डॉ. बाबासाहेब आंबेडकर : दलित-समाजसूर्य (चरित्रात्मक निबंध ) Dr. Babasaheb Ambedkar: Dalit-Samajsurya

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर : दलित-समाजसूर्य 

Dr.  Babasaheb Ambedkar: Dalit-Samajsurya

          विश्वरत्न, विश्वभूषण, महामानव, क्रांतीसूर्य, ज्ञानाचे प्रतिक, न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १४ एप्रिल १८९१ रोजी गरीब कुटुंबामध्ये जन्म  झाला. त्यांना शालेय शिक्षण घेत असताना, त्याचबरोबर महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना अस्पृश्यतेमुळे अनेकवेळा मानभंग सहन करावा लागला. अनेक वेळा त्यांच्या रास्त हक्कांपासून त्यांना वंचित ठेवण्यात आले. त्यांनी स्वतःचे बी. ए. पर्यंतचे शिक्षण बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड आणि कोल्हापूरचे शाहू महाराज यांनी केलेल्या आर्थिक साहाय्यावर पूर्ण केले. त्यांनी विदेशामध्ये जाऊन एम्.ए.पीएच्.डी. ही अर्थशास्त्र या विषयातील पदवी संपादन केली. त्याच ठिकाणी बाबासाहेब बॅरिस्टरही झाले. त्यांनी काही काळ प्राध्यापक म्हणून सिडनहॅम महाविद्यालयामध्ये काम केले. तसेच काही काळ प्राध्यापक व नंतरची काही वर्षे प्राचार्य म्हणून सरकारी विधी महाविद्यालयामध्ये पदभार संभाळला. बाबासाहेबांनी संपूर्ण दलित, बौद्ध बांधवांच्या चळवळीस प्रेरित केले. महिलांच्या त्याचबरोबर शेतकरी यांच्या हक्कांना पाठिंबा दिला.

          ७ नोव्हेंबर १९०० मध्ये बाबासाहेबांनी सातारा येथील प्रतापसिंह हायस्कूल मध्ये इंग्रजी माध्यमाच्या पहिली वर्गात प्रवेश घेतला होता. त्यांच्या या  शाळेतील पहिल्या प्रवेश दिवसाची आठवण म्हणून महाराष्ट्रामध्ये हा दिवस 'विद्यार्थी दिवस' म्हणून साजरा केला जातो. शाळेतील हजेरी रजिस्टर वर त्यांचे नाव 'भिवा रामजी आंबेडकर' असे आहे.  पुढे बाबासाहेबांचे कुटुंब मुंबई येथे गेले. तेथेच त्यांनी एलफिस्टन रोडवरील शासकीय हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. मुंबईच्या एलफिस्टन कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून दलित समुदायातून शिक्षण मिळविणारी, शिक्षण पूर्ण करणारी ते पहिली प्रतिभावंत व्यक्ती होती.

           डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे असामान्य प्रतिभावंत असे विद्यार्थी होते. आपल्या भारत देशामधील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि कोलंबिया विद्यापीठ मधून अर्थशास्त्राची पदवी मिळवणारे ते पहिले विद्यार्थी होते. त्यांनी राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयामध्ये प्रदीर्घ संशोधनाचे कार्य केले.

        आपल्या देशामध्ये वर्षानुवर्षे दलित समाज उच्चवर्णीयांकडून होणाऱ्या पिळवणुकीने भरडला जात होता. अशा झोपी गेलेल्या, निद्रिस्त असलेल्या दलित समाजाला जागृत करण्याचे अवघड आणि महान कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. 'गुलामी पेक्षाही अस्पृश्यता खूप वाईट आहे' अशी त्यांची महान विचारसरणी होती.
 
          आपल्या दलित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी भिमरावांनी वकिली करण्याचा दृढ निश्चय केला. या सर्व कार्यासाठी त्यांनी 'बहिष्कृत हितकारिणी सभा' २० जुलै १९१४ साली स्थापन केली. त्यांनी स्थापन केलेल्या या संस्थेचे 'शिकवा, चेतवा व संघटित करा' हे ब्रीदवाक्य होते.  आपल्या निद्रित समाजासाठी बाबासाहेबांना आस्मिता फुलवायची होती. या सर्व कारणास्तव ते 'मूक समाजाचे नायक' झाले. आपल्या समाजातील अशिक्षित बांधवांना 'वाचाल, तरच वाचाल' हा दिव्य संदेश दिला. अस्पृश्य समाजातील बेघर, निराधार मुलांसाठी अनेक वसतिगृहे तयार करून त्यांना शिक्षण देणे, ज्ञानाची प्रग्लभता वाढवण्यासाठी समृद्ध वाचनालये काढणे. अनेक मुले दिवसभर काम करण्यासाठी बाहेर जातात अशांसाठी रात्रशाळा भरवणे, समाजातील तरुण वर्गासाठी सुसज्ज क्रीडामंडळे  चालवणे अशा प्रकारच्या सर्व कार्यावर 'बहिष्कृत हितकारिणी सभेचा' जादा भर होता. आपल्या उत्तर आयुष्यामध्ये डॉ. बाबासाहेबांनी 'पिपल्स एज्युकेशन सोयायटी' या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मुंबईमध्ये सिद्धार्थ कॉलेज आणि औरंगाबाद मध्ये मिलिंद महाविद्यालयाची स्थापना करून ती नावारूपास आणली.

