माझा आवडता खेळ (कथनात्मक निबंध)

माझा आवडता खेळ (कथनात्मक निबंध)



मुद्दे : खेळाचे जीवनातील अनन्यसाधारण स्थान - खेळांचे उपयोग - नेतृत्वगुण, सांघिक भावना, ऐक्य - जबाबदारीची जाणीव - निकोप दृष्टिकोन -  दुसऱ्याविषयी आपुलकी - वेळेचे महत्व - शिस्तप्रियता, चपळता, काटकपणा - सध्या बहुतेकांची आवड क्रिकेट - खेळाचा तपशील व महत्व...

          आज एकविसाव्या शतकात माणसाला खेळाचे महत्व उमगलेले आहे. शरीर निरोगी राहण्याकरता व्यायाम, योगा व खेळ आवश्यक आहेत हे सर्वमान्य झाले आहे. आज भारतात क्रिकेट हा अत्यंत लोकप्रिय खेळ झाला आहे. त्यामुळे सहाजिकच क्रिकेट खेळणाऱ्यापेक्षा क्रिकेट पाहणारे व ऐकणारे यांचीच संख्या फार मोठी झाली आहे.  मी त्यांपैकीच एक. मी क्रिकेट खेळतो, क्रिकेट संबंधित पुस्तके वाचतो आणि मैदानावर जाऊन व न जमल्यास दूरचित्रवाणीवर क्रिकेटचे सामने पाहतो. सामने पाहताना माझे देहभान हरपते.

          क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. यात दोन संघात सामने होतात. प्रत्येक संघात अकरा अधिक तीन खेळाडू असतात. या खेळासाठी चपळता, काटकपणा आणि शिस्तप्रियता आवश्यक असते. तीन स्टम्प्स व त्यांवरील दोन बेल्स मिळून विकेट म्हणजे यष्टी तयार होते. अशा समोरासमोरील दोन विकेट्स असतात. विकेटची रुंदी २२.९ सेंटीमीटर असते. दोन विकेट्स मध्ये २२ यार्ड अंतर असते, यालाच 'पिच' किंवा खेळपट्टी असे म्हणतात. खेळपट्टीची रुंदी पाच फूट असते. मैदान सामान्यता वर्तुळाकृती असते.

          क्रिकेट या खेळामध्ये एक संघ फलंदाजी करतो, त्याचवेळी दुसरा संघ गोलंदाजी करत असतो. दिवसा खेळल्या जाणाऱ्या कसोटी क्रिकेटसाठी लाल रंगाचा चेंडू वापरतात तर दिवस-रात्र खेळल्या जाणाऱ्या एक दिवशीय सामन्यासाठी सफेद रंगाचा चेंडू वापरतात. बॅटची लांबी ३४ इंचांपेक्षा व ४ १/२ इंचांपेक्षा अधिक नसावी. बॅटचे वजन मात्र निश्चित नसते.

          या खेळात फलंदाजी (बॅटिंग), गोलंदाजी (बॉलींग) व क्षेत्ररक्षण (फिल्डींग) या सर्व बाबतीत आपले नैपुण्य दाखवता येते. या खेळामध्ये चार धावा म्हणजेच चौकार आणि सहा धावा म्हणजेच षटकार मारणाऱ्या, तसेच अवघड झेल पकडणाऱ्या खेळाडूला प्रेक्षक डोक्यावर घेतात. क्षणाक्षणाला चुरस वाढवणारा असा हा खेळ आहे.

          सध्या कसोटी सामन्या बरोबर एकदिवसीय सामनेही खेळले जातात. अशा प्रकारचे खेळाचे सामने लोकांना आजकाल खूप आवडतात, कारण त्यांचा निकाल झटपट लागतो. आपल्या देशात अनेक उत्कृष्ट क्रिकेट वीर होऊन गेले व आजही आहेत. त्यांनी जागतिक कीर्ती मिळवली आहे. आज सचिन तेंडूलकर हा सर्वांचा आवडता खेळाडू आहे.

          क्रिकेटमध्ये अनेक खेळाडूंनी केलेल्या त्यांच्या वैयक्तिक विक्रमांची माहिती जपून ठेवली जात असली तरी या खेळात सांघिक एकता हीच महत्त्वाची आहे. तीच यश खेचून आणते. काही वेळेला एखाद्या खेळाडूने भरपूर धावा केल्या तरी संघाला यश मिळत नाही. तेव्हा लक्षात येते की, 'क्रिकेट हा संधीचा ( Chance) खेळ आहे.' प्रत्येक खेळाडूला अतिशय जबाबदारीने खेळावे लागते, त्याच्या संघाचा आणि पर्यायाने देशाचा लौकिक अवलंबून असतो.

          माजी क्रिकेटवीर सुनील गावस्कर यांनी सांगितलेले लक्षात ठेवा -

"क्रिकेट म्हणजे जीवन राजा 

हुकला तो संपला."


My Favorite Game (Narrative Essay)

 Points : Unique place in the life of the game - Use of the game - Leadership, team spirit, Unity - A sense of responsibility - Negative attitude - Affection for others - Importance of time - Discipline, agility, austerity - Currently most people love cricket - Details and importance of the game

 Today, in the 21st century, the importance of sports has come to man.  It is generally accepted that exercise, yoga, and sports are essential for good health.  Cricket has become a very popular sport in India today.  As a result, the number of people watching and listening to cricket has become much larger than the number of people playing cricket.  I am one of them.  I play cricket, read cricket related books and go to the field and watch cricket matches on television if I don't get together.  I lose consciousness while watching matches.

 Cricket is a team sport.  It involves matches between two teams.  Each team consists of eleven plus three players.  This game requires agility, sharpness and discipline.  A wicket is a combination of three stumps and two bells on them.  There are two wickets facing each other.  The width of the wicket is 22.9 cm.  There is a gap of 22 yards between two wickets, this is called 'pitch'.  The width of the pitch is five feet.  The field is usually circular.

 In cricket, one team is batting and the other is bowling.  The red ball is used for daytime Test cricket while the white ball is used for day-night one-day matches.  The length of the bat should not be more than 34 inches and 4 1/2 inches.  The weight of the bat, however, is not certain.

 In this game, you can show your skills in batting, bowling and fielding.  In this game, four runs (fours) and six runs (sixes) as well as difficult catches are taken by the spectators.  This is a game that increases momentarily.

 Currently, ODIs are played along with Test matches.  This type of game is very popular nowadays, because the result is instantaneous.  Many great cricket heroes have become and are still in our country.  He has gained world fame.  Today, Sachin Tendulkar is everyone's favorite player.

 Although the individual records of many players in cricket are kept alive, team unity is the key to the game.  The same pulls success.  Sometimes a player scores a lot but the team does not succeed.  Then you realize, 'Cricket is a game of chance.'  Each player has to play very responsibly, depending on his team and, alternatively, the country.

 Remember what former cricketer Sunil Gavaskar said -


 "Cricket is the king of life


 The hook is over. "