गुढीपाडवा - शुभसंदेश Gudhi Padva - Good Wishes

 गुढीपाडवा  - शुभसंदेश Gudhi Padva  - Good Wishes





आशेची पालवी,
सुखाचा मोहर,
समृध्दीची गुढी,
समाधानाच्या गाठी,
नववर्षाच्या शुभेच्छा,
तुमच्यासाठी...
गुढीपाडव्याच्या
हार्दिक शुभेच्छा!


उभारून
आनंदाची गुढी दारी,
जीवनात येवो
रंगत न्यारी,
पूर्ण होवोत
आपल्या सर्व
इच्छा - आकांक्षा,
नुतन वर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा...
गुढीपाडव्याच्या
हार्दिक शुभेच्छा!


येवो सुखसमृध्दी अंगणी,

वाढो आनंद जीवनी,

तुम्हासाठी या शुभेच्छा,

नववर्षाच्या या शुभदिनी...

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!



वसंत ऋतूच्या आगमनी,

कोकिळा गायी मंजुळ गाणी,

नववर्षाच्या या शुभदिनी,

सुख समृद्धी नांदो जीवनी.

गुढी पाडव्याच्या आणि नुतनवर्षाच्या

हार्दिक शुभेच्छा!


विश्वासाची काठी,
विवेकाची वाटी,
अभ्यासाची पाटी,
प्रयत्नांच्या गाठी,
हिच खरी जीवनाची गोडी,
उभारूया यशाची गुढी.
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!


शांत निवांत शिशिर सरला,
सळसळता हिरवा वसंत आला,
कोकिळेच्या गोड सुरांसोबत,
चैत्र 'पाडवा' दारी आला...
नुतन वर्षाभिनंदन!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

शिखरे उत्कर्षाची तुम्ही सर करत राहावी...!
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी...!
तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे...!
आई भवानीच्या कृपेने तुमच्या जीवनाच मनासारखे घडू दे...!!
सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...!!

श्रीखंड पुरी,
रेशमी गुढी,
लिंबाचे पान,
नववर्ष जाओ छान,
आमच्या सर्वांच्या 
तर्फे
 गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!


संस्कृतीच्या क्षितिजावर पहाट नवी उजळून आली...
आयुष्यात पुन्हा नव्याने क्षण मोलाचे घेऊन आली...
वेचून घेऊ क्षण ते सारे...
आनंदे करू नववर्ष साजरे.
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.


सुरू होत आहे नवीन वर्ष,
मनात असू द्या नेहमी हर्ष.
येणारा नवीन दिवस करेल नव्या विचारांना स्पर्श.
हिंदू नव वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या
हार्दिक शुभेच्छा!


सोनेरी पहाट 
उंच गुढीचा थाट...
आनंदाची उधळण अन्
सुखाची बरसात...
दिवस सोनेरी 
नव्या वर्षाची सुरुवात...
गुढीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा!
गुढीपाडवा आणि नुतन वर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा


सोनेरी सूर्याची
सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा
सोनेरी दिवस...
सोनेरी दिवसाच्या
सोनेरी शुभेच्छा
सोन्यासारख्या लोकांना...
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!


आशेची पालवी,
सुखाचा मोहर,
समृध्दीची गुढी,
समाधानाच्या गाठी,
नववर्षाच्या शुभेच्छा,
तुमच्यासाठी...
गुढीपाडव्याच्या
हार्दिक शुभेच्छा!


गुढी उभारू
आनंदाची,
समृध्दीची,
आरोग्याची,
समाधानाची
आणि
उत्तुंग यशाची,
नव वर्षाच्या शुभेच्छा...
शुभ गुढीपाडवा!


गुढी उभारून
आकाशी,
बांधून तोरण
दाराशी,
काढून रांगोळी
अंगणी,
हर्ष पेरूनी
मनोमनी,
करू सुरूवात
नववर्षाची...
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!

गुढीपाडवा :
          आपल्या भारत देशातील प्रमुख सणांपैकी गुढीपाडवा हा एक भारतीय सण आहे. हा महाराष्ट्र राज्यामध्ये हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे माहे चैत्र शुद्ध प्रतिपदेला मोठया उत्साहाने साजरा केला जातो. गुढीपाडव्याचा दिवस म्हणजेच शालिवाहन संवत्सराचा पहिला दिवस मानला जातो. आपण मानत असलेल्या शुभ सोडतीन मुहूर्तांपैकी हा एक शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी खरेदी करण्याचा योग शुभ मानला जातो. याकारणास्तव अनेक माणसे याच दिवशी सोने खरेदी, स्वतःच्या नवीन व्यवसायाची सुरूवात, विविध नवनवीन उपक्रमांचा प्रारंभ इत्यादी गोष्टी करतात. हिंदू संस्कृतीमध्ये घराच्या दारावरती उभारलेली गुढी हि समृध्दीचे आणि विजयाचे शुभ प्रतिक मानले जाते. या दिवसापासूनच संपूर्ण देशात रामनवमीच्या कार्यक्रमांचा प्रारंभ सुरू होतो. आपल्या देशामध्ये मराठी, कानडी, कोकणी आणि तेलुगू भाषीक लोक हा सण अतिशय उत्साहाने करतात.
          या दिवशी महाराष्ट्रामध्ये हा सण उत्साहाने साजरा होतो. सकाळी सकाळी लवकर उठून घराच्या दारावर गुढी उभारली जाते. बांबूच्या काठीला नवीन रेशीम वस्त्र किंवा नवीन साडी बांधून त्यावर झेंडूच्या पिवळ्या फुलांचा हार, साखरेपासून बनवलेल्या गोड गाढी बांधतात. तसेच बांबूच्या वरच्या टोकाला तांब्या उपडा बसवतात आणि कडूनिंबाची डहाळी बांधतात. घरासमोर छान छान रांगोळी नक्षीकाम केले जाते.
          त्यानंतर कुटुंबातील सर्व एकत्रित येऊन वडीलधाऱ्या व्यक्तींच्या हस्ते फुले, अक्षता, गंध लावून, निरांजन लावून मनोभाने गुढीची पुजा केली जाते. या दिवशी प्रत्येक घराघरामध्ये गोड गोड पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो. दुपारी सर्वप्रथम गोड नैवद्य गुढीला दाखवून नंतर दुपारचे जेवण केले जाते. सायंकाळी पुन्हा हळदी- कुंकू वाहून गुढी उतरवली जाते. हा दिवस हिंदू वर्षाचा पहिला दिवस असल्यामुळे प्रत्येकजण एकमेकांना नवीन वर्षाच्या त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतात. 
          हाच दिवस कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या राज्यामध्ये चैत्र शुध्द प्रतिपदा या दिवशी गौतमीपुत्राची सत्ता असलेल्या प्रदेशामध्ये विजयदिवस म्हणून साजरा केला जातो. याप्रदेशामध्ये गुढीपाडव्यालाच उगादी किंवा संवत्सर पाडवो या नावाने संबोधले जाते. सिंधी संस्कृतीमध्ये हाच सण चेटीचंड या नावाने साजरा केला जातो.
          शालिवाहन शकातील हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वर्षाच्या सुरूवातीचा पहिला दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा करतात. परंतू १९३८ या वर्षामध्ये दोन गुढीपाडवे आले होते. कारण १९३८ या नविन वर्षाच्या सुरूवातीस आणि वर्षाच्या शेवटी दोन गुढीपाडवे आले होते. 
          विष्णूपुराणामध्ये याच दिवशी ब्रम्हदेवाने विश्वाची निर्मिती केली असा उल्लेख आहे. त्याच बरोबर चौदा वर्षाचा वनवास भोगून आणि लंकापती रावणाचा पराभव करून प्रभू श्रीराम याच दिवशी अयोध्येत परतले होते. तसेच शकांचा पराभव करण्यासाठी शालीवाहन कुंभार याच्या मुलाने सहा हजार मातीचे सैनिक तयार करून त्यामध्ये प्राण घालून याच दिवशी शकांचा पराभव केला होता.
          अशा प्रकारे विविध घटनांवर आधारीत हा सण आपल्या देशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.