          १९२७ मध्ये महाड येथे दलित समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी डॉ. बाबासाहेबांनी 'चवदार तळे सत्याग्रह' हा ऐतिहासिक अहिंसक सत्याग्रह केला. नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये सर्वसामान्य अस्पृश्यांना मंदिरप्रवेश मिळावा यासाठी त्यांना सत्याग्रह केला.

          डॉ. बाबासाहेबांनी काही काळ मुंबई प्रांताच्या विधिमंडळावर काम केले. १९४२ मधील केंद्र सरकारमधील मंत्रीमंडळामध्ये ते मजूरमंत्री होते. दलितांचे प्रमुख नेते म्हणून ते गोलमेज परिषदेला उपस्थित होते. भारताला स्वातंत्र प्राप्ती झाल्यानंतर डॉ. बाबासाहेब हे भारताच्या घटनेचे शिल्पकार झाले. आपल्या समाजातील निद्रिस्त बांधवांना जागृत करण्यासाठी त्यांनी अनेक विद्वत्तापूर्ण ग्रंथांचे संपादन केले. राजगृह येथे त्यांच्या स्वतःचा खूप मोठा ग्रंथसंग्रह आहे. डॉ. बाबासाहेबांनी नागपूर येथे १४ ऑक्टोबर १९ ५६ या दिवशी आपल्या लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्म स्वीकारला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या आयुष्याची ६५ वर्षे भारत देशाच्या आर्थिक. सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, औाद्योगिक आणि संविंधानिक क्षेत्रामध्ये अविश्रांत कार्य करुन भारत देशाच्या निर्मिती मध्ये मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी समता, समानता, मानवता किंवा बंधुता या तत्वांना अनुसरून २ वर्ष ११ महिने आणि १७ दिवस कठीण परिश्रम करून, स्वतःच्या जीवाचे रान करुन भारताचे जगातील सर्वश्रेष्ठ संविधान तयार केले. 

          बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक पुस्तके, महान ग्रंथांचे संपादन केले. त्यापैकी हु वेअर शुद्राज, दि अनरचेबल्स, बुध्द आणि त्यांचा धम्म, दि प्रॉब्लेम ऑफ रूपी आणि थॉटस ऑन पाकिस्तान यांचा उल्लेख खास करुन करावा वाटतो. त्यांचे मते आयुष्य पुष्कळ जगण्यापेक्षा जेवढे आयुष्य जगू  ते महान असले पाहिजे. त्यांच्या मते अस्पृश्यतेची पाळेमुळे हि समाजातील वर्णव्यवस्थेमध्ये रूतून बसलेली असतात. त्यामुळे जोपर्यंत वर्णव्यवस्थेचा नायनाट होत नाही तोपर्यंत अस्पृश्यता संपणार नाही. बाबासाहेबांचा जातीव्यवस्थेला कडाडून विरोध होता. कारण या व्यवस्थेमुळे सामाजिक आणि आर्थिक विकास कधीच होऊ शकत नाही असे मानत. बाबासाहेबांनी दलित समाजाचा विकास व्हावा, याकरीता अंतरजातीय विवाह करणे, या समाजाचे शिक्षण, त्यांच्यासाठी संघर्ष आणि संगठन केले.
  
          अशा या महामानवाचे, क्रांतीसूर्याचे, डॉ. बाबासाहेबांचे दिल्ली येथे ६ डिसेंबर १९५६ रोजी महापरिनिर्वाण झाले. परंतू सर्व बहुजन, पददलित, मागास समाजाला 'भीमशक्तीचे अमृत' प्रदान करूनच डॉ. भीमराव रामजी आंबेडकर हे आदित्य अस्तंगत झाले.


English translation

Dr.  Babasaheb Ambedkar: Dalit-Samajsurya

 Vishwaratna, Vishwabhushan, Mahamanav, Krantisurya, symbol of knowledge, jurist, economist, politician and social reformer Dr.  Babasaheb Ambedkar was born on April 14, 1891 in a poor family.  He had to endure many humiliations due to untouchability while attending school as well as college.  Many times they were deprived of their rightful rights.  He had his own b.  A.  He completed his education with the financial support of Maharaj Sayajirao Gaikwad of Baroda and Shahu Maharaj of Kolhapur.  He went abroad and did his M.A.P.H.D.  He earned a degree in economics.  Babasaheb also became a barrister in the same place.  He worked for a time as a professor at Sydenham College.  He also held the post of Professor in the Government Law College for some time and then as Principal for the next few years.  Babasaheb inspired the entire Dalit, Buddhist Brotherhood movement.  Supported the rights of women as well as farmers.


 On November 7, 1900, Babasaheb entered the first class of English medium at Pratap Singh High School in Satara.  This day is celebrated as 'Student's Day' in Maharashtra to commemorate his first day of admission in this school.  His name on the school attendance register is 'Bhiva Ramji Ambedkar'.  Later, Babasaheb's family moved to Mumbai.  There he completed his secondary education at a government high school on Elphiston Road.  He was the first talented person from the Dalit community to complete his college education at Elphiston College, Mumbai.


 Dr.  Babasaheb Ambedkar was an exceptionally talented student.  He was the first student to receive a degree in economics from the London School of Economics and Columbia University in India.  He did extensive research in political science and economics.


 For years, the Dalit community in our country has been plagued by exploitation by the upper castes.  The difficult and great task of awakening such a dormant, dormant Dalit community, Dr.  By Babasaheb Ambedkar.  "Untouchability is worse than slavery," he said.



 Bhimrao was determined to advocate for justice for his Dalit community.  For all this work, he set up the 'Excluded Benefactors' Association' on July 20, 1914.  The motto of the organization he founded was 'Teach, Aware and Organize'.  Babasaheb wanted to make Asmita flourish for his sleeping society.  For all these reasons, he became the 'hero of the silent society'.  He gave the divine message to the uneducated brothers in our society, 'Read, only read'.  Building many hostels for the homeless, destitute children of the untouchable community and educating them, building rich libraries to increase the breadth of knowledge.  The 'Excluded Benefactor's Meeting' was an extra emphasis on all such activities as running night schools for those who go out to work all day, running well-equipped sports clubs for the youth in the community.  In his later life, Dr.  Babasaheb founded the People's Education Society.  Through this organization, he established Siddharth College in Mumbai and Milind College in Aurangabad.


 In order to expose the injustice done to the Dalit community at Mahad in 1927, Dr.  Babasaheb carried out the historical non-violent satyagraha 'Chavdar Tale Satyagraha'.  Satyagraha was organized for the common untouchables to get temple admission in Kalaram temple of Nashik.


 Dr.  Babasaheb worked for some time in the legislature of Mumbai province.  He was the Labor Minister in the 1942 Union Cabinet.  He attended the Round Table Conference as the main leader of the Dalits.  After India gained independence, Dr.  Babasaheb became the architect of the Constitution of India.  He edited many scholarly texts to awaken the dormant brothers in his community.  Rajagriha has a very large collection of their own.  Dr.  Babasaheb converted to Buddhism in Nagpur on 14 October 1956 along with millions of his followers.  Dr.  Babasaheb Ambedkar spent 65 years of his life in India.  India has made a significant contribution to the formation of the country by working tirelessly in the social, political, religious, educational, cultural, historical, industrial and constitutional spheres.  He worked tirelessly for 2 years, 11 months and 17 days to uphold the principles of equality, equality, humanity or brotherhood, and sacrificed his life to create the best constitution of India in the world.


 Babasaheb edited many books and great books during his life.  Among them are Hu Ware Shudraj, The Unreachables, The Buddha and His Dhamma, The Problem of Rupee and Thoughts on Pakistan.  In his opinion, life should be greater than living a long life.  According to him, due to untouchability, they are entrenched in the caste system of the society.  So untouchability will not end until the caste system is annihilated.  Babasaheb was strongly opposed to the caste system.  Because he believed that this system could never lead to social and economic development.  Babasaheb organized inter-caste marriages, education, struggle and organization for the development of the Dalit community.



 Such a great man, Krantisurya, Dr.  Babasaheb passed away on December 6, 1956 in Delhi.  But by providing 'nectar of Bhim Shakti' to all Bahujan, Paddalit and backward communities, Dr.  Bhimrao Ramji Ambedkar, Aditya was deposed.