माझा आवडता कवी किंवा माझा आवडता साहित्यिक (कथनात्मक निबंध )

 माझा आवडता कवी किंवा माझा आवडता साहित्यिक (कथनात्मक निबंध)



मुद्दे :  अनेक लेखक आवडीचे- त्यांपैकी एक - वैशिष्ट्य - इतर समकालीन लेखकांची तुलना - त्यांनी लिहिलेले विविध साहित्य - विविध साहित्य मधील काही वैशिष्ट्यपूर्ण वाक्य किंवा पंक्ती - एखादे विशेष पुस्तक - का आवडते त्याचे कारण - व्यक्तिरेखा - व्यक्ती व साहित्यिक म्हणून तिच्याविषयी वाटणारा आदर...

          विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज हे कवी होते, त्याचप्रमाणे  नाटककार, ललित निबंधकार, कथाकार व वृत्तपत्र लेखक होते. पण त्यांच्या या सर्व कवितासंग्रहातून, साहित्यिक लिखानातून लक्षात राहतो तो त्यांच्यातला सर्वश्रेष्ठ कवीच! मग 'नटसम्राट' नाटकातील बेलवलकर असो, 'कौन्तेया' तील कर्ण असो वा 'स्वप्नांचा सौदागर' या लेखातील चंद्राची जगाशी ओळख करून देणारा ललितलेखक असो, या सर्वांतून कुसुमाग्रजांचा काव्यात्मक पिंड कधीच लपून राहत नाही.

          'जीवनलहरी' हा कुसुमाग्रजांचा पहिला लहानसा कवितासंग्रह १९३३ साली प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर 'विशाखा,' 'किनारा,'  'मराठीमाती,' 'स्वगत,' 'हिमरेषा,' 'वादळवेल,' 'छंदोमयी,' अशा आपल्या काव्यसंग्रहातून या कविश्रेष्ठीने रसिकांना  काव्यमृत्ताचा आस्वाद सातत्याने दिला आहे.

          कुसुमाग्रजांच्या प्रत्येक कवितेची खास विशेष म्हणजे त्यांची कविता अनेक सर्वश्रेष्ठ टीकाकारांना जशी आवडली, तशी अगदी सामान्य रसिकांनाही आवडली आहे. आपल्या या कवितांना कुसुमाग्रज स्वतः समिधा म्हणतात -

'समिधाच  सख्या या, त्यात कसा ओलावा

कोठून फुलापरि वा मकरंद मिळावा

जात्याच रुक्ष या,  एकच त्या आकांक्षा

तव अंतर अग्नी क्षणभर तरी फुलवावा.'

          या काव्यपंक्तीतून कुसुमाग्रजांची विनम्रता प्रत्ययाला येते. त्याचप्रमाणे त्यांच्या काव्यरचनेमागील हेतू ही स्पष्ट होतो. देशातील, समाजातील सामाजिक विषमतेमधील असलेल संघर्ष या कवीला सतत अस्वस्थ करतो व तो संघर्ष वेगवेगळ्या प्रतीकांतून प्रभावीपणे व्यक्त होतो. कधी तो संघर्ष उद्दाम आगगाडी आणि तिच्याखाली चिरडली जाणारी जमीन यांच्यामधील असतो, तर कधी तो उफाळणारा सागर व त्याला आव्हान देणारा कोलंबस यांच्यातील असतो.

          कुसुमाग्रजांच्या प्रतिभा शक्तीला अजोड अशा तरल कल्पकतेची जोड लाभली आहे. तर मग कधी 'पृथ्वीचे प्रेमगीत' गाऊन लागते, तर कधी 'अहि-नकुलाच्या' रूपकातून भिन्न प्रवृत्तींचा संघर्ष मांडते. कुसुमाग्रजांची काव्यवृत्ती भव्यतेला गवसणी घालू पाहणारी आहे. लोकमान्यांच्या पुतळ्याच्या सानिध्यात त्यांचे मन म्हणते, "ते होते जीवित अन् हा जीवितभास." कुसुमाग्रजांच्या मनाला दिव्यत्वाचा, उदात्तत्तेचा, मृत्युंजयाच्या शोधाचा ध्यास लागलेला होता.

          असा हा भारतवर्षातील 'ज्ञानपीठ प्राप्त पुरस्कार' विजेता माझा आवडता कवी १० मार्च, १९९९ रोजी अनंतात विलीन झाला. त्याच्या काव्याचा दिपस्तंभ भविष्यातील हजारो मराठी कवींना प्रेरणादायी मार्गदर्शक म्हणून अनंतकाळ प्रकाश पुरवत राहील.


My favorite poet or my favorite literary (narrative essay)

Points : Favorite of many writers - one of them - feature - comparison of other contemporary writers - various literature written by him - some characteristic sentences or lines from different literature - a particular book - the reason why he likes - personality - respect for him as a person and literary.  .

 Vishnu Vaman Shirwadkar alias Kusumagraj was a poet, as well as a playwright, fine essayist, storyteller and newspaper writer.  But from all his collections of poetry, literary writing, he is remembered as the best poet among them!  Whether it is Belwalkar in the play 'Natsamrat', Karna in 'Kaunteya' or the fine writer who introduces Chandra to the world in the article 'Swapnancha Saudagar', the poetic body of Kusumagraj is never hidden from all this.

 Kusumagraj's first short collection of poems 'Jeevanalahari' was published in 1933 and after that his poems like 'Vishakha', 'Kinara', 'Marathimati', 'Swagat', 'Himresha', 'Wadalvel' and 'Chhandomayi' gave the audience a taste of poetry.  Given consistently.

 What is special about each of Kusumagraj's poems is that his poems are loved by many of the best critics as well as the general public.  Kusumagraj himself calls these poems Samidha -

 'Samidhacha sakhya ya, how to moisten it

 Where to get flowers or nectar

 Let the caste be dry, the only aspiration

 Let the fire burn for a moment. '

 The humility of McCarthy comes to the fore in this verse.  In the same way, the motive behind his poetry becomes clear.  The struggle between the social inequalities in the country and the society constantly disturbs the poet and that struggle is effectively expressed through different symbols.  Sometimes it is a conflict between a fierce train and the land being crushed under it, sometimes it is between a boiling sea and Columbus challenging it.

 Kusumagraj's genius is endowed with unparalleled fluid ingenuity.  So sometimes he sings 'Prithviche Prem Geet', sometimes he fights different tendencies through the metaphor of 'Ahi-Nakula'.  Kusumagraj's poetic attitude is trying to achieve grandeur.  In the presence of the statue of Lokmanya, his mind says, "It was a living, living being."  Kusumagraj's mind was obsessed with divinity, sublimity, the search for death.

 This is how my favorite poet, winner of Jnanpith Award in India, merged with Infinity on March 10, 1999.  The beacon of his poetry will continue to provide eternal light as an inspiring guide to thousands of future Marathi poets.