मी पाहिलेली लेणी (कथनात्मक निबंध) The caves I saw

 मी पाहिलेली लेणी

The caves I saw


          येणाऱ्या उन्हाळी सुट्टीमध्ये मी बाबांकडे महाराष्ट्रातील काही प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. आईला सुध्दा माझी ही कल्पना आवडल्यामुळे तिने ती उचलून धरली होती. त्यामुळे मी, दादा, बाबा आणि आई मिळून 'वेरूळची लेणी' पाहायला जाण्याचा बेत आखला. आम्ही आमची खाजगी गाडीतून सकाळी लवकरच वेरूळला पोहचलो.
          वेरूळ हे अतिशय प्रसिद्ध आहे ते तेथील कोरीव लेण्यांसाठीच. साधारणता औरंगाबाद पासून ३० ते ३५ किलोमीटर अंतरावरती जगामध्ये प्रसिध्द असणारी लेणी आहेत. एका बाजूला उंच उंच डोंगरकडे आणि दुसऱ्या बाजूला खोल दऱ्या. सह्याद्री पर्वताच्या सातमाळा पर्वत रांगेमधील डोगर कड्यांमध्ये साधाणता ५ व्या ते १० व्या शतकामध्ये कोरलेल्या ह्या एकूण ३४ लेणी आहेत. डोंगरावरून खाली नजर टाकली तर भीतीने डोळेच फिरतात. डौगरांच्या कडयांच्या बाजूला नजर टाकली, तर मानवी कर्तत्वाचे उत्तम दर्शन घडून दृष्टी स्तिमित होते. हे सर्व कर्तृत्व नक्की कोणाचे? कोणी बरे हे डोंगर खोदले? काही नोंदी नाही. या अप्रतिम कला निर्माण करणाऱ्याने कलाकाराने कोठेही आपले साधे नाव सुध्दा कोरून ठेवले नाही. म्हणूनच ही अजब निर्मिती ' अपौरुषेय' मानली जाते.
          आपल्या भारत सरकार सन १९५१ मध्ये या लेण्याला 'राष्ट्रीय स्मारक' म्हणून घोषीत केले आहे. त्यानंतर हि जगप्रसिध्द कलाकृती भारताच्या पुरातत्व विभागाकडे सोपवण्यात आली आहे. या ३४ लेण्यांपैकी बारा बौध्द, सतरा हिंदू आणि पाच जैन लेणे आहेत. जागतिक वारसास्थळामध्ये या लेण्याचा समावेश युनेस्कोने सन १९८३ ला केला आहे. या लेण्यांपैकी राष्ट्रकूट राजवंश असलेला राजा कृष्णा याने बांधलेले कैलास मंदिर हे जगातील स्थापत्यशास्त्रात अदभुत मानले जाते. वेरूळच्या या लेण्यांचा हा समूह एक असाधारण समूह आहे. अंदाजे दीड मैल लांबीच्या डोंगरात कोरलेल्या या लेण्यांत बौध्द, हिंदू आणि जैन अशा तिन्ही धर्माच्या लेण्यांचा समावेश आहे.
          लांबून सर्व पर्वतावर नजर फिरवली तर तो एखाद्या भव्य मूर्तीसारखा दिसून येतो. हि संपूर्ण कला हि द्रविड कला शैलीवर आधारित आहे. एकच खडक अतिशय प्रमाणबध्द कोरून २७६ फूट लांब आणि १५४ फूट रुंद हे प्रशस्त मंदिर आहे. लेण्याच्या सुरवातीलाच दर्शन घडते, ते अप्रतिम, भव्य अशा बौद्ध लेण्यांचे. ही सर्वात जुनी लेणी आहे. या लेण्यांचे खास वैशिष्टय म्हणजे त्याची भव्यता आणि साधेपणा. त्यानंतर आपल्याला दिसतात ती हिंदू लेणी. या सर्व लेण्यामध्ये सोळावे असलेले कैलास लेणे महत्त्वाचे आहे. बौद्ध लेण्यांपेक्षा हिंदू लेणी खूप वेगळी आहेत. यामध्ये हिंदू देवदेवतांचे दर्शन घडते. येथील कोरीव शिल्पांचे स्वरूपही बौध्द लेण्यांपेक्षा वेगळे आहे.
          आपण बौध्द लेणी समूहाचे दर्शन घेतल्यास आपल्याला यामध्ये बौद्ध भिक्खूंच्या राहण्यासाठी बांधलेली निवासस्थाने, स्वयंपाकघरे, विहार, प्रार्थनास्थळे अशा प्रकारची रचना दिसून येते. यामध्ये भगवान गौतम बुद्धांची शिल्ये, बोधिसत्वांच्या विविध अप्रतिम शिल्पे आपणास पाहवयास मिळतात. बौद्ध लेण्यांमध्ये दहा क्रमांकाचे विश्वकर्मा लेणे हे प्रार्थनागृह म्हणून वैशिष्टयपूर्ण मानले जाते. या लेण्यामध्ये ध्यानस्थ बौद्ध भिक्खू आणि अप्सरा यांच्या कलात्मक शिल्पांचे अंकन आपणास पाहयला मिळते.
          कैलास लेण्यात प्रवेश करतानाच समोर लाटांचे नर्तन चाललेल्या जलाशयात कमलासनावरील गजलक्ष्मी दिसते. तिच्या डावीकडे गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्या सुंदर आणि मनमोहक मूर्ती दिसतात. या ठिकाणी प्रचंड हत्ती आहेत. या लेण्यामध्ये संपूर्ण डोंगर वरपासून खालपर्यंत कोरलेला आहे. अप्रतिम कलावंत कारागिरांनी घडवलेले हे शिल्प पाहून आपण स्तिमित होतो. या लेण्यामध्ये अशी एकही जागा नाही जेथे कोरीव मूर्ती नाही, नक्षीकाम नाही. आजसुध्दा हजारो वर्षे या मूर्ती उन्हा- पावसाचा, थंडी वाऱ्याचा मारा सहन करत जशाच्या तशा आहेत. त्यांची भव्यता, त्यांचा रेखीवपणा, जिवंतपणा आजही तसूभरही कमी झालेला नाही. 
          यामध्येच शेवटची चार पाच लेणी ही जैन धर्माची आहेत. याचे वळण सुध्दा थोडे वेगळेच आहे. यामध्ये इंद्र- इंद्राणी, तीर्थकर, लंबोदर, कुबेर यांच्या रेखीव मूर्ती आपणास पाहयला मिळतात. या लेण्यांचे हे सारे वैभव पाहताना एका गोष्टीने मात्र मनाला व्यथित केले. काही ठिकाणी काही अतिउत्साही पर्यटकांनी आपली नावे वेडीवाकडी व कुरूपतेने खोदलेली होती. यांना कवी केशवसुतांच्या शब्दांत सांगावेसे वाटते,
'विशाल भूधर प्राप्तकाल हा
तयात सुंदर लेणी खोदा,
निजनामे त्यावरती नोंदा.






