऐकले असेल. या रामायणातील कथेनुसार रावणाने साधूचे रूप धारण करुन माता सीतेला बंदिस्त करून तिला श्रीलंकेला बंदिस्त करून ठेवले होते. त्यामुळे प्रभू रामचंद्राला दशावतारी रावणच्या सोन्याच्या लंकेमधून माता सीतेला सोडवायचे होते. परंंतू प्रभू श्रीरामचंद्रा समोर फार मोठा प्रश्न निर्माण झाला होता की, समुद्र कसा ओलांडायचा? या विशाल समुद्रावर सेतू कसा तयार करायचा? हनुमंताने दिलेल्या आदेशावरून सर्व वानर मंडळी सेतूच्या कामाला लागली. प्रत्येक वानराने एक एक दगड उचलून त्यावर 'श्रीराम' असे लिहूून तो दगड पाण्यात टाकण्यास सुरुवात केली. या कामामध्ये अगदी छोट्याशा खारींनीही आपला वाटा उचलला. पाहता पाहता सेतूचे काम पूर्ण होऊन तो उभा राहिला आणि प्रभू रामचंद्राचे ईप्सित साध्य झाले. अथांग सागरावर विशाल सेतू बांधण्याचे काम पूर्ण झाले ते फक्त एकमेकांनी एकमेकांना केलेल्या साहाय्यामुळेच.
'विना सहकार नाही उद्धार!' या सुभाषिताचे महत्त्व आपल्या राज्याच्या शासनाने ओळखले आणि स्वातंत्र्योत्तर काळात अनेकविध अशक्य कामे एकमेकांच्या सहकाराने पूर्ण केली. राज्यामध्ये अनेक ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. महिला सबलीकरणा करीता विविध उपक्रम राबवले. विविध ठिकाणी सहकारी पतपेढ्या काढल्या. ग्रामीण भागात आवश्यक ठिकाणी सहकारी साखर कारखाने तयार झाले. गोरगरीबांच्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागात, खेडोपाडयात, वस्ती - वाड्य वर सहकारी शाळा सुरू केल्या. मोठी शहरे, तालुक्याच्या ठिकाणी महाविद्यालये सुरू केली. अशा तयार झालेल्या सहकारी संस्थांमध्ये कोणी एक मालक नसतो, कोणी एकाचा अधिकार नसतो, तर अशा सहकारी संस्थामध्ये प्रत्येकजण सहकारासाठी एकत्र आलेले मालक असतात. त्यामुळे स्वाभाविकपणे प्रत्येकाच्या मनात संस्थेविषयी, कामाविषयी आपुलकी वाटू लागते.
एकमेकांना सहकार्य करण्याची कल्पना तस पाहिल तर आपल्याला नवी नाही. पूर्वीच्या काळी ग्रामीण भागामध्ये कोणाच्या तरी घरी अडचण निर्माण झाली तर गावातील पंचायत मध्ये सभा बोलवून त्याविषयी चर्चा करून त्या गावातील सर्व लोक एकत्र येऊन त्याच्या शेतात राबत आणि योग्य वेळात सर्व काम पूर्ण करत असत. एकमेकांनी एकमेकांना केलेल्या सहकार्यामुळे हे सर्व साध्य होत असे.
पुरातनकाळातील अनेक कथांमधून आपल्याला सहकार्याची शिकवण मिळते. तलावातील पाण्यात पडलेल्या मुंगीचे प्राण कबूतराने झाडावरचे पान तोडून ते तलावात टाकून वाचवले, त्याचवेळी कबूतरावर बंदूकीचा नेम धरून बसलेल्या शिकाऱ्याच्या पायाला डसून मुंगीने कबूतराचे प्राण वाचवले. जंगलामध्ये आराम करत असलेल्या सिंहाच्या पायाच्या पंजामध्ये असलेल्या उंदराला त्याच्यावर दया आल्यामुळे त्याने सोडून दिले. त्याच उंदराने शिकाऱ्याने लावलेल्या जंगलातील जाळ्यात सिंह अडकला तेव्हा सिंहांच्या डरकाळ्या ऐकून जाळ्यात सापडलेल्या सिंहाला त्याच्या तीक्ष्ण दातांनी जाळे कुरतडून मुक्त केले.
आजच्या कलयुगातील मानव मात्र या सर्व गोष्टी विसरला आहे. आपली सर्व कामे यंत्रांच्या मदतीने सहज होतात, त्यामुळे आपल्याला कोणाचीही गरज नाही, असे त्याला वाटते. आजच्या माणसाची वृत्ती अत्यंत स्वार्थी आणि स्वयंकेंद्रित झाली आहे. आपल्या भारतामध्ये बहुजन वर्ग गरीब आहे. त्यांच्याकडे पैशांचे फारसे बळ नाही. परंतू एकात्मता साधून हाच वर्ग अशक्य असलेली कामे शक्य करू शकेल. त्यासाठी गावागावातील गरीब, पिडीत लोकांनी एकत्र येऊन एकमेकांना मदत, सहकार्य करून स्वतःची प्रगती करून घेण्याची गरज आहे.
सरकार पातळीवर जनतेच्या सुख सुविधेसाठी अनेक सरकारी योजना राबवल्या जातात. परंतू खर पाहता कोणा एकाच्या हातामधून मोठमोठ्या योजना साकार होणार नाहीत. कोणी एकाच्या सहकार्यामुळे या योजना पुर्णत्वास जाणार नाहीत. त्या साकार करण्यासाठी सर्वांचा सहभाग हवा. त्या पूर्ण होण्यासाठी सर्वांनी मिळून, एकत्र येऊन एकमेकांच्या सहकार्याने त्या पूर्ण केल्या पाहिजेत. विविध राष्ट्रांना आपले कुटुंब, समाज, गाव, राज्य आणि राष्ट्र यांच्यापुढे जाऊन वर्तमानात काही वैश्विक समस्या सोडवण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. अनेक समस्यांवर सर्व राष्ट्रांनी, त्या राष्ट्रामधीत संशोधकांनी एकत्रीत विचार करून सर्व उपयोग पडतील असे संशोधन करण्याची गरज आहे. अवकाशामध्ये नविन प्रयोग करताना, पृथ्वीच्या दुर्गम भागात संशोधन करताना अनेक देश एकत्र येऊन एकमेकांना सहकार्य करतात व स्वतःच्या देशाचा उद्धार साधतात. एकमेकांना सहकाराची महानता ही अशीच आहे.
English translation
Without salvation there is no salvation or help Avaghe Dharu Supanth (Essay on Subhashit)
We have all seen Ramayana or heard from someone. According to the story in this Ramayana, Ravana disguised himself as a sadhu and imprisoned Mother Sita in Sri Lanka. Therefore, Lord Ramachandra wanted to rescue Mother Sita from the golden Lanka of Dashavatari Ravana. But the big question before Lord Sri Ramchandra was, how to cross the sea? How to build a bridge over this vast ocean? On the orders given by Hanumanta, all the monkeys started working on the bridge. Each monkey picked up a stone and wrote 'Shriram' on it and started throwing the stone into the water. Even the smallest squirrels took part in this work. Seeing that the work of the bridge was completed, he stood up and the epsit of Lord Ramachandra was achieved. The work of building huge bridges over the endless sea was completed only because of the help given to each other.
'No salvation without cooperation!' The importance of this proverb was recognized by the government of our state and in the post-independence period many impossible tasks were completed with the cooperation of each other. Provided employment opportunities in many places in the state. Implemented various initiatives for women empowerment. Co-operative credit unions were set up at various places. Co-operative sugar factories were set up in rural areas where necessary. He started co-operative schools in rural areas, villages and hamlets to educate the children of the poor. He started colleges in big cities and talukas. In such co-operative societies, no one is the owner, no one has the right, while in such co-operatives, everyone is the owner who has come together for co-operation. So naturally everyone starts to feel affection for the organization, for the work.
The idea of cooperating with each other is not new to us. In the past, if there was a problem in someone's house in a rural area, the village panchayat would convene a meeting to discuss the matter and all the people of the village would come together and work in his field and complete all the work at the right time. All this was achieved through the cooperation of each other.
We learn the lesson of cooperation from many ancient stories. The pigeon saved the life of the ant by falling into the water of the pond. The pigeon broke the leaf of the tree and threw it in the pond. He let go of the rat in the lion's paw resting in the forest out of pity for him. When the same rat caught the lion in the forest trap set by the hunter, he heard the lion's snarl and freed the trapped lion with its sharp teeth.
Human beings in today's age have forgotten all these things. All your work is done easily with the help of machines, so he thinks you don’t need anyone. The attitude of today's man has become extremely selfish and self-centered. In our India, the Bahujan class is poor. They do not have much money. But with unity, the same class can make impossible tasks possible. For this, the poor and affected people in the villages need to come together and help each other and make their own progress.
At the government level, many government schemes are implemented for the welfare of the people. But in reality, big plans will not come out of anyone's hands. These plans will not be completed with the cooperation of anyone. Everyone needs to be involved to make that happen. To accomplish that, we must all come together and work together. Different nations need to go beyond their families, societies, villages, states and nations and come together to solve some of the current global problems. There is a need for all nations, researchers in that nation to think together on a number of issues and do research that will be useful to all. In new experiments in space, research in remote parts of the earth, many countries come together and cooperate with each other and save their own country. Such is the greatness of cooperation with one another.
सुभाषितपरनिबंध