English translation

The caves I saw


 During the coming summer vacation, I asked Baba to visit some of the tourist places in Maharashtra.  My mother liked the idea, so she picked it up.  So my grandfather, father and mother decided to go and see the 'caves of Eluru'.  We reached Ellora early in the morning in our private car.

 Eluru is famous for its carved caves.  There are world famous caves at a distance of 30 to 35 km from Aurangabad.  High mountains on one side and deep valleys on the other.  There are a total of 34 caves carved in the 5th to 10th centuries in the Dogar range in the Satmala mountain range of the Sahyadri mountains.  If you look down from the mountain, your eyes are filled with fear.  If you look at the side of the dagger, the vision is stunned by the great vision of human deeds.  Who exactly is responsible for all this?  Who dug this mountain?  No entries.  The artist who created this amazing art has not even carved his simple name anywhere.  That is why this strange creation is considered 'imperishable'.

 The Government of India declared this cave a 'National Monument' in 1951.  This world famous work of art has since been handed over to the Archaeological Survey of India.  Out of these 34 caves, there are twelve Buddhist, seventeen Hindu and five Jain caves.  The cave was inscribed on the UNESCO World Heritage List in 1983.  Among these caves, the Kailash Temple, built by King Krishna of the Rashtrakuta dynasty, is considered to be one of the most marvelous in the world of architecture.  This group of caves in Eluru is an extraordinary group.  The caves, carved into a mountain about a mile and a half long, include caves of three religions, Buddhism, Hinduism and Jainism.

 If you look at all the mountains from a distance, it looks like a huge statue.  This whole art is based on the Dravidian art style.  It is a spacious temple, 276 feet long and 154 feet wide, carved out of a single rock.  Darshan takes place at the very beginning of the cave, it is a magnificent, magnificent Buddhist cave.  This is the oldest cave.  The special feature of these caves is its grandeur and simplicity.  Then we see the Hindu caves.  It is important to take the sixteenth Kailas cave in all these caves.  Hindu caves are very different from Buddhist caves.  In this, darshan of Hindu deities takes place.  The nature of the carvings here is also different from the Buddhist caves.

 If you visit a group of Buddhist caves, you will see the structures built for the accommodation of Buddhist monks, kitchens, monasteries, places of worship.  In it you can see the sculptures of Lord Gautam Buddha, various amazing sculptures of Bodhisattvas.  Vishwakarma Cave, number ten in Buddhist caves, is considered to be a special place of worship.  In this cave, you can see the artistic sculptures of meditating Buddhist monks and nymphs.

 As you enter the Kailasa cave, you can see Gajalaxmi on the Kamalas in the reservoir where the waves dance in front.  To her left are beautiful and adorable idols of Ganga, Yamuna and Saraswati.  There are huge elephants in this place.  The entire mountain is carved in this cave from top to bottom.  We are amazed to see these sculptures made by amazing artists.  There is no place in this cave where there are no carved idols, no carvings.  Even today, for thousands of years, these idols have endured the heat, the rain, and the cold winds.  Their grandeur, their linearity, their vitality has not diminished even today.

 The last four or five caves belong to Jainism.  The turn is also a little different.  In it you can see linear idols of Indra-Indrani, Tirthakar, Lambodar, Kubera.  Seeing all the splendor of these caves, however, one thing bothered the mind.  In some places, enthusiastic tourists had their names engraved on the wadi and ugly.  I would like to express this in the words of the poet Keshavsut,

 'Huge land acquisition

 Dig beautiful caves in it,

 Record your name on